Skip to main content

"अबोली"

लेखक कवितानागेश यांनी गुरुवार, 18/04/2013 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववर नव्या स्त्री विभागाच्या स्थापनेची घोषणा आपण सर्वांनी वाचलीच असेल. त्याबद्दल ही माहिती. इथे कथा, काव्य, चर्चा, पाककृती, भटकंती, कलादालन असे विभाग आहेतच. त्याशिवाय नव्यानी लिहिणार्‍या स्त्रियांना उत्तेजन मिळण्यासाठी व फक्त स्त्रियांचे असे जे विषय असतात त्यासाठी हे वेगळे दालन सुरु करण्यात येत आहे. यातून प्रोत्साहन मिळून मिसळपाववर स्त्री-सदस्यांचा सहभाग अधिकाधिक वाढेल अशी अपेक्षा आहे. 'लिहित्या व्हा' या कार्यशाळेची माहिती देताना काही स्त्री सदस्यांच्या चर्चेत असा एक प्रस्ताव पुढे आला की एक बंदिस्त दालन स्त्री सदस्यांसाठी सुरू व्हावे.

राजकारण्यांचे डोके ठिकाण्यावर आहे का?

लेखक NiluMP यांनी गुरुवार, 18/04/2013 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
अनधिकृत इमारतीच्या कार्यवाही विरोधी सर्वपक्षीय राजकारण्यांचा (काही नसतील)ठाणे बंद ही बातमी वाचून डोक्यात एक सनक गेली आणि वाटले या राजकारण्यांचे डोके ठिकाण्यावर आहे का? मग पोलिसांच्या घरांसाठी, गिरणी कामगारांच्या घरांसाठी आणि सर्वसामान्य भुमी पुत्राला स्वस्तात फुकटात नव्हे घरे उपलब्ध करून देण्यासाठी हे नेते कधी एकत्र आले नाहीत (ULC) urban land ceiling act सारखा कायदा रदद करून सरकाच्या ताव्यात असलेली जमीन विल्डरांच्या घशात घातली. हे जे नाटक चालू आहे ते कोणत्याही माणूसकीच्या भावनेतून आलेले नाही तर एक गठठा मतदार आपल्या हातून जातील ही भिती त्यांना वाटते. तुम्हाला काय वाटते.

मखाण्यांची खिर

लेखक Mrunalini यांनी गुरुवार, 18/04/2013 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः मखाणे - १ वाटी दुध - १ लिटर साखर - १/४ वाटी (आवडीप्रमाणे कमी-जास्त करु शकता) तुप – 1 चमचा काजु - ४-५ बदाम - २-३ पिस्ता - ४-५ केशर - ४-५ काड्या वेलची पावडर - १/४ चमचा कृती: १. दुध १/२ लिटर होई पर्यंत आटवुन घ्यावे. २. काजु, बदाम व पिस्ता बारिक चिरुन घ्यावे. ३. एका पॅन मधे १ चमचा तुप गरम करावे. त्यात मखाणे ३-४ मिनिटे परतुन घ्यावे. ४. मखाणे थोडे गार झाल्यावर, त्यांची मिक्सर मधे भरड करुन घ्यावी. ५. आटवलेल्या दुधामधे मखाण्यांची भरड, साखर, वेलची पावडर व केशर टाकुन ५-७ मिनिटे उकळुन घ्यावे. ६. ५-७ मिनिटांनी गॅस बंद करुन, वरुन सुक्या मेव्याने सजवावे. ७.

झणझणीत सातारी कोंबडी

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 17/04/2013 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
सुधा मायदेव ह्यांच्या लाजवाब मालिकेतल्या चिकन ह्यामधील ही पाककृती आहे.पाककृतीचे प्रमाण मी आमच्या आवडी व चवीप्रमाणे बसवले आहे. साहित्य: अर्धा किलो कोंबडीचे तुकडे हळद + मीठ लावून ठेवलेले २ कांदे उभे चिरलेले ५-६ लसुण + १ इंच आले ठेचून ३ टेस्पून कांदा-लसूण मसाला (हा मसाला खूप तिखट असतो , थोडी चव घेऊन बघा व त्याप्रमाणे घालावा) २ टेस्पून सुके खोबरे १ टेस्पून पांढरे तीळ १ टेस्पून खसखस १ टेस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्तं) १/२ टीस्पून हळद मीठ चवीप्रमाणे ३ लसूण पाकळ्या बारीक चिरलेली कोथींबीर तेल

पुस्तक खरेदी - मदत

लेखक चिगो यांनी बुधवार, 17/04/2013 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या १९, २० आणि २१ तारखेला मी मुंबईत आहे. त्यावेळी काही मराठी पुस्तकांची खरेदी करण्याचा विचार आहे. मिपाकरांना कृपया मुंबईत जरा बर्यापैकी सवलत देणार्या पुस्तकांच्या दुकानांची माहिती द्यावी, ही विनंती.. तसेच काही चांगल्या मराठी पुस्तकांची नावेही सुचवावीत. फ्लिपकार्टवर हवी तशी मराठी पुस्तके मिळत नाहीत, असे मला वाटते.. :-( चारोळी धाग्यासाठी क्षमस्व..

ऑफिस आणि फॉर्मल कपडे

लेखक बॅटमॅन यांनी बुधवार, 17/04/2013 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स मिपाकर्स, बरेच मिपाकर या ना त्या ऑफिसात काम करतात. आयटीपासून कोअरपर्यंत, प्रोग्रॅमर-अशिष्टंट इंजिनिअर-क्लार्क पासून सीनिअर मॅनेजरपर्यंत, तसेच गल्ली-दिल्ली-आम्रविकेपर्यंत मिपाकर जगभरात अनेक प्रकारच्या नोकरी-धंद्यांत असलेले आढळून येतील. काहींचा तर स्वतःचा व्यवसायदेखील आहे. या व्यामिश्र समूहाला काही साधे प्रश्न आहेत. बर्‍याच दिवसांपासून मनात घोळत आहेत. १. फॉर्मल ड्रेस या कल्पनेबद्दल आपल्याला काय वाटते? ऑफिसात येड्यागत काहीतरी घालून येऊ नये हे मान्य पण सूट-बूट यांचा सरसकट आग्रह कितपत ग्राह्य? वेस्टर्न संकल्पनेचा गरजेपेक्षा जास्त प्रभाव आहे असे वाटते का? २.

असही तसही....

लेखक निश यांनी बुधवार, 17/04/2013 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी दाढी करता करता टिव्ही चालु केला बातम्या होत्या लागल्या भीषण दुष्काळाच्या फार फार वाईट वाटल ते बघुन बेसिनचा नळ मात्र माझा ओकत होता पाणी बदाबदा भरभरुन. दुपारी जेवताना परत टिव्ही लावला बातमी होती लागली अन्न पाण्यावाचुन मरणार्‍या जनावरांची. मी परत ऐकदा ह्ळहळलो ते बघुन अन मी उठलो ताटात जास्त झालेल अन्न टाकायला कचर्‍याच्या डब्ब्यात. रस्त्यातुन जाताना मोबाईल वर फेसबुक पहात होतो. मित्राने कुपोषित मुलाचा फोटो पाठवला होता लाईक करायला. मनात परत ऐकदा दुखावलो, मित्राला मनातल्या मनात शिव्या दिल्या. फोटो कसला पाठवतो लाईक करायला , त्यापेक्षा त्या मुलाना मदत द्यायला हवी त्यानें. मी मात्र हाकलल त्या

घर पहावे बांधून .. - १

लेखक स्पा यांनी बुधवार, 17/04/2013 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
गर्दीने भरून सांडणाऱ्या स्टेशन मधून ती कशीबशी बाहेर पडली, आणि तीच तिलाच हायसं वाटलं. हातातली पिशवी सावरत ती एका कडेला सावलीत उभी राहिली, पिशवीतून पाण्याची बाटली काढून अर्धी संपवल्यावरच तिच्या जीवात जीव आला. रुमालाने चेहरा सारखा करत तिने आईला फोन करून सुखरूप उतरल्याचे सांगितले. पण अजूनही प्रवास संपलेला नव्हता, एक महत्वाचा टप्पा पार पडला एवढेच,प्रचंड गर्दीनेच ती दडपून गेलेली होती, उन्हाळा मी म्हणत होता. उन्हाच्या झळांनी हैराण होऊन तिने ओढणी तोंडावर बांधून घेतली .हातातला पत्ता पाठ झालेला असूनही तिने परत पाहून घेतला, हो चुकामुक नको परत.

आई

लेखक Bhagwanta Wayal यांनी बुधवार, 17/04/2013 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
आयुषभर कष्ट करुन जिने तुला वाढवल । आयुष्याच्या संध्याकाळी तिलाच तू रडवल॥ध्रु॥ चिऊचा काऊचा घास करुन, जिने तुला भरवल । कड्या खांद्यावर घेऊन तुला, गावभर फिरवल । माझा बाळ्,माझा सोन्या म्हणून, गावभर मिरवल । नऊ महिने तुला आपल्या उदरी वाढवल...॥१॥ अनंत कळा सहन करून, तुला हे जग दाखवल । चिमुकल्या बोटला धरुन, चालायला शिखवल । खोकला येताच तुला, मधाच बोट चाखवल । तळहाताच्या फोडप्रमाणे जिने तुला वाढवल...॥२॥ तुझ्यासाठी तिने आपल, रक्त आटवल । शिक्षणासाठी तुला, चांगल्या शाळेत पाठवल । जीवनभराच दु:ख , आपल्या पोटात साठवल । स्वतःच्या स्वप्नांना तिने पायदळी तुडवल...॥३॥ सगळेच काय अगदी, श्रावण किंवा पुंडलीक नसतात। ज

वेरुळः भाग ३ (कैलास लेणी १)

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 17/04/2013 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
वेरूळः भाग १ (जैन लेणी) वेरूळः भाग २ (ब्राह्मणी लेणी) It is by far the the most extensive and elaborate rock-cut temple in India, and the most interesting as well as the most magnificent of all the architectural objects which that country possess.-- J.as.