Skip to main content

<ये दिल मांगे मिनिमल!>

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 07/05/2013 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मिपाकरहो, साचा तयार होता. शब्द बदलले. बघा जमलंय का? --------------------------------------------------------------------- जा ना घरी सत्तापिपासू नेत्या. जा..! माझे करोडो नागरीक वाट बघतायत.. त्या खर्‍या लोकशाहीची जी वर काढेल मला हजारो समस्यांतून.. भिरकावून टाकेल आडवं येणारांना करारी निर्णयांनी झेलेल आव्हानं अल्लद अनेक हातानी... आणि मी म्हणेन तिला तूच बनून रहा सत्ताधीश आता...! मी वाट बघते त्या लोकशाहीची, जी करेल मोकळे जनतेचे घुसमटलेले श्वास आणि नेईल मला प्रगतीच्या उंच शिखरावर.. अशी लोकशाही जिच्यामध्ये पुरून उरेल अन्न, द्रौपदीच्या थाळीसारखं...

अंड्याचे फंडे ७ - खादाडी

लेखक साळसकर यांनी मंगळवार, 07/05/2013 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
नाक्यावरच्या भटकंतीची ठरलेली वेळ, संध्याकाळच्याच आसपासची. तोच रस्ता, तीच दुकाने, आजूबाजुला भटकणारी तीच ती माणसं. पण आज संध्याकाळी मात्र एका मुलीला पाणीपुरी खाताना बघत होतो. तुम्ही तर रोजच बघत असाल नाही, पण राव ऐका तर पुढे. भैय्याने पाणीपुरी वाटपासाठी एक प्लेट तिच्या हातात धरताच तिने त्याच्याकडून एक चमचा मागून घेतला. आता त्या पाणीपुरीच्या गाडी कम स्टॉलवर "विठ्ठल शिंदे पाणीपुरीवाला, आमची कुठेही शाखा नाही" असे शुद्ध मराठीत लिहिले असले तरी विठठल भाऊंनी पाणीपुरीवाटप करायला हाताखाली एक भैय्याच ठेवला होता. कारण आपल्याकडे भैय्याचा हात लागल्याशिवाय पाणीपुरीतला खारटपणा जाणवत नाही ना..

कोकोनट कुकिज

लेखक सानिकास्वप्निल यांनी मंगळवार, 07/05/2013 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: १५० ग्राम बटर (रुम टेंपरेचरला असलेले) १५० ग्राम पिठीसाखर १ अंडे १ वाटी मैदा १ वाटी डेसीकेटेड कोकोनट . पाकृ: मिक्सींग बाऊलमध्ये बटर व पिठीसाखर एकत्र करून इल्केट्रीक बीटरने हलके होईपर्यंत फेटावे. त्यात एक अंडे फोडून पुन्हा फेटून घ्यावे. आतात त्यात मैदा व डेसीकेटेड कोकोनट हळू-हळू घालून मिश्रण स्लो स्पीडवर बीट करा. मऊसर पिठाचा गोळा तयार झाला की त्या

आवताण घेऊन आलोय. गावच्या जत्रेचं.

लेखक वसईचे किल्लेदार यांनी मंगळवार, 07/05/2013 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आज आवताण घेऊन आलोय. गावच्या जत्रेचं. सालाबादप्रमाणे याहि वर्षी वज्रेश्वरी (मौजे वडवली) यात्रा सुरु होतेय. यात्रा दोन दिवसांचि आहे. ९ मे ते १० मे. शनिवारी (११ मे) सकाळि बाजार ऊठायला लागतो. आम्हि त्याला फुटकी जत्रा म्हणतो. या फुटक्या जत्रेची एक न्यारीच बात आहे. कमी पैशात फिट्ट मजा म्हणजे फुटकी जत्रा. आदल्या दिवशी १०० रुपड्यांत मिळणारी गोष्ट अगदि ३०-४० रुपयांत. हां आता काल-परवा पर्यंत आमचे हिशेब (यात्रेचे बजेट) १०-२० रुपयांपुढे जात नव्हते म्हणा. तीन चार महिने खाऊचे पैसे टिनपाटाच्या गल्ल्यात साठऊन यात्रेदिवशी ऐटित फोडला जाई. (हो!

संक्षिप्त

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 07/05/2013 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
वेदनेचे रूप आहे हिमनगाची सावली वाटते ते बेट तरते नाळ कोणी पाहिली आंधळ्या हृदयास दिसते कोणतीही माउली अधिकतर अंदोलनांच्या सुप्त वेठी काहिली लाट भर आघात अगणित पेटलेल्या मैफिली भेटले अज्ञात कोणी शोधते मन चाहुली वेध व्याधाचे इथे जाळीत माया गुंतली जाळ शीतल कोपले आणि समिधा गोठली एकले हे युद्ध तरिही संगरी प्रश्नावली उत्तरे संक्षिप्त कलिका कोष झाकुन राहिली गंध मदनाचे अधूरे झुळुक अवचित थांबली वादळे उठली; मुक्याने ऐन भाषा संपली ............................अज्ञात
काव्यरस

नाच रे सुब्रा, अँबेच्या व्हॅलीत

लेखक मूखदूर्बळ यांनी मंगळवार, 07/05/2013 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
नाच रे सुब्रा, अँबेच्या व्हॅलीत नाच रे सुब्रा नाच ! सेबीशि वेडा झुंजला रे काळा काळा पैसा भिजला रे आता तुझी पाळी, वीज पडे भाळी वाचव सहारा नाच ! भरभर धाड पडली रे रायांचि भरली शंभरी रे पेपरात लिहू, जहिराती देऊ करुन ठणाणा नाच ! नवनव्या योजना(स्कीम) काढूया रे गुंतवणूकदारांस नाडूया रे करोडोंच्या नोटांत, केस लढु कोर्टात नवाबी लखनव्या नाच ! मिडीयाची गडबड थांबली रे तुझि माझि जोडी जमली रे जनपथी छान छान, श्वेत रंगी (हाय)कमांड कमांडीखाली त्या नाच ! चु भू द्या घ्या ____________________ मूळ अजरामर गाणे: नाच रे मोरा, अंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच ! ढगांशि वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आ

किवी आणि कांगारूंच्या देशांत ०५ : औराकी / माऊंट कुक – क्विन्सटाउन

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 07/05/2013 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

पौरुषाला आव्हान...!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 06/05/2013 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, आपले एक आदरणीय सभासद आणि माझे ज्येष्ठ स्नेही श्री रामदास.. अर्थात, मिपाकर रामदास.. फार पाल्हाळ लावत नाही.. पण एकच सांगतो की हा एक अफाट प्रतिभा असलेला परंतु तेवढाच अगम्य माणूस आहे.. त्यांचा माझ्यावर लोभ आहे, आमचा दोस्ताना आहे हे खरं तर माझं भाग्य.. परंतु आपले हे रामदासबुवा तसे थोडे दूर दूर राहणारे, वाटल्यास थोडे बुजरे म्हणुया.. त्यांनी एक अप्रतिम मुक्तक लिहिलं आहे..आणि आज त्यांनी मला ते सहजच दाखवलं..

युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 06/05/2013 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग १ युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग २ Simple, Free Image and File Hosting at MediaFire

टोरा ! टोरा ! टोरा ! अर्थात पर्ल हार्बर-३

नागुमोच्या इच्छेविरुद्ध जपानची युद्धाकडे वाटचाल चालूच होती.

वाड्यात.... १

लेखक गवि यांनी सोमवार, 06/05/2013 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
मराठे दूर गेली त्यानंतर वर्षही संपलं होतं, वर्ष संपलं होतं म्हणून कॉलेज संपलं आणि बाय डिफॉल्ट बेकारी सुरु झाली होती. त्या वर्षी कोणत्याही मुलीकडे मी बघितलं सुद्धा नाही. पुन्हा ते सगळं सुरु झालं म्हणजे..? मराठे दूर गेली म्हणून जाधवही दूर गेला आणि पाप्याही. शत्रूंचीसुद्धा सवय होते अशी विचित्र जाणीव झाली. गावात बसून काय करणार म्हणून आम्ही पोरंही शहरात आलो. आमच्यासाठी शहर म्हणजे येऊन जाऊन पुणे अन मुंबई. शहरात कुठेतरी कॉम्प्युटर शिकायचा असा प्लॅन होता.. परांजप्या आणि मी दोघेही एमसीए आणि तसल्या एंट्रन्स देऊन मार खाऊन बसलो होतो.