Skip to main content

आपला जल्मोजल्मी ऋणी आहे

लेखक देशपांडे विनायक यांनी मंगळवार, 14/05/2013 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
मोठ्या ,प्रसिद्ध ,VIP अशा लोकांचा परिचय वाचताना ते लोक किती DOWN TO EARTH आहेत याचा उल्लेख येतोच . ही व्यक्ती विशेष नसून त्यांच्या गुणांनी नम्र आहे हे दाखविण्याचा तो एक जाणीवपूर्वक प्रयत्न असतो . मध्यम वर्गातील माणूस विशेष कोणीतरी बनण्याचे गुण अंगी असूनही आहे तसाच राहिलेला दिसतो . मध्यम वर्गात जन्म घेतलेला ,मध्यम वर्गाचे संस्कार पाळणारा माणूस विशेष कसा बनणार ?तो तसाच राहणे हे खरे मध्यमवर्गीय संस्कार लक्षण .

ट्रेक करताना...

लेखक मोदक यांनी सोमवार, 13/05/2013 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
. "ट्रेकिंग" या अनुभवावर अनेक धागे येत आहेत. अनेक जण नवनवीन किल्ल्यांना भेटी देत आहेत ही चांगली गोष्ट आहे परंतु हे धागे वाचत असताना; ट्रेकर्सचे त्या त्या ठिकाणचे अनुभव वाचत असताना "धाडस आणि अनावश्यक धोका" या दोन गोष्टींमधला फरक लक्षात न घेवून अपघाताच्या अगदी जवळ जाणार्‍या काही घटना वारंवार दिसल्याने हा माहितीपर धागा. सर्वप्रथम - "मी निष्णात ट्रेकर नाही" त्यामुळे इथे दिलेले सल्ले / सूचना हे अत्यंत सामान्य परिस्थितीमध्ये लागू होण्यासारखे आहेत व माझ्या अनुभवातून आलेले आहेत.

किवी आणि कांगारूंच्या देशांत ०९ : मेलबर्नमधली भटकंती, कोलोनियल ट्रॅमकार रेस्तरॉ आणि पेंग्विन परेड

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 13/05/2013 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६...

पाकिस्तानात लोकशाही?

लेखक सचिन कुलकर्णी यांनी सोमवार, 13/05/2013 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
अंतिमत: पाकिस्तान मधल्या निवडणूक निकालांचे सूप वाजले आणि नवाज शरीफ यांची पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज ही पार्टी छोट्या पक्षांसामावेत आघाडी करून १३७ हा बहुमताचा जादुई आकडा गाठणार असे दिसतेय. पण लाख टके का सवाल है कि -नवाज शरीफ किती दिवस टिकणार ? मुशरर्फ प्रणीत लष्कर (मिलित्रि)त्यांना जास्त दिवस टिकू देईल असे वाटत नाही. आणि भारताबरोबर त्यांनी (खरोखरच) शांतता, सलोखा प्रस्थापित करायचा प्रयत्न केला तर त्यांची गच्छन्ति निश्चित आहे. अर्थात ते पण लवकरात लवकर मुशरर्फला लटकवायचा पूर्ण प्रयत्न करतील. ISI चे पंख छाटणेदेखील तितकेच आवश्यक आहे.

मारा डंख मारा डंख मारा बिछुवा, मिपाप्रवेशाकांक्षिण्यांची गोची आणि आमची काशीयात्रा

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 13/05/2013 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
"ओ मारा डंख मारा डंख मारा बिछुवा… तोहरे प्यारके जहर चढे मितवा…" 'अपनीही मस्तीमे झूमते हुए' का काय म्हणतात तसा, आपल्याच धुंदीत, द्रुतगतीनं पायडिलं हाणत, गाणं म्हणत मी घराकडे सायकलत होतो.पोटात भूक खवळली होती आणि केंव्हा घरी पोचून वेगवेगळ्या मस्त रेसिप्या हाणतो, असं झालं होतं. आजची संध्याकाळ माझ्यासाठी 'ये शाम मस्तानी मदहोश किये जा… ' अशी ठरली होती.… दुपारी मला जेंव्हा बायकोनं सांगितलं की "अहो, आज संध्याकाळी पाच ते साडेआठ तुम्ही कुठेतरी एकटेच फिरायला जाउन या" तेंव्हा मी आश्चर्यानं विचारलं, "का गं, आज अचानक एवढी मेहेरबान कशी झालीस माझ्यावर?

L B T म्हंजे नक्की काय आहे?

लेखक निश यांनी सोमवार, 13/05/2013 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या L B T वरुन फार गोंधळ चाललेला आहे. व्यापारी व सरकार ह्यांच्यातील वादावादीत आम जनता फार मोठ्या प्रमाणात भरडली जात आहे. तर L B T म्हंजे नक्की काय आहे? तो कश्या प्रकारे लागु होणार आहे. जकात मग साफ बंद होणार आहे का? आम जनतेला ह्याचा काही उपयोग होणार आहे का? अस कानावर आल आहे की L B T मुळे वस्तुंच्या दरात वाढ होणार आहे ते कितपत खर आहे. ह्याबद्दल माहीती मिळाली तर हवी आहे. L B T चा भरणा कसा करावा लागेल ह्या बद्दलही माहीती हवी आहे.

मामाचं गाव (आजोबा)

लेखक दशानन यांनी सोमवार, 13/05/2013 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
वाड्याबाहेरील जग सुट्टीमध्ये फक्त कोणी मोठं सोबत असेल तरच पाहता यायचे एवढे कडक निर्बंध लहान मुलांच्यावर होते. रोज संध्याकाळी व्हासा झाल्यावर आजोबा आपली छडी घेऊन बाहेर पडत. ती छडी म्हणे त्यांनी पार्श्वनाथजीला* जाऊन ११ वेळा भगवान पार्श्वनाथ यांचे दर्शन घेतले म्हणून तेथील महाराजांनी भेट दिली होती. आजोबा वाड्यातून बाहेर पडायला लागले की जे कोणी लहान जवळ असेल, मग अक्का असो, सन्मती असो, सरु असो की मी असो. त्यातील एकाला सोबत घेऊन जात. त्यांचा हा रिवाज माहीत असल्यामुळे ते व्हासा करायला बसले की मी त्यावेळे पासून ते बाहेर पडण्यासाठी मोठ्या दरवाजाजवळ येवू पर्यंत मी त्या दरवाज्या जवळच घुटमळत असे.

पौष्टिक कटोरी चाट

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 13/05/2013 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार लोक्स, कसं चाललय? चाट हा बहुतेकांच्या आवडिचा प्रकार. ह्या प्रकारात जरा नविन काय हे बघण्यासाठि जालमोहिम हाती घेतल्यावर 'कटोरी चाट' हा जरा वेगळा प्रकार पाहिला. फोटो पाहिल्यावर करुन बघायची खुमखुमी काय स्वस्थ बसुन देत नव्हती. पण मुळ पाककॄतीमधे बटाट्याच्या कच्च्या किसाची कटोरी दिली होती आणि ती करणं जsssssरा तापदायक आहे. शिवाय त्यात चटण्या/दहि पडल्यावर खाताना कदाचीत सगळा लगदा होउ शकतो म्हणुन हि शक्कल लढवली. अशीच मैद्याची सुद्धा कटोरी करु शकतो पण मैद्या पेक्षा हेल्दि ओट्स केव्हाहि चांगले नाहि का? ह्या शिवाय नाचणी, ज्वारी-बाजरीच्या पीठाची पण कटोरी करु शकता.

मायक्रोवेव्ह ओव्हन्सचा उपयोग-मदत ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 13/05/2013 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मंडळी खूप दिवसापासून काथ्याकूट लिहितो पूर्वपरिक्षणापर्यंत जातो आणि पुन्हा धागा कशाला काढायचा असा विचार करुन पुन्हा धागा क्यानसल करायचो. पण आज रहा न गया. मंडळी, माझ्याकडे एल.जीचा मायक्रोव्हेव ओव्हन आहे. त्याच्या उपयोग कसा करावा ते काही समजत नाही. एल्जीचे मॅन्युअल पाठ होत आले आहे, पण त्याचा नीट उपयोग अजून करता येत नाही. एलजी माओ मधे विविध प्रकारचे अ‍ॅटोमॅटीक असे फंक्शन्स आहेत. पण, गेली काही वर्षापासून मावेओ चा उपयोग फक्त पापड भाजण्यापूर्ताच केला आहे. मायक्रोव्हेव ओव्हन्स उपयोग कसा करावा त्यासाठी तुनळीवर अनेक धागे पाहिले, गुगलून पाहिलं.

रक्त आटते जनतेचे

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 13/05/2013 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
रक्त आटते जनतेचे

रक्त आटते जनतेचे, देश सुंदर घडवायला
एकटा रावण पुरेसा, राज्य धुळीत मिळवायला

जे हुजरे पाळलेस तू, सर्व खाण्याचे पाईक
ढेकर देणे झाले की, ते बघतील सटकायला

सारे काही सवलतीत; धान्य, इंधन, साखर, तेल
कोण तयार होईल मग, इथे हाडे झिजवायला

निघून गेलेत शहाणे, सर्व ’साहेब’ बनायला
मूर्ख आम्ही उरलो इथे, मोफत अन्न पिकवायला

टाळले होते फुलांनी, आयुष्यभर भेटायचे
आज मात्र सडा पडलाय, मस्त तिरडी सजवायला