Skip to main content

बालक पालक आणि मी

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 17/05/2013 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
बाप हे दोन प्रकारचे असतात...!! एक बाप तो असतो जो घरी यायची वेळ होताच मुले त्याच्या धाकाने खेळमस्ती दंगागाणी बंद करून अभ्यासाचे पुस्तक उघडून बसतात. तर एक बाप तो असतो जो घरात शिरताक्षणीच त्याची मुले आनंदाने नाचत बागडत येऊन त्याला बिलगतात. शेवटी आपले स्वत:लाच ठरवायचे असते की आपल्याला यातला कोणता बाप बनायचे आहे....!! .............मी एका तत्ववेत्याचा आव आणत, सहा घरची पोरे सांभाळली आहेत अश्या आविर्भावात बायकोला प्रवचन देत होतो. मात्र तिला माझी ही बकबक नाही तर माझ्या तोंडून माझे लहाणपणीचे किस्से ऐकायचे होते. चूक माझीच होती.

एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !

लेखक जॅक डनियल्स यांनी शुक्रवार, 17/05/2013 03:54 या दिवशी प्रकाशित केले.
(मी पुण्यात असताना, सर्पोद्यानचे सहा वर्ष काम केले, तेंव्हाचे अनुभव संघटीत करून लिहित आहे. हा लेख पूर्वी (दोन वर्ष) माझ्याच कट्ट्यावर (ब्लॉग) प्रकाशित झाला होता, त्यानेच मी या अनुभवांची सुरुवात करत आहे.) आत्ता अमेरिकेमध्ये मला कोणी नवीन पुण्याचे भेटले की माझा त्यांना ठरलेला प्रश्न असतो "तुम्ही पुण्यात कुठे राहतात?" तुम्हाला वाटेल काय साधा प्रश्न आहे . पण तसं नाही. ते जेंव्हा उत्तर देतात तेंव्हा मी त्यांच्या शब्दांबरोबर पुण्याच्या रस्यावर फिरत असतो.

किवी आणि कांगारूंच्या देशांत ११ : अ‍ॅलिस स्प्रिंग्ज १ - हवाई वैद्यकीय सेवा आणि आउटबॅक डिनर

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 17/05/2013 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६...

कोल्हापुरी चटणी (कांदा-लसूण-मसाला तिखट)

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 16/05/2013 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
( सदर धागा श्रेष्ठ अन ज्येष्ठ मिपाकर बल्लव मा. श्री. गणपाभौ याना अर्पण !! ) मागे स्मिताताई चौगुले यांनी कांदा-लसूण मसाला ही पाकृ दिली होती. आमच्या कोल्हापूर भागात ही कांदा-लसूण चटणी थोड्या वेगळ्या पद्धतीने करतात म्हणून ही पाकृ . अभ्यासू मिपाकर बल्लव अन सुगरणी यांच्या माहितीप्रीत्यर्थ. साधारणत: मे महिन्यात आमच्या कोल्हापूर सांगली भागात गल्लोगल्ली कांडप मशिनांचा ठणठणाट जोरात ऐकू येत असतो. घरोघरी बायकांची पावसाळ्याची बेगमी सुरु होते. पापड कुरडया, सांडगे यांच्याबरोबरच एक महत्वाचा विषय म्हणजे चटणी. एकदा पावसाला सुरु झाला की चटणी करायला मिळत नाही. कारण दमट हवेत केलेली चटणी टिकत नाही.

पोरगं अभ्यासच करत न्हाय राव !

लेखक १००मित्र यांनी गुरुवार, 16/05/2013 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
मी काही वर्षांपूर्वी क्रेट्स विकायचो.[माझ्या बहुविध उद्योजकतेचा आणखी एक [अ]यशस्वी टप्पा !- हा हा हा ! तेव्हा एकदा संगमनेरला गेलो, सक्काळी-सक्काळी मार्केट-यार्डला पोचलो. थेट एका दुकानात शिरलो. दुकानात एक लहानसं- ९-१० वर्षांचं पोरगं होतं. आम्ही जरा इकडे-तिकडे घुटमळतोय असं दिसल्या-दिसल्या त्याचा प्रश्न :- "कॅरट विकता काय ?" "हो, मालक कुठेत" -- माझा व्यवहारी, मॅच्युअर्ड प्रश्न ! चक्क दुर्लक्ष करून तो पुढे :- "किती ग्राम ?

सेकंड लाईफ - भाग २

लेखक अक्षरमित्र यांनी गुरुवार, 16/05/2013 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
सेकंड लाईफ आता तसं बघीतलं तर माझे आयुष्यातला सेकंड लाईफ हा भाग एखाद्या हिंदी थ्रीलर पे़क्षा मुळीच कमी नाही. पण चित्रपटात २.३०-३.०० तासांत वेगवान घडामोडी घडतात त्याच वेगाने खरोखरीच्या आयुष्यात घडत नाहित. सेकंड लाईफच्या विश्वात जाण्याअगोदर मी तुम्हाला माझ्या फर्स्ट लाईफच्या फ्लॅशबॅकमधे घेऊन जाणार आहे. मी पहिल्यापासूनच थोडासा अबोल, सहजासहजी माणसांत न मिसळणारा आहे. थोडासा रिझर्वच म्हणाना !

.....वाहवा.....

लेखक चाणक्य यांनी गुरुवार, 16/05/2013 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
मी तुझ्या डोळ्यात काही पाहिले होते बहुधा भास ते माझ्या मनातले होते कितीदा मी स्वतःलाच समजावतो फायदे मिळाले ते तहातले होते फुलवायचे तुला जे चार भिंतीत होते स्वच्छंद ते फुल रानातले होते विचारे का हसलो तिला एकटे पाहून मी सुख ती दुस-या कुणाची नसण्यातले होते मिळविली वाहवा माझिया गज़लांनी खरे ते दुःख काही उरातले होते
काव्यरस

स्ट्फ्ड ब्रॉकोली पराठे

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 15/05/2013 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः नेहमीप्रमाणे पोळ्यांचे/ चपात्यांचे कणिक जसे तेल, मीठ घालून भिजवून घेतो तसे भिजवून घेणे. छोटा गड्डा ब्रॉकोली - फक्त तुरे किसून घेणे १ टेस्पून किसलेले आले १ टेस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची (मिरचीऐवजी लाल तिखट आवडीप्रमाणे कमी-जास्तं घालू शकता) १ टेस्पून भाजलेली जीरेपूड १ टेस्पून धणेपूड १ टेस्पून अनारदाना पावडर (तूम्ही आमचूर पावडर ही वापरु शकता) मीठ चवीप्रमाणे बारीक चिरलेली कोथींबीर पराठ्यांना वरुन लावायाला तूप / बटर

सेकंड लाईफ

लेखक अक्षरमित्र यांनी बुधवार, 15/05/2013 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! मी योगेश. ही कथा आहे माझ्या सेकंड लाईफ ची. लहानपणापासूनच मला वाचनाची फार आवड. इतकी मी ठरवूनच टाकले की मोठे झाल्यावर आपण पेपरस्टॉलच टाकायचा. का ? तर धंद्यापरीस धंदा होईल आणि सगळे पेपर, मासिके, दिवाळी अंक फुकटात वाचता येतील. मराठी लेखक वाचता वाचता नंतर कंटाळा येऊ लागला. पुढे पुढे तर मला इंग्रजीतुन मराठीत अनुवादीत झालेल्या कादंबर्‍याच आवडू लागल्या. त्यातल्या त्यात गुप्तहेरांच्या रहस्यमय कथांनी तर माझ्या मानाची पुरतीच पकड घेतली. त्यातील हेरांचे दुहेरी जगणे मला हळुहळू आवडू लागले.