अननसाचा मुरांबा
चिकू,संत्र,मोसंब,द्राक्ष या फळांपेक्षा हटके दिसणारं चवीला आंबट गोड पण मधूनच खाजर असं फळ; अननस! मला कायम या फळाविषयी वेगळंच आकर्षण वाटतं. मुळात शेतामधला त्याचा look खूप attractive असतो. अख्ख्या झुडपाच्या बरोबर मध्ये अननस उगवतो. बऱ्याच जणांना त्याच्या खाजऱ्या चवीमुळे तो आवडत नाही. लहानपणी अननस पाहून नाक मुरडलं तर तो खाण्याचा एक फायदा हमखास कानावर पडे. तो म्हणजे असा की अननस खाल्याने पोटात केस वगैरे गेला असेल तर तो विरघळून जातो.
दक्षिण अमेरिकेमध्ये जन्मलेलं हे फळ कित्तीतरी juices, mocktails मध्ये सर्रास वापरलं जातं. आपण सुद्धा अननसाचा रायता, हलवा किंवा cake, jam, मुरांबे असे विविध पदार्थ करतो.
सह्याद्रीचे सर्वोच्च टोक : कळसूबाई
यावर्षीच्या मान्सूनला सुरुवात झाली आणि आम्ही पंधरा दिवसाला किमान एक याप्रमाणे सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या गड-शिखरांवर चढाई करण्याचे ठरविले.
मनरक्षिता (३)
मनरक्षिता (१)
मनरक्षिता (२)
सकाळी उठल्यावर चैतीला सपान आठवलं. अंघोळ वगैरे आवरून आज्जीने दिलेला डबा घेतला अन भीत भीतच ती शाळेत गेली.
मास्तर अजून शाळेत आला नव्हता !
तासाभरानं महादू शिपाई सांगत आला. ‘पोरानु, मास्तरला फाटेच्या पारी लकवा मारलाय. एक हात अन एका बाजूच्या अंगावरनं सगळं वारं गेलंय. उठायसुदिक यीना झालंया..!!
‘हुर्रे’ करून सगळी पोरं उधळली.
चैती सपान आठवत घरी आली. पण कुणालाच सपनाबद्दल काय बोलली नाही. आज्जीला सुद्धा !
चार दिवसांनी शाळेत नव्या बाई हजर झाल्या. हसऱ्या, गोड बोलणाऱ्या.
गट्टा पुलाव
राजस्थानी खाद्यमेळाव्यात या आठवड्यात आपण गट्टा पुलाव शिकणार आहोत. जालावरील पाककृती पाहून व मारवाडी मैत्रिणीच्या बहिणीचे सल्ले घेऊन ही कृती बेतलेली आहे.
साहित्य: एक मोठी वाटी बासमती तांदूळ, तूप, पाणी, मीठ, आले, हिरवी मिरची, एक छोटी वाटी डाळीचे पीठ (बेसन), हळद तिखट, बडीशेपेची पूड, धण्याची पूड, गरम मसाला, कांदा, हिंग, दालचिनी, मसाला वेलची, मिरे, लवंग, कढई, व झाकणासाहित पातेले.
कृती: प्रथम तांदूळ धुवून ठेवावेत . अर्ध्यातासाने दुप्पट पाणी, किंचित मीठ व तूप घालून मऊ, मोकळा भात शिजवून घ्यावा. बेसनात तिखट, मीठ चवीप्रमाणे घालावे. एक टेबलस्पून तेलाचे मोहन घालावे.
प्रतिबिंब
तळ्यात डोकावतांना
दिसत होते प्रतिबिंब ।
काही होते माझे , अन काही माझे पण
तुला समजावून सांगण्याचे वेडे हट्ट
अन तुला गमाविल्याचे कारण….
सर्वकाही …
का मिटावे तू पान असे
अलगद पुसावी झोप
पडताच थेंब मग
खेळ उथळ तरंगांचे
मन मात्र ओले
शोधण्यात प्रतिबिम्ब.….
कधी माझे , अन कधी माझे पण …!
बिग ब्रदर इज वॉचिंग.............
विकिलिक्सच्या नंतर अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचा कारभार जगातील तमाम जनतेसमोर आणणारा एडवर्ड स्नोडेन ला भारतीय माध्यमांनी तितकीशी प्रसिद्धी दिल्यासारखे वाटले नाही. याचे कारण काय असावे ?
एडवर्ड स्नोडेनने आतापर्यंत २१ देशांच्या सरकारांकडे आश्रय मागीतला आहे मात्र व्हेनेझुआला या छोट्या देशाव्यतीरीक्त इतर कुणीही त्याला होकार दिल्याचे आढळले नाहीये.
खरेतर अमेरिका आपल्या देशावर देखील हेरगिरी करते हे प्रत्येकाला माहित आहे मात्र त्यांच्याशी उघड पंगा घेणे शक्य दिसत नाहीये. मग टिचभर व्हेनेझुआलाकडे ही ताकत (हव तर मग्रुरी किंवा मुर्खपणा म्हणा) आला कोठून ?
आता एडवर्ड स्नोडेनचे पुढे काय होते ते पहायचे.
आश्चर्य...यूपीएकडून रालोआला श्रेय!
कोर्टात प्रतिज्ञापत्र भरताना कबुली द्यायला लागली.
एखाद्या छोट्याशा गावात झालेलं छोटेखानी विकासकाम असो किंवा देशपातळीवर साकारलेला मोठा प्रकल्प असो, त्याचं श्रेय लाटण्यासाठी काँग्रेस आणि भाजपची मंडळी एकमेकांच्या उरावर बसल्याचं आपण कैकदा पाहिलंय. पण, यूपीएनं देशातील रस्तेविकासाचं श्रेय आज खुलेपणानं भाजपप्रणित रालोआ सरकारला देऊन सा-यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
गेल्या ३२ वर्षांत देशात राष्ट्रीय महामार्गाचा जेवढा विस्तार झाला, त्यातील अर्धा भाग माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात बांधला गेल्याची कबुली केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिली आहे.
तांदळाची उकड
साहित्यः
१ वाटी तांदुळ पिठी
१ वाटी आंबट ताक
१ वाटी पाणी
२-३ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
२-३ लसूण पाकळ्या ठेचून
१ टीस्पून मोहरी
१ टीस्पून जीरे
१/४ टीस्पून हिंग
कढीपत्ता
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथींबीर
पाकृ:
कढईत तेल गरम करून मोहरी + जीरे + हिंग + कढीपत्त्याची फोडणी करा.
त्यात हिरव्या मिरच्या व ठेचलेले लसूण घालून परतून घ्या.
आता त्यात ताक, पाणी व चवीप्रमाणे मीठ घालून उक
प्रपोजल
सूचना: ज्यांना हे नाटक पहायचे आहे त्यांनी हा लेख आधी वाचू नये.
ह्या नाटकाला २८ पारितोषिके मिळाली आहेत आणि टीकाकारांनी उचलून धरले आहे, अशी बरीच ख्याती कानावर आली होती. त्यामुळे हे नाटक बघायचे असे मनाशी ठरवले होते. त्याप्रमाणे, एकदाचा, एका रविवारी मुहूर्त मिळाला. तिकीटे काढल्यावर लक्षांत आले की डॉ. अमोल कोल्हे, आता काम करत नसून त्यांच्या जागी कोणी 'आस्ताद काळे' काम करतात.
मिसळपाव