बाळूचे स्वप्न - (बाल कविता)
सशाने धरले सिँहाचे कान
गरगर फिरवून मोडली मान ।
शेळीने घेतला लांडग्याचा चावा
लांडगा ओरडला-धावा धावा ।
मुंगीची ऐकून डरकाळी कानात
हत्ती घाबरून पळाला रानात ।
कासवाने लावली हरणाशी शर्यत
हरीण दमले धापा टाकत ।
उंदराने बोक्याच्या पकडून मिशा
काढायला लावल्या दहा उठाबशा ।
बाळूने मोजले दोन सात चार
स्वप्नात बाळू मोजून बेजार !
'
काव्यरस
पत्रास कारण की… (कथा)
ते दिवस मला आजही जसेच्या तसे आठवतायत. त्यावेळी ब-याच पोस्टल कर्मचा-यांच्या बदल्या झाल्या होत्या. माझी ही झाली आणि माझं संकट आणखी मोठं झालं. उतार वयामुळे माझ्या आईची तब्येत खूप खालावली होती. पण नशिबाने मला माझ्या त्या वेळेच्या राहत्या घरापासून तसं जवळच हलवलं गेलं. मी मूळचा राजापूरचा. राजापूर कोंकणातलं एक टुमदार गाव. आता त्याला शहर अशी ओळख मिळाली असेल, पण १९८९ मध्ये ते एक गावच होतं. माझी बदली भांबेडला झाली होती. भांबेड तसं खूप छोटं गाव, पण आजूबाजूच्या दुर्गम भागात तेच एक मोठं.
भांबेड आणि आजूबाजूची पाच-सात गावं सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेली. कोंकणाचा पूर्वेकडील अगदी शेवटचा भाग.
आधीन
ओठात माणसांच्या पोटातले उखाणे
मेघात चांदण्यांचे संकेत आड गाणे
आधीन ओघळांच्या वाहे उदंड पाणी
एकांत सागराची पागोळते विराणी
थेंबास थेंब भेटे वाटेत पथिक गोटे
ओसांड अंतराचे पथ सोडुनी समेटे
कधि कुंपणे तळ्याची प्रतिबिंब अंबराचे
साकेत भ्रामकांचे अंदाज थेट खोटे
सारे खरे परंतू हृदयी उलाल कोणी
मातीत सांडलेले उगवे फिरून अवनी
संजीवनी जणू ही गत सुप्त भावनांना
आशा अजून वेडी संदेश हा पळांना
........................अज्ञात
काव्यरस
'बिग डेटा' - म्हणजे काय रे भाऊ?
आज तंत्रज्ञानाचा वेग आणि झपाटा इतका आहे की त्या वेगाने बावचळूनच जायला होते. त्यात सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या सगळ्या ‘दादा’ कंपन्यांना 'मार्केट शेयर'वर ताबा मिळविणे गरजेचे असल्याने त्यातली स्पर्धा अतिशय जीवघेणी झालेली आहे. त्यामुळे ‘टाइम टू मार्केट’ ह्याला इतके महत्त्व आले आहे की थोडा उशीर झाला तर स्पर्धेतून बाहेर फेकले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे मग एखादी संकल्पना घेऊन बाजारात त्यावर आधरित एक गरज निर्माण करून, त्यावर आधारित प्रॉडक्ट्स बनवून ती विकण्यासाठी ‘बाजारपेठ’ तयार करण्याचे काम ह्या बलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्या नेमाने करत असतात.
वारी......
दर आशाढी कार्तिकी एकादशी ला पंढरपूर ला वारी निघते. लाखो लोक वारीत सामील होतात.
आषाढी वारीला जायचे म्हणजे खरेतर शेतात पेरणीचा हंगाम ऐन बहरात असतो. नुकतीच पेरणी झालेली असएत व्हायची असते अशातच शेतकरी कामेधामे सोडून वारीला जातात.
त्यांच्यासाठी वारी हा एक विरंगुळा असतो. पण त्यामुळे कामे रखडतात / शासन यंत्रणेवर अवास्तव ताण येतो. कारण नसताना शासन यंत्रणेला सुरक्षा यंत्रणेला राबवले जाते. लोकांचाही वेळ वाया जातो.
खरेतर हिंदु धर्मात वारी देव दर्शन या वैयक्तीक गोष्टी मानलेल्या आहेत.
सरकारी नोकर
वेळेवर येईना कधी
कामाला कधी मधी
पगाराला सर्वात आधी
तो सरकारी नोकर॥१॥
फाईल्स टाकी ऐसपैस
काम करी सावकास
टेबलाखालुन घेई पैस
तो सरकारी नोकर॥२॥
पैसे घेऊन काम न करी
पार्टीला बोलवी घरी
नेहमीच अपेक्षा धरी
तो सरकारी नोकर॥३॥
जेवण करून झाकी डोळे
कधी चार वाजताच पळे
घरी जाऊन नुसता लोळे
तो सरकारी नोकर॥४॥
वाटेल तेंव्हा घेई रजा
खाऊनपिऊन करी मजा
म्हणे साहेब आहे माझा
तो सरकारी नोकर॥५॥
काम चुकार एक नंबर
काम थोडे बोले फार
टाकी दुसर्यावरी भार
तो सरकारी नोकरी६॥
साहेबांची हाजी हाजी
सह-कार्यांची नाराजी
रोज बातमी सांगे ताजी
तो सरकारी नोकर॥७॥
युनियनचा पदाअधिकारी
काम कधीच नाही करी
वाटेल तेंव्हा जाई घरी
तो सरका
स्प्लीट टोनिंग ( विषय :- व्यवसाय )
मंडळी कॄष्ण-धवल छायाचित्रण करण्यात मजा येते तसेच याच कॄष्ण-धवल चित्रांना हलक्या रंगाची छटा दिल्यास त्यात अजुन वेगळेपणा देखील आणता येतो... हेच स्प्लीट टोनिंग करण्यामागचा उद्देश असतो.मूळ चित्र आणि चित्रातल्या सावल्या यांना विविध कलरटोन मधे आणल्यास छायाचित्राला एक प्रकारचा वेगळेपणा येतो.
मी मात्र संपूर्ण चित्रालाच एकाच टोन मधे ठेवले आहे, फक्त कलरटोन वेगवेगळे वापरले आहेत. तुम्ही सुद्धा ही पद्धत एकदा वापरुन पहाच...
श्राद्ध
...आता एक घाव दोन तुकडे केल्यावर,
आपापल्या वाट्याचा रक्तबंबाळ तुकडा
जगापासुन लपवणे आलेच !
सोबत ठिबकणाऱ्या आठवांचा ओला हुंदका
आतल्याआत पोसणे आलेच..
य़ापेक्षा
जपली असतीस नात्याची अडखळती धडधड,
दिले असतेस थोडे श्वास ,
फुंकला असतास थोडा प्राण !
अगदिच वटवृक्ष झाला नसता,
खुरटेच ऱाहिले असते झाड ...तरिही ,ते फक्त तुझे नि माझे !
... आता
य़ा कलेवऱाचे दरक्षणी श्राद्ध करणे आलेच...!
डॉ. सुनील अहिरऱाव
मिसळपाव

