Skip to main content

दाल बाटी.

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 10/07/2013 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
किती वर्ष झाली बरं? बाळ्या दोन वर्षाची असेल. तेंव्हा, तेंव्हा गेलो होतो आम्ही राजस्थान पहायला. ithe तिथल्या सरदारांनी आपापल्या हवेल्या आता हॉटेल म्हणुन वापरायला सुरवात केल्याने आम्ही शाही पाहुणचार घेत फिरत होतो अस म्हणायला हरकत नाही. तर चितोड मध्ये एका रिक्षावाल्याला मी आपल माझ्या बडबड्या स्वभावानुसार विचारल राजस्थानात त्यांच अस वैशिष्ट्यपुर्ण अस खाणं कोणत? म्हणजे आपली कशी झुणका-भाकर तस काही? तर त्याने सुचवली दाल-बाटी.

जिंदगी जम चुकी है अब

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 10/07/2013 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
थोडी प्रस्तावना: बर्‍याच वर्षांनी हिंदी मध्ये काहीतरी सुचले (असं फार क्वचितचं होतं). म्हटलं इथे प्रकाशित करावे पण मग विचार केला हे बरोबर नाही. मिपा हे मराठी भाषेला वाहिलेले जास्वंदी फुल आहे. मग याच रचनेचा मराठीत अनुवाद केला. मला स्वतःला फारसा भावला नाही पण पहिला प्रयत्न म्हणून चालु शकेल असे वाटले. खरंतर अनुवाद किंवा भावानुवाद हा माझा प्रांतच नाही. त्यातल्या त्यात इतर कोणाही कवीची रचना असेल तर काही खरं नाही. हिंदीतली रचनाही माझीच असल्याने हिंमत करतोय.

शब्दबेवडा

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 09/07/2013 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
               शब्दबेवडा

आयुष्याच्या वळणावरती जेव्हा पुरता दमून गेलो
पोट बांधले पायाशी अन् हात हवेचा धरून गेलो

हळवे अंतर खुणवत होते, "संपव जगणे" सांगत होते
मग्रुरीच्या पोटासंगे दडून गेलो; जगून गेलो!

ऐश्वर्याला दिपून इथल्या बघता बघता 'बटीक' झालो
सीता शोधणे भुलुन गेलो! अशोकवनात रमून गेलो!!

अनुभूतीचा सुसाट वारू शब्दामधुनी उधळत गेलो
व्यवस्थेशी 'भिडणे' सोडून शब्दबेवडा बनून गेलो

न ठहरे किसी मंजिल पर शब होने तक

लेखक निनाव यांनी मंगळवार, 09/07/2013 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
उर्दू /हिंदी लिहिल्या बद्दल क्षमस्व. गझल हा विषय अजून शिकतो आहे, तेंव्हा चूक असल्या वर माफी असावी न ठहरे किसी मंजिल पर शब होने तक कोई क्या लगाये इल्जाम हम पर सहर होने तक क्यों जीए और कितना बेमक्सद है अब रतीब मालाल ये है कि हुए रुखसत जफर होने तक खंजर भी रोया होगा दिल से गुजरते वक़्त खैर, दोस्त क्या वो जो ना लगा हो सीने तक क्या सोच रहे हो, सोए रहो अब बेनाम न लौटेगी सांस सफर के खतम होने तक

काय आहे आमच्याकडे ?

लेखक चाणक्य यांनी मंगळवार, 09/07/2013 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
रंग नाही रूप नाही, काय आहे आमच्याकडे सौंदर्याला तुझ्या द्यायला, न्याय आहे आमच्याकडे ओळखीचे असेल तुला ते, हुरहुरणे पावसातले सांगूच का तुला त्याचाही, उपाय आहे आमच्याकडे ना सुगंध ना वारा, ना पाऊस ना गारा शहारण्या तुला या सर्वांना, पर्याय आहे आमच्याकडे मस्तीत तुझिया आम्ही, बेदुंध होऊ ऎसे उधळून टाकू सारे, जे काय आहे आमच्याकडे लिहशील तूही काही, कविता पावसा-धुक्यावर घेशील जेव्हा भरभरून, जे काय आहे आमच्याकडे कुठवर ऎकशील वेडे, गोष्टी तू ज्या अनुभवायच्या ये इष्क कर जरासा समजेल, काय आहे आमच्याकडे
काव्यरस

माझी पहिली कविता

लेखक रसिका तिलेकर यांनी मंगळवार, 09/07/2013 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या ओठांच्या कळीवर फुलंलेल हसु म्हणजे तु... माझ्या बंद पापण्या मधे तु.... मी डोळे बंद न करता पाहिलेले स्वप्न म्हणजे तु... माझ्या श्वासात भिनलेला गंध म्हणजे तु... माझी प्रेरणा तु.... माझा आत्मा तु... मी म्हणजे फक्त तु अणि तुच...

लोहगडाची जत्रा

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 09/07/2013 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
लो. ह. गड - लोकांमध्य॑ हरवलेला गड. परवा लोहगडाच्या जत्रेला गेलो होतो. दुस-यांदा. पहिल्यांदा गेलो होतो ते मागच्या वर्षी. पावसाळ्याच्या नंतर. पण ती जत्रा नव्हती. तेंव्हा त्याचं ते हिरव्या गार रंगात नटलेलं रूप बघून, चिलखती, दणकट असं रूप बघून भारावून गेलो होतो. खूपच रंजक झाली होती ती भेट. दुस-या भेटीचा अनुभव मात्र वेगळा होता. आम्ही पोहोचलो तेंव्हा प्रथमदर्शनी दिसली ती केवळ गर्दी. एक क्षण वाटलं की आपण बार मधे वगैरे आलो आहोत की काय!, कारण दारूच्या बाटल्या हातात घेऊन टोळकी वावरत होती.

मेंदू

लेखक drsunilahirrao यांनी मंगळवार, 09/07/2013 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
विचार असे ...मग़ तसे आणि कसेही.. इथे -तिथे ,घऱात , रस्त्यात , ऑफिसात भुणभूण भुणभूण ; मेंदू नुसता ठसठसतो ! कायच्या काय अंतर्बाह्य घुसळण. प्रवास कुठुन कुठे .. कुठेच्या कुठे. कसलेकसले मेंदूइतके क्लिष्ट संदर्भ: धुसर, गडद ,काळे, निळे ,हिऱवे ,भगवे; मिसाईलसारखे धावून येतात अंगावर ! दीर्घ युद्धातली वाताहत झाल्यावर अखेर तू भेटतेस : विचार तिथेच अडतात, गुंततात , विसाव्याला थांबतात ...! मी शिणलेला मेंदु टेबलवऱ काढुन ठेवतो ! - डॉ. सुनील अहिरराव http://aaskmed2.blogspot.in/2013/07/blog-post_8.html

सुख

लेखक अनिल आपटे यांनी मंगळवार, 09/07/2013 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यभर सुखाकरिता धडपडणे किंवा त्याचा शोध घेणे हा माणसाचा आवडता छंद असतो. त्याचे अवघे आयुष्य या धडपडीत निघून जाते. पण नेमके सुख कशात असते हे त्याला समजत नसते. नेमके काय केल्याने सुख मिळेल हे त्याला समजत नसते. बालपण खेळण्या बागडण्यात, तारुण्य विषयोपभोगात तर वृद्धत्व माणसाला रोग व चिंता यांनी ग्रस्त अवस्थेत नेउन सोडते. त्यामुळे मिळालेले सुखाचे क्षण उपभोगणे हेच योग्य. कारण मनुष्य स्वभाव असा आहे कि सुखाचा सहवास घडला तर त्याचा प्रत्यक्ष आस्वाद घेण्याऐवजी ते ओसरून तर जाणार नाहीना या काळजीने मन काळवंडून जाते म्हणून सुखात डुंबता आला पाहिजे. शेवटी सुख हे मानण्यावरच असते नाही का?

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (५)

लेखक तुमचा अभिषेक यांनी मंगळवार, 09/07/2013 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसभर पायाला भिंगरी लावलीय, असे धावपळीचे आयुष्य आम्हा मुंबईकरांचे. संध्याकाळी परतताना मात्र पळत सुटायचे काम ट्रेनवर सोपवून आम्ही निवांत बसतो.. नेहमीचेच कंपार्टमेंट, अन आवडीचीच जागा, पण नेहमीच काही गप्पा मारल्या जात नाहीत किंवा पुरेश्या मारून झाल्या की आपापल्या आवडीनुसार हाताला चाळा अन बुद्धीला खाद्य पुरवायला सुरुवात होते. ती मोबाईल गेम्स उघडते, तर मी माझ्या तोडक्यामोडक्या ईंग्रजीच्या भरवश्यावर न्यूजपेपरमध्ये शिरतो. आजही तसेच काहीसे.. मांडीवर ठेवलेल्या पेपर वरून नजर भिरभिरवत सहज सवयीनेच एक नजर उजवीकडे तर एक नजर डावीकडे.. तर फिरून पुन्हा आणखी एक नजर उजवीकडे फिरवली..