Skip to main content

कुणा न कळता.

लेखक Deepak Pawar यांनी मंगळवार, 18/10/2022 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
कुणा न कळता भेटत होतो तेव्हा आपण शब्दा वाचुनी जाणत होतो तेव्हा आपण. नुकता वसंत आला झाड झाड मोहरले नुकते हृदयी आपुल्या प्रीत झरे पाझरले नवे फुलोरे झेलत होतो तेव्हा आपण. भिडता डोळ्यास डोळे हृदयी अनामिक सूर पळभर दूर होता का उठते मनी काहूर मनो मनी का झुरत होतो तेव्हा आपण. तुझ्या आसपास माझे उगाच घुटमळने नजरेच्या कोनातून हळूच तुझे बघणे जरा आगळे वागत होतो तेव्हा आपण. दीपक पवार.

POWDER (पावडर) - शानदार, जबरदस्त, जिंदाबाद!

लेखक अनुस्वार यांनी सोमवार, 17/10/2022 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
कटाक्ष- गुन्हेगारी नाट्य. २०१० मध्ये सोनी टीव्हीवर प्रदर्शित. प्रत्येकी ४० मिनिटांचे २६ भाग. भाषा- हिंदी. ओळख- गोष्ट ओळखीची आहे- पोलीस विरूद्ध अमली पदार्थांचा तस्कर (अन्सारी - पंकज त्रिपाठी). अगदी पहिल्याच भागाच्या शेवटी ही मालिका नेहमीचा चोर-पोलीस खेळ नाही याची खात्री पटते.

अनिरुध रविचंदर - वाढदिवसाच्या शुभेच्छा !

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 17/10/2022 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
तरुणाईला भुरळ घालणारे संगीत देणार्‍या संगीतकार अनिरुध रविचंदर उर्फ 'अनिरुध' याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. कोण हा अनिरुध? ते इथं वाचा.

(१०, ००, ००,००, ००, ००,०००) : अबब आणि अरेरे !

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 17/10/2022 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाच्या तांत्रिक पुनरुज्जीवनादरम्यान माझा हा पूर्वप्रकाशित लेख उडाला आहे. प्रशासकांच्या सूचनेनुसार तो पुन्हा प्रकाशित करतोय. ................................................................................... मागच्या महिन्यातल्या एका रविवारच्या संध्याकाळी धोधो पाऊस कोसळत होता. त्यामुळे घरातच अडकून पडलो होतो. आंतरजालावर पुरेसे बागडून कंटाळा आला होता. मग वेळ घालवायचा म्हणून छापील इंग्लिश वृत्तपत्राची साप्ताहिक पुरवणी बारकाईने पाहू लागलो. त्यातला एक लेख दुबईबद्दल होता. त्या शहराची अनेकविध वैशिष्टे सांगितल्यावर तिथल्या एका संग्रहालयाचा त्यात उल्लेख होता.

चोफ्स फस्ते

लेखक प्रशांत यांनी सोमवार, 03/10/2022 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
गणपाभौ ची पाकृ वाचून-वाचून काल व्हेज बिर्याणी (?) बनवण्याचा प्रयत्न केला.

दिवाळी अंक २०२२ - ललित - तुला कसे बोलावू?

लेखक मित्रहो यांनी सोमवार, 03/10/2022 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
/* Global */ body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;} /* Typography */ h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;} .col-sm-9 p, .col-sm-9 li {font-

शिकागो मिपा कट्टा वृत्तांत

लेखक श्रीरंग_जोशी यांनी सोमवार, 03/10/2022 06:16 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर तो दिवस आलाच ज्याची आम्हाला अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती. अमेरिकेच्या मिडवेस्ट भागात मिपाचा कट्टा आयोजित होणे व त्यात आम्हाला सामील होण्याची संधी मिळणे. विजुभाऊंच्या अमेरिका दौर्‍यामुळे हा योग जुळून आला अन १ ऑक्टोबर रोजी शिकागोमध्ये कट्टा आयोजित करण्याचे ठरले. शिकागोमधे दीर्घकाळापासून राहणार्‍या मिपाकर इंन्दुसुता यांनी याकामी पुढाकार घेतला. उत्सवमूर्ती श्री व सौ विजुभाऊ मिशिगन राज्यातल्या डेट्रॉइटहून कट्ट्यासाठी शिकागोला आले. आयोवा राज्यातील डेमॉइन येथून मिपाकर अनुजा व त्यांचे पती आले. शिकागोत काही महिन्यांपूर्वीच आलेले मिपाकर पुंबा कट्ट्याला आले.

कुण्या देशिचा असेल वारा??

लेखक प्राची अश्विनी यांनी रविवार, 02/10/2022 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
दूरदेशिचा दरवळ घेऊन, झुळझुळणारा येतो वारा, धडधडणारे काळिज आणिक फडफडणा-या नयनी तारा. विशाल गो-या कपोलावरी घर्मबिंदु का सरसर जमती? वरवर सारे शांत तरीही खळखळणा-या मनात धारा.. सळसळणा-या उत्तरियाचा पोत रेशमी नकोनकोसा, थरथरणा-या कायी स्मरतो स्पर्श कोणता हवाहवासा? किणकिणणा-या कंकणास का कुणकुण कोणा अगंतुकाची? रुणझुण रुणझुण नाचति नुपुरे, पावलांस मग कुठला थारा? घेऊन घागर, घाबरघाबर, घरून निघते पाणवठ्यावर; कुणी यौवना झरझर भरभर, तमाचीच वर ओढुन चादर. कुंडल, कंकण, बिंदी, पैंजण..

तमिळनाडूचा इतिहास- शेवटचा भाग .

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी रविवार, 02/10/2022 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
. पेरियार आणी राजाजी. आधी सांगितल्याप्रमाणे, सुरुवातीपासूनच पेरियारांमध्ये काँग्रेसबद्दल द्वेष नव्हता. ब्राह्मणेतरांचा मुद्दा घेऊन जस्टीस पार्टी सत्तेत असतानाही पेरियार काँग्रेसमध्ये होते, खादीचा प्रचार करत होते. त्यांना काँग्रेसमध्ये आणणारे केशव पिल्लई काँग्रेस सोडून गेले पण पेरियार काँग्रेसमध्येच राहिले.

महिला क्रिकेट, आशिया कप, T-20

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 01/10/2022 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून, महिला क्रिकेट, आशिया कप, T-20, बांगलादेश येथे सुरू होत आहे भाग घेणारे संघ खालील प्रमाणे भारत श्रीलंका पाकिस्तान थायलंड बांगलादेश मलेशिया युएई हाॅटस्टार वर, ह्या खेळाचा आनंद घेऊ शकता.