Skip to main content

पोटभर जेवा !

लेखक मदनबाण यांनी गुरुवार, 25/07/2013 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी देशात सगळं कसा आनंदी आनंद आहे ! अहो कसा नसणार आपल्या नेत्यांनी पोटभर जेवणाची सोय केली आहे.राज बब्बर म्हणतात १२ रु आजपण मुंबईत पोटभर जेवण मिळते. तर त्यांच्याच पक्षातील रशिद मसुद यांनी तर फक्त ५ रु दिल्लीत पोटभर जेवण मिळेते. दिल्ली मुंबई पेक्षा इतके स्वस्त आहे आणि ५ रु च्या जेवणासाठी मुंबईत १२ रु मोजावे लागतात त्यामुळे मुंबईतल्या महागाईचा मी निषेध नोंदवतो. मी म्हणतो देशातल्या लोकांना या गोष्टीचा आत्ता पर्यंत पत्ता कसा लागला नव्हता ? इतकी स्वस्ताई तुम्ही किती वर्षापुर्वी अनुभवली होती बरं ? आठवुन सांगाल काय ? काय फार विचार करायला लागतोय ? नक्की कधी ते आठवत नाही ?

तान्हुला

लेखक Bhagwanta Wayal यांनी गुरुवार, 25/07/2013 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
चिमुकला तान्हा ठेऊन घरी आई त्याची जाते कामावरी असते गरज आणिक मजबुरी करते मग ती लोभाची चाकरी कोणी ठेविती त्याच्यासाठी दाई परी आईची माया कोण देई जीवापाड सांभाळ करू पाही तरी आईची सर येणार नाही पूर्ण वेळ ऑफिसात जातो घरी येण्यास रोज ऊशिर होतो वाट बघून बाळ झोपी जातो झोपेतच तो आई आई म्हणतो बाळ वाढले पाळ्णा घरात आईबाबांच्या आठणी ऊरात आसवांचा पुर लोट्ला जोरात रडे तेंव्हा तो भावनेच्या भरात आई मित्रांना शाळेत घेऊन जाती बघुन त्याच्या डोळ्यांत आश्रु येती आई वडिल आणिक नाती-गोती पैशापुढे सर्वच विसरुन जाती कोणी जाणा हो त्यांच्या भावनेला नका छळू त्या कोवळ्या मनाला भुकेले ते मातेच्या वात्सल्याला द्यावे प

पनीर कटलेट

लेखक जागु यांनी गुरुवार, 25/07/2013 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः २०० ग्रॅम पनिर कुस्करून २ मध्यम आकाराचे कांदे चिरुन १ गाजर किसून १ वाटी बारीक चिरलेला कोबी २ बटाटे उकडून मॅश करुन १ चमचा आल लसुण पेस्ट १ चमचा मिरची-कोथिंबीर पेस्ट २ मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर गरजे नुसार मिठ पाव ते अर्धा वाटी तेल चाट मसाला

" चिऊ चिऊ चिडकी - " (बालगीत)

लेखक विदेश यांनी गुरुवार, 25/07/2013 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
बाळ दिसला हळूच हसला "ये ये" म्हणाला खाऊ घे म्हणाला - चिऊ चिऊ चिडकी बंद खिडकी चोच आपट काचेवर टकटक - बाळाने उघडली चिऊ चिऊ आली लाडूचा खाऊ चोचीने घेऊ - बाळाने मुठीत लाडू लपवला बाळ हळूच खुदकन हसला - चिऊ चिऊ चिडली खाऊसाठी रडली खिडकी बाहेर "चिऊचिऊ" ओरडली ! .
काव्यरस

" आरती कंत्राटदाराची - "

लेखक विदेश यांनी गुरुवार, 25/07/2013 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
' जीव जाई, जीव जाई, कंत्राटदारा थैली झटकुन खड्डेदुरुस्ती करा || साटे लोटे तुमचे जमले असेल आगाऊ रक्कम घेतली असेल लाज शर्म थोडी शिल्लक असेल नैतिकता काही ध्यानीमनी धरा || पावसाळ्यात नेमके खड्डे पडावे सगेसोयरे तुमचे त्यात धडपडावे विरोधी प्रतिनिधीनी गृही ओरडावे खाल्लेल्या पैशावर उपकार करा || अपचन अजीर्ण होऊ देऊ नका डोळ्यावर कुणाच्या तुम्ही येऊ नका आयकरवाले पहा घालतील डाका घरच्या लक्ष्मीची आठवण करा || .
काव्यरस

प्रथम तुजं पाहता........!!!

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 25/07/2013 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
एका ऑस्ट्रेलिअन शॉर्ट स्टोरीवर आधारित. मुळ कथा Hate at First Sight , Kathy Lette [मानवी मनाच्या अनेक कंगोर्‍यापैकी हा एक कंगोरा! सहसा न चर्चीलेला, पण का कुणास ठाउक; ऑस्ट्रेलिअन लिटरेचर मध्ये मी अश्या दोन चार कथा वाचल्या. आपल्या "ताई" या संज्ञेला तडा देणार्‍या या कथा वाचुन त्यावर आधारित काही लिहावं अस वाटल खरं,पण खरच आपल्या संस्कृतीत असुनही नसलेला असा हा कंगोरा आहे. मी ही या कंगोर्‍याची सांगड आपल्या भाषेत मांडु नाही शकले.

स्वतःशी मी कधीतरी आडमुठा वागतो

लेखक वैभव कुलकर्नि यांनी बुधवार, 24/07/2013 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
लागे कस जीवनाला,तेव्हा कात टाकतो आधाराची काठी म्हणून,हाती रेषा बघतो देवाला ती लाच थोडी,मोठी भीक मागतो दुसऱ्याच्या दुखावर थायथया नाचतो स्वतःशी मी कधीतरी आडमुठा वागतो …………१ ……… कधीतरी स्वतःशीच स्वतःवर त्रागतो देवळात उभा मी प्रसादाला सोकतो नको तिथे उगी उगी शब्द मी ओकतो ओकण्याचे फळ म्हणून प्रसंगही भोगतो स्वतःशी मी कधीतरी आडमुठा वागतो …………२ ……… खोटी स्वप्ने बाळगुनी , बळे शड्डू ठोकतो गळे स्वप्न कधी जर नशिबाला टोकतो पुण्यायीच्या तराजूत पापाला मी जोकतो आयुष्य न कळे मला , जगणेच मुकतो तरी स्वतःशी मी कधीतरी आडमुठा वागतो …………२ ………

मी खरच योग्य केल का?

लेखक saishwari यांनी बुधवार, 24/07/2013 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
जवळ जवळ १५ दिवस झाले मला नोकरी सोडून . पण अजूनही या बाबत मला खात्री नाही. साधारण ३ वर्षांपूर्वी मला हि नोकरी लागली होती. तो काळ मंदीचा होता. नुकत्याच पदवीधर झालेल्यांना नोकरी मिळत नव्हती. ८ महिने नाममात्र पगारावर घासल्यावर हि संधी चालून आली होती. अर्थातच मोठ्या कंपनीतली ही संधी सोडून देण अजिबातच शक्य नव्हत. मुलाखत इथे झाली असली तरी नेमणूक बाहेरच्या राज्यात होती. फक्त ३ दिवसात सगळ ठरलं होत. सुरवातीचे दिवस नवीन शिकण्यात,नवीन ठिकाणी हिंडण्यात गेले, पैशांची चटक लागली होती, सोबतचे लोक अगोदरच पुढे गेले होते त्यामुळे आपण पण त्या शर्यतीत असाव अस वाटत होत.

ऐक स्त्री जन्मा तुझी कहाणी..

लेखक टक्कू यांनी बुधवार, 24/07/2013 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
कसं असतं नाही आमचं असं जगणं, मुलीच्या जन्माचं कोंदणच वेगळं. कोंदणात बसतो एकच हिरा, मात्र सांभाळाव्या लागतात नाना त-हा. मिळतात नवी नाती वयाच्या पंचविशी नंतर, जुळवून घ्यायला शिकावं हेच बेहत्तर. दोन घरांचं जरी भाग्य तिला लाभतं, मन मात्र दोन्हीकडे अडकलेलं राहतं. तिचं मन म्हणजे जणू द्विदली वाल, आत दले दोन पण वरून एकच साल. पाहाणा-याला वाटावे वा काय झालयं एकरुप, डोकावलं कि कळतं आतलं खर बहुरुप. लग्नानंतर तो होतो तिच्या मनाचा राजा, बदलत राहते ती स्वत:ला न करता गाजावाजा. कुणाची काय आवड तर कुणाची सवय काय, लक्षात ठेउन सारं अंथरुण पाहून पसरते पाय. अपेक्षा असतात तिच्या ब-याच पण खास अशी एकाचकडून, त्याच्याशिव