Skip to main content

सत्य, आनंद, समाधान, शांती, सुख

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शनिवार, 24/08/2013 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला कशाची गरज असते सत्य, आनंद, समाधान, शांती, सुख? नक्की कशासाठी आपली धडपड, वणवण चालू असते? सत्य पूर्ण स्वरूपात कधी कुणासमोर आले आहे का? आणि तसे ते आले तर ते आनंद/समाधान/शांती/सुख देते का? वरवर बघता सत्य, आनंद, समाधान, शांती, सुख हे जणू एक आले तर बाकीच्यांना घेऊन येते असे काहीसे मानले जाते प्रत्यक्षात असे होते का? का तो एक आभास??? मुळात हे सगळे नक्की आहे काय? "असेल ते मिटवा आणि नसेल ते भेटवा" मनाचा व्यापार इतका मर्यादित आहे का?

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-२)

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 23/08/2013 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-२) 

मामाचे गाव (आत्या आज्जी)

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 23/08/2013 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
मामाचे गाव (आत्या आज्जी) सुट्टीमध्ये आमच्या खूप गमती-जमती चालत असे. वाड्याच्या थोड्याच अंतरावर खाली एक ओढा वाहत असे, भर उन्हाळ्यात फक्त डबक्यात पाणी भरलेले असे व सवर्त्र वाळूचे साम्राज्य पसरलेले. दोन फुट खड्डा जरी हाताने खणला तरी ओलसर वाळू हाताला लागत असे. ओढ्याचा एक मोठा भाग आम्हाला दिसायचा पण जेथून ओढा सुरु होत असे तेथे घनदाट झाडी असल्यामुळे पाणी कोठून येथे हा प्रश्न आमच्या समोर नियमित असायचा. पावसाळ्यात तुडुंब भरलेला ओढा उन्हाळ्यात डबक्यात कसा मावतो याचे उत्तर शोधण्याचे आम्ही आमच्या परीने अनेक प्रयत्न करायचो.

आरोग्य पंचविशी -२ -- गंधार-पुढे

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 23/08/2013 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
वासाच्या या दुनियेत मानवाने काही गोष्टी जाणून घेतल्या त्या म्हणजे कोणत्या वासामुळे आपल्याला धोका आहे आणि कोणता वास आपल्या फायद्याचा आहे. सडक्या मासाचा वास हा इतर परभक्षी जनावरांना आकर्षित करतो त्यामुळे आपल्या जीवाला धोका होऊ शकतो या मुळे असा सडक्या मासाचा वास आपल्याला शिसारी आणतो. तसेच सडक्या अन्नामुळे विषबाधा होऊ शकते हे कळल्यामुळे तसा वास येणारे पदार्थ आपण आपोआप खाणे टाळतो. आता या गोष्टी साध्या सरळ आहेत. पण ज्या गोष्टी इतक्या सरळ नाहीत त्या कोणत्या. तर मानवी शरीराचा वास.

मला एक प्रश्र्न पडला आहे "दाभोळकर की दाभोलकर" ?

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 23/08/2013 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
गेले ३ दिवस डॉ. नरेंद्र दाभोळकर ह्यांचे आडनांव बदलले आहे का? व्याकरणाच्या द्रुष्टीने दाभोलकर हे चूकीचे आडनांव वाटते. जसे नेरुळकर,परळकर,परुळेकर, ह्या आडनांवात जसा "ळ" येतो तसाच "ळ" , "दाभोळकर" ह्या आडनांवात पण यायला पाहिजे. विकिपेडिया आणि लोकसत्ता आणि इतर मराठी व्रुत्तपत्रांत पण दाभोलकर असाच उल्लेख आहे.

कायदेशीर दहशदवाद

लेखक नित्य नुतन यांनी शुक्रवार, 23/08/2013 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
कलम ४९८ अ - कायदेशीर दहशदवाद (Legal Terrorism) परवाच भावाचा फोन आला. त्याच्या मित्राच्या बायकोने त्याच्या मित्रावर ४९८ अ (हुंडाविरोधी कायदा) च्या नावाखाली गुन्हा दाखल केला होता आणि पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता त्या मित्राला, त्याच्या वृद्ध आई वडीलांना आणि भावाला तुरुंगात टाकले. तुरुंगातून बाहेर सोडण्यासाठी पोलिसांनी ७०००० रु ची मागणी केली... मित्राच्या लग्नाला १ महिनाच झालेला होता ... त्यातहि तो आंतरजातीय प्रेमविवाह ... तरीही कुठलेही जातीभेद न मानता दोन्ही घरातील मोठ्यांनी कौतुकाने आणि हौशीने सगळे सोपस्कार केले होते... नवरा बायको दोघं software तज्ञ...

विकासाची भारतीय संकल्पना..

लेखक विटेकर यांनी शुक्रवार, 23/08/2013 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
फार दिवसांपासून हा विषय मनात घोळत होता , खरेतर १५ तारखेच्या दरम्यान च लिहिणार होतो पण मुहूर्त लागला नाही. गेल्या दोन वर्षांत भारतीय राजकारणामध्ये मोदी नावाच्या नव्या आशावादाचा जन्म झाला आहे आणि " विकासपुरुष" असा श्री . मोदी यांचा उल्लेख होत असतो आणि तो रास्त ही आहे. या निमित्ताने " विकास" म्हणजे नेमके काय याचा थोडा विचार करावा म्हणून हा लेखन प्रपंच ! मध्ययुगाच्या शेवटी शेवटी युरोपात औद्योगिक क्रांती झाली आणि विकास या शब्दाचे परिमाण बदलले. माणसाने दैवजात तैल बुद्धी वापरून माणसाच्या सुख- सुविधांसाठी नव-नवीन शोध लावले , आणिअधिकाधिक सुख मिळवण्याचा मार्ग स्वीकारला.

अंधश्रद्धाविरोधी वटहुकूमावरील मतमतांतरं...

लेखक गवि यांनी शुक्रवार, 23/08/2013 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
पेपरात आणि माध्यमांमधे आलेल्या अंधश्रद्धाविरोधी वटहुकूमातली काही कलमं घेऊन त्यावर मतप्रदर्शन करतोय. ही मतं अर्थातच वैयक्तिक आहेत, पण इतरांची मतं समजून घेण्यासाठी आणि चर्चेला चालना म्हणून ही बाजू मांडली आहे. "अंधश्रद्धा" म्हणून ढोबळपणे जे काही मानलं जातं त्याला पाठिंबा दूरान्वयानेही नाही. ही चर्चा फक्त त्याविषयी "वेगळा कायदा" करण्याबद्दल आहे.
१) भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला बांधून मारहाण करणे, त्याचा विविध प्रकारे छळ करणे, चटके देणे, मूत्रविष्ठा खायला लावणे अशी कृत्ये गुन्हा ठरतील.

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-१)

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 23/08/2013 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-१) 

४ आकड्यांचा प्रवास...

लेखक नि-अ-पाटणकर यांनी शुक्रवार, 23/08/2013 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
४ आकड्यांचा प्रवास... ऱेल्वेचा प्रवास हा माझा तसा आवडता प्रवास. तशी कारण बरीच आहेत तिथे मिळणारी मोकळीक, झोपायला मिळणारा बर्थ वगैरे वगैरे. काही छोटे त्रास पण आहेत पण त्यात माझ्या कुंडलीचा दोष आहे रेल्वेचा नाही. काही गोष्टी नेहमी ठरलेल्या असतात, मी आज पर्यंत शेकडो वेळा प्रवास केला असेल पण कधीही सुरवातीपासून म्हणजे बुकिंग केलेल्या दिवसापासून मला कन्फर्म सीट मिळालेली नाही, अगदी २ - ३ महिने आधी बुकिंग केले तरीहि माझा नंबर वेटिंगमध्येच येतो. मग त्यादिवशी आधी तो चार्ट शोधा, चार्ट नाही सापडला तर तो TC शोधा, आपल्या बोगी पासून आपण १० डब्बे लांब आहे म्हणून पळापळ करा.