कट्-वडा!
काय! काय!! काय!!
म्हणायच तरी काय म्हणते मी!
ऊठ सुट मिसळ! मिसळ!! अन मिसळ!!
नाही म्हणजे आम्ही ऐकायच तरी किती म्हणते मी? अगदी एका आयडीचे नावसुद्धा मिसळ्पाव असाव? कोण मिसळ्प्रेमी ! कोण उठुन नुसते मिसळीचे फोटो टाकून शंभरी गाठतो? ऑ? काय आहे काय? अहो या मिसळीलाच झणका देणारा आणखी एक भन्नाट प्रकार आहे याची कुणाला जाणीवही नसावी? अगदी उड्या मारुन मारुन जाऊन मिसळी खाता तेथे काळ्या फळ्यावर खडुने लिहीलेले हे नाव तुम्हा कुणाला दिसु नये? उगा नव नव्या चवी चाखणार्यांना हा ही पदार्थ चाखुन पहायची उर्मी येउ नये?
आता म्हणाल अपर्णाबाय एव्हढा का उमाळा फुटलाय या पदार्थाचा? का? का फुटु नये?
मिसळपाव