Skip to main content

नाणे (गूढ कथा)/शतशब्द कथा

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 25/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
ब देशाचा राजा: तुमचे नाणे दुप्पट वजनी असल्यामुळे आम्हाला एका नाण्यांसाठी दोन नाणे मोजावे लागतात. अ देशाचा राजा: आपले कारीगर , आमच्या येथे पाठवा, आम्ही त्यांना आमच्या सारखे नाणे बनविणे शिकवू. कारीगर वजनी नाणे बनविणे शिकून आले, ब देशाच्या राजाने त्यांना अ देशापेक्षा दुप्पट वजनी नाणे बनविण्याचे आदेश दिले. कारीगराने नाणे बनविले, ब देशाच्या राजाने डोक्यावर हात मारला. शिकल्या प्रमाणे कारीगराने अ देशाचेच नाणे बनविले होते. आता ब देशाला अ देशाच्या एका नाण्यासाठी ४ नाणे द्यावे लागतात. ज्याला कळला कथेचा अर्थ तोच असेल खरा अर्थतज्ञ.

वाचने 2559
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

हे स्पष्टीकरण योग्य आहे का ते कळवा . समजा अ देशाचे चलन अ आणि ब देशाचे चनल ब . सुरुवातीला अ = २ब हे इक्वेशन होते . आता ब देशाच्या कारीगराने ब* = २ अ हे चलन सुरु केले पण नुसते चलन फुगवल्याने एकॉनॉमी सुधारत नसते , वस्तुंच्या वॅल्यु चलनाच्या वॅल्युशी इंडीपेन्डंट असतात. ह्या मुळे काय झाले , आधी जी गोष्ट घ्यायला ब नाणी लागत होते तीच गोष्ट घ्यायला आता २अ = ब* इतकी नाणी द्यायला लागली . आणि म्हणुनच अ हे चलन पहिल्यांदा २ ब ला मिळत होते ते आता ४ ब* ला पडायला लागले . बरोबर ?

In reply to by प्रसाद गोडबोले

१. कारीगर शब्दाचा अर्थ: आपल्या देशातील आर्थिक विशेषज्ञ अमेरिकेत (वर्ड बँकेत) काही वर्ष कार्य करतात. मग तेच परत येऊन इथल्या अर्थव्यवस्थेत महत्वाचा पदावर येतात . एक उदा: असाच करीगरानच्या कार्यामुळेच ७०-८० हजार कोटींचे महाराष्ट्राचे नुकसान केवळ एका एनरोन प्रोजेक्ट मुळे झाले... अशी भरपूर उदा: आहेत. .. आता पुन्हा एकदा कथा वाचा अर्थ उमगेल.

या गोष्टीत बर्‍याच तृटी आहेतः १. नाण्याच्या वजनावर त्याची किंमत नसून त्याच्या मागच्या अर्थव्यवस्थेच्या ताकदीवर असते. २. ब देशाला अ देशाची (अथवा त्यावरुद्ध) नाणी पाडण्याची/नोटा छापण्याची "चूकूनदेखील" अनुमती नसते... हा आंतरराष्ट्रीय गुन्हा आहे... आता काही देश भारताच्या नोटा छापून राजरोसपणे त्या चलनात पसरवतात आणि त्याविरुद्धा आपण काय फारसे करू शकलेलो नाही ही गोष्ट वेगळी ;) ३. दुप्पट किंमतीचे नाणे पाडले म्हणजे चलनाच्या विनिमयाचा दर दुप्पट होत नाही... किंवा एखाद्या वस्तूची किंमत दुप्पट होते नाही. ४. परदेशात जाणार्‍या आय टी वाल्यांवर रोख दिसतोय... फार मनाला लागले असेल तर मिपावर... आपले ते हे... इनो लै फेमस हाय... टाकारे कुणीतरी ती मागे बघितलेला मोsssssssssठ्या बाटलीचा फोटो (हघ्याहेवेसांन) ;) (धिस्ल्केमरः माझा चरितार्थ आय टी तून मिळणार्‍या उत्पन्नावर चालत नाही) सद्या एवढेच पुरे... केवळ चम्मतग असेल तर ठिक आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

उत्तर: १. कारीगर शब्दाचा अर्थ: आपल्या देशातील आर्थिक विशेषज्ञ अमेरिकेत (वर्ड बँकेत) काही वर्ष कार्य करतात. मग तेच परत येऊन इथल्या अर्थव्यवस्थेत महत्वाचा पदावर येतात येतंय. एक उदा: असाच करीगरनच्या कार्यामुळेच ७०-८० हजार कोटींचे महाराष्ट्राचे नुकसान केवळ एका एनरोन प्रोजेक्ट मुळे झाले... अशी भरपूर उदा: आहेत. .. आता पुन्हा एकदा कथा वाचा अर्थ उमगेल.

माझ्यासारख्या मूढ वाचकासाठी खरंच ही एक गूढ कथा आहे.

:) आय टी वाल्यासारखे झाले. पगार ६०००० झाला पण घराचा इ एम आय देखील ५५००० झाला. म्हणजे घर घेतले तर नेट पगार ५००० च झाला.

शिकल्या प्रमाणे कारीगराने अ देशाचेच नाणे बनविले होते. ह्याचा अर्थ 'ब' देशातल्या, शिकून आलेल्या कारागिराने स्वत:च्या देशात 'अ' देशाचीच पण त्यांच्या नाण्यापेक्षा वजनानी दुप्पट नाणी बनविली. म्हणजे 'अ' देशाची 'ब' ने बनवलेली नाणी चौपट वजनाची झाली. ती बार्टर एक्चेंज करायला गेलात कि 'अ' कडे जास्त वजनाची नाणी जातात. अगदी बरोबर आहे.

एक उदा: असाच करीगरनच्या कार्यामुळेच ७०-८० हजार कोटींचे महाराष्ट्राचे नुकसान केवळ एका एनरोन प्रोजेक्ट मुळे झाले...
कॄपया यावर अधिक प्रकाश टाकाल का? ७०-८० हजार कोटी ही खूप मोठी रक्कम आहे. राज्यावरचे कर्ज गेल्या अर्थसंकल्पाच्या वेळी २ लक्ष ३० हजार कोटींच्या घरात होते. या रकमेबरोबर तुलना केल्यास वरील नुकसानाचे गांभिर्य जाणवते.