Skip to main content

सेन्टी मेन्टी : Status Update

सेन्टी मेन्टी : Status Update

Published on 25/08/2013 - 19:30 प्रकाशित मुखपृष्ठ
लाईफ म्हणजे स्साला छळ असतो, कधी ते आळसावलेल्या मांजरासारखं निपचिप पडुन असतं, तर कधी चंचल हरिणीसारखं सैरवैर धावत असतं.....कधी सिंहावलोकन करीत चौफैर लक्ष ठेवुन असतं तर कधी दर्ष्टीहीन सापासारख केवळ आशेचा फुत्कारावर अडथळे शोधत वेटोळं चालत असतं ................... सोमवारी पुणे - चेन्नई गो-एयर च्या फ्लाईट ने अक्षरशः छळ मांडला. फ्लाईट हवेत शिरल्यापासुन थडथडत होती. पण शेवटच्या वीस मिनीटात, उतरताना अक्षरश: आपण लामण-झुल्यावरून झुला खाली येताना जशी ग्रिप जाते तशी हाता-पायाची ग्रिप गेली होती. दहा-बारा सेकंदाचा वेळ असेल पण त्या हाय एसीत ही घाम फुटला. पाचावर धारण बसणे, दे माय धरणी ठाय होणे, कप्पाळात जाणे ई.ई. वाक्प्रचारांचा अर्थ लागला. पण माझ्या सीट शेजारी एक सीट सोडुन बसलेला " यो " मात्र एकदम आरामशीर होता, कानात हेडसेट घालुन गाणे गुणगुणत होता. शांत म्हणण्यापेक्षा त्या ही परिस्थीतीत " कुल" होता. चेन्नईशी एक वेगळे आणि विशेष नाते असं आहे माझे ! विमानतळाच्या शेजारच्या तिरूसलेम सब वे ला खेटुन एक स्नॅक्स सेंटरवजा टपरी आहे. त्या ऊडपीच्या शेट्टीशी येता-जाता छोटीच पण वीण जमलेली आहे. " आग्या " ईतकच, पण हसुन बोलतो. आलोय हा सिग्नल ! जाताना " जाराक्या ? " हे ईतकेच , पण किती लांबचे अंतर या दोन शब्दात कापल्या जाते. संस्कृती, भाषा ईतर अडथळे पार करत......चेन्नई ला बस ने प्रवासासारखे दुसरे साधन नाही, एक वेळ पियागो ठीक, पण फिरायचे असल्यास बस च......धरली !! यावेळी गेस्ट हाऊस तिसर्‍याच ठिकाणी होते, माझ्या मेल मध्ये जल्लादपेठ (jalladpeth) असे लिहुन आले होते, एयरपोर्टच्या बसस्टॉपवर विचारले तर त्याने मला वेड्यात काढले, खर तर ते जलादयामपैत्ते (jallaidaimpattie) असे होते. बाकी कंडक्टर आणि एक प्रवासी या मुळे हा लांबचा प्रवास सुखकर झाला. गेस्ट हावुस ही छान होते. सकाळी लवकर उठुन ट्रेनींग डिलीव्हरी ला गेलो. २२ जणांमध्ये केवळ ८ मुले होती, फ्रेशर्स !! जेंडर बायस म्हणुन नाही पण मुली एकत्र असल्या की थोड्या का असेना बोलणारच, ट्रेनींग देताना ही तेच झाले, त्यात तमीळ मध्ये !! जे कानाला, खसखस पिकली म्हणुन आवडते, तेच आवडेनासे झाले.दोन वेळा वार्नींग दिली, पण काही फरक नाही पडला. मग शेवटी हीच मडळी अजुन प्रोजेक्ट नाही म्हणुन बोंबा मारत बसतात. ....असो ....आवरले आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.. बसनेच !! पहिला खेटा....सोल्लींग्नल्लुर ते तांबरम ...तांबरम ला विचार झाला, एक तर गर्मी, त्यात बसचा प्रवास आणी मग नंतर फ्लाईट ला रवानगी...वेळ होता हाताशी ...मग टासमॅक च्या बार मध्ये शिरू म्हटल...तोवर पाऊस सुरू झाला...चेन्नईत आणि पाऊस ...ईतक्या वेळी चेन्नईला गेलो पण हा माझा पहिलाच अनुभव.....सरळ बार सोडुन मस्त पावसांत भिजुन गेलो....नखशिखान्त भिजुन झाल्यावर लक्षात आले...की माझ्या कडे स्पेअर मध्ये कपडे नाहीयेत. हेच घालुन प्रवास करायचा आहे....धन्य !! विचार आल्यावर मस्त कापरं भरल अंगात......मग मात्र ९० मागविलीच....९० ची क्वार्टर झाली...पोटात कालवाकालव झाली म्हणुन समोर जे आले त्यावर ताव मारला....मासे होते...हाण्ण...म्हटल बीच जवळ आहे मी...मासे फ्रेश असणार....पण...... फ्लाईट पुन्हा थडथडलीच ! या वेळी मी धीर धऊन होतो...पण माझ्या शेजारचा मात्र नव्हता. गळ्यात कुठल्यातरी बाबाचा फोटो......कडक ईस्त्री केलेले कपडे...गोरा म्हणजे अक्षरशः गोरा रंग...नो गव्हाळ....थोडा-सा वयस्कर.....दहा बोटांमध्ये दहा रत्नाच्या अगंठ्या....मधल्या बोटामध्ये प्रत्येकी दोन......दर वेळी विमान थडथडलं की हा बोटे तोंडापाशी नेई....अंगठ्याचा डोळे झाकुन मुका घेई...तोच हात कपाळापर्यंत नेई......तोंडातल्या तोंडात काही पुटपुटे...नामस्मरण केल्या टाईप....मला कालचा " यो " आठवला...तो चिलॅक्स होता...आणि हा .........देवभोळा.......की कर्मकांडी ? पुन्हा असो... पुण्यात उतरलो...घरी आलो.........घोडे गाढव च काय पण सगळी प्रॉप्रटी विकुन झोपलो ...सकाळी अंमळ उशीरा उठलो आणी बातमीने झटका दिला.....तडक पुण्यात(मी गावात रहातो !) आलो...बंद !! मोर्चात शिरलो.....काही क्षणभरांत जाणीव झाली की आज ही ( ही !!! ) पब्लीक जमा आहे, उद्या नसणार आणि परवा-तेरवा विसरून जाणार ..मग ते दाभोळकर का असेनात...एखाद्याच डोक दुखत असेल तर, ते आज दुखतय म्हणुन ते त्याच्या लक्षात रहात...पण जर एखाद्याच ते लहानपणापासुन दुखत असेल तर तो केव्हाच विसरून गेलेला असतो...अगदी तिसर्‍या दिवशी देखील...पब्लीक च ही तसचं आहे...पण त्या निमीत्ताने मराठी मिडीयाला आलेले उधाण पाहुन मात्र खोलवर क्लांत असुनही हसायला आले...त्या दिवशी ते फक्त बाळसेच होते..........पुन्हा एकदा असोच... त्याच्या दुसर्‍या दिवशी मुंबई बलात्काराची बातमी थडकली, टिव्ही वर मेन स्क्रीन वर दिसणारे दाभोळकर आणि वागळे झुंड लिमीटेड कंपनी ( विषेशतः आव्हाड) खालच्या पट्टीत सरकले, त्या आधी तुंडा असाच मेनस्क्रीन वरुन खालच्या पट्टीत सरकला होता.फेसबुकावर ही तेच झाले...मग पुरूष आणी पुरूषी नजर आणि त्यावर पोलीसी मेहेरनजर यावर महिलावर्ग तुटुन पडला........ होय !! आम्ही बैल आहोत, कधी नंदी तर कधी ओझ्याचे, मॅनेजरच्या शिव्या खात आई-बाप-भाऊ-बहीण-मुले-संसाराची काळजी घेत गप उभे असतो. त्याच बैलासारखे !! नैसर्गीक रित्या नजर जाते आमची गुबगुबीत भागाकडे, पण दुरून डोंगर साजरे हे ही आम्ही ओळखुन असतो. एखाद्या पुरूषाने शक्तीचा दुरूपयोग केला तर राग आम्हालाही येतो...पण प्लीझ....All Men are not Same !! कण न कण थिजत असतो पैसै आणी कर्तत्व कमावण्यासाठी :) परवाचा दिवस मात्र खुप वेगळा गेला. माझ्या एका मित्राची साधारण साडेतीन कोटी किमंत असलेली जमीन, गाव कार्पोरेशन मध्ये गेल्यामुळे आरक्षणात गेली, आरक्षण कशाचे ? शाळेचे !! मग एका खुप मोठ्या राजकारण्याकडे गेलो, मंत्रीच तो !! ते 'साहेब' पुण्यात योगा-योगाने आले होते. एकुण मिळकतीला काही टक्केवारी असेल तर पुढे बघतो असे वचन दिले. मित्राला !! ..आम्ही ही काही फोना-फोनी केली, तेव्हा दुसरे 'साहेब' विका म्हणुन सांगत होते आधीच ! आता बसा बोंबलत " म्हणाले आणि दिला फोन देवुन. मुळात तिथे शाळा झाली तर ती सध्याच्या जि.प. शाळेच्या चांगली दोन किमी लांब पडणार आहे, माझ्या सध्याच्या जि.प. च्या शाळेला काही मुले आधीच सहा किमी पायी तुडवत येतात. त्यांच्या ईथली शाळा फक्त चौथी पर्यंत आहे. पण त्याची कितपत काळजी मत्र्यांना ?? आधी आरक्षण, मग वसूली ! खेळ मांडला आहे नुसताच. मला बर्‍याच जणांनी विचारले. " लेका आहेस कुठे ? " आज लिहायला बसलो, एखादं स्टेटस टाकावे या विचारात....कित्येक दिवसांपासुन बर्‍याच गप्पा मारायच्या राहिल्यात ? बाकी मंडळी कसे आहात, मला ओळखले का? मी सुहास.. फेसबुक वर असे मला सांगावे लागते. फ्रेन्ड रिक्वेस्ट टाकायच्या आधी !! ....थोडे दिवस साईड लाईन ला गेलो होतो. घरातील एक माणूस पॅरॅलिसीस च्या स्ट्रोक ने आजारी असल्याने ..मला नौकरी सोडावी लागली.........गेले १० महिने मी त्यात बिझी आहे....पण त्या वेळी मला माझ्या सर्व मित्रांचे ( जे ईथे आहेत , जे ईथे नाहीत त्यासर्वांचे ) आभार मानायचे आहेत, ज्यांनी मला या १० महिन्यात सर्वथा मदत केली. मग ती मानसिक असो वा आर्थिक ...थॅन्कु ऑल !! रुटीन जगणार्‍यांचा मला पहिल्यापासुन हेवा वाटत आला आहे. सकाळी उठायचे ..मस्त पैकी फ्रेश होवुन कामाला निघायचे, संध्याकाळी परत आल्यावर जेवायचे आणि झोपायचे, बाईक चा, लोकलचा, कार चा, कंपनीच्या कॅबचा एकच ट्रॅक !! ..शनी/रवी पारंपारिक ठिकाणी भटकंती, त्याच एका ठिकाणचे फोटोज आणि त्याल त्याच मंडळीची लाईक्स ..कस सगळ सोप्प साधं ..पण मला असा ट्रॅक भेटतच नाही.. अजुन थोड्या दिवसांनी पुन्हा निघणार आहे हैदराबाद ला..कदाचित तेव्हा रूटीन बदलेल...पण रूटीन हे रूटीन असते का कधी ? सकाळच्या टुथ-पेस्ट ची चव तीच असली तरी त्या ट्युब चा शेप मात्र बदलेला असतो....लक्ष आपले जात नाही .......आणि लक्ष गेले तर लाईफ म्हणजे स्साला छळ असतो,..........कधी ते आळसावलेल्या मांजरासारखं निपचिप......................... Finally Status Updated ...जास्त टॅन्जन्ट तर नाही ना गेला :)
लेखनप्रकार

याद्या 2365
प्रतिक्रिया 11

यहीच स्साला लाईफ है! हैदराबाद जाराक्या?? विश यू ऑल दि बेस्ट!!

लाईफ म्हणजे स्साला छळ असतो, कधी ते आळसावलेल्या मांजरासारखं निपचिप पडुन असतं, तर कधी चंचल हरिणीसारखं सैरवैर धावत असतं.....कधी सिंहावलोकन करीत चौफैर लक्ष ठेवुन असतं तर कधी दर्ष्टीहीन सापासारख केवळ आशेचा फुत्कारावर अडथळे शोधत वेटोळं चालत असतं ................... +११११११११११११११११११११११११११११११११११११

जमलया.. हैदाबादा मे बिर्यानी दबाके आओ यारो.. :) सकाळच्या टुथ-पेस्ट ची चव तीच असली तरी त्या ट्युब चा शेप मात्र बदलेला असतो....लक्ष आपले जात नाही ..... + ११११

ट्यूबच्या बदलत्या शेपकडे लक्ष देत राह्यलं तर मग दात स्वच्छ करण्यात लक्ष लागणार नाही, तोंड धुतल्यानंतरचा चहासुद्धा त्या बदलत्या शेपच्या विचारात बेचव वाटू शकतो. ट्युबच्या बदलत्या शेपला आपण काहीच करु शकत नसलो (अगदीच तसंच नाही, ट्युबचा शेप बदलू नये असं वाटत असेल तर ती वापरणं सोडावं लागेल) तरी पुढे येणार्‍या चहाचा आनंद लुटणं तरी हातात असतं आपल्या. ;)

लेख आवडला. मस्तच लिहिले आहे. रुटीन बसेल हो, तुम्ही कठीण परिस्थितही सकारात्मक होता ना. झालं तर. लिहिते रहा. तुम्हाला शुभेच्छा. (१.५ वर्ष अस्ताव्यस्त होऊन आता मस्त रुटीन बसलेला) सौंदाळा