Skip to main content

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 27/08/2013 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (६)

लेखक तुमचा अभिषेक यांनी मंगळवार, 27/08/2013 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
२६ ऑगस्ट २०१३ माझा चार दिवसांचा आजार आणि तिचा चार दिवसांचा आळस... पाचव्या दिवसाला झटकून, श्रावणी सोमवारचा मुहुर्त साधून आमचे देवदर्शनाला जायचे ठरले.. अर्थातच.. तिनेच ठरवले.. कारण ती जेवढी आस्तिक तेवढाच मी नास्तिक.. त्यामुळे नेहमीसारखेच, ‘जाणे गरजेचे आहेच का??’ इथपासून वादाला सुरूवात.. घरापासून चालतच पंधरा-वीस मिनिटांवर महादेवाचे मंदीर असल्याने माझी नकारघंटा वाजवायला जास्त वाव नव्हताच.. आजारपणाचा फायदा उचलून सकाळपासून टाळलेली आंघोळ.. नाईलाजाने जेव्हा संध्याकाळी उरकावीच लागली, तेव्हा आता अखेर जाणे निश्चितच हे समजून चुकलो.. तरीही तिचे हे देवदर्शन सुकर घडू देणार्‍यातला मी अजिबात नव्हतो..

मदत हवी आहे… एक number वनराज होण्यासाठी...

लेखक अव्यक्त यांनी मंगळवार, 27/08/2013 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार समस्त मिपाकर, आमचे चिरंजीव वयवर्ष दिड, हल्ली playgroup मध्ये जातात. तिथे मुलांच्या fun activities साठी नाना उपक्रम राबवले जातात. आज घोडा draw करून आणा तर उद्या आणखीन काही… अस्साच एक उपक्रम म्हणजे fancy dress competition.. तर सांगायचा मुद्दा हा की आमच्या चिरंजीवाना "सिंह" बनवायचं असं त्याच्या mam नि ठरवलं असून विकतचे ड्रेस न आणता cardboard किवा अन्य घरगुती साधने उपयोगात आणायची आहेत.

अलेक्साच अधिकृत वाहतूक दर्जा Extension आपल्याला अलेक्सा वाहतूक क्रमांकाची माहिती फक्त एका टिचकीवर पुरवते.

लेखक विनोद निंबाळकर यांनी मंगळवार, 27/08/2013 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
गुगल क्रोम आपल्याला अलेक्सा वाहतूक दर्जा विस्तारची सेवा विनामुल्य देतो, आणि हे एकमेव विस्तार (Extension) आहे, ज्यामध्ये अलेक्सा रहदारी पॅनेल सामाविष्ट आहे. आपला ब्राउझिंगचा प्रवास खंडीत न करता, आपण ज्या संकेतस्थळास भेट देत आहात त्या संकेतस्थळाची माहिती सहजतेने पुरवतो. KideGiri.Com किडेगिरी.कॉम | Alexa Traffic Rank किडेगिरी.कॉमचा अलेक्सा क्रमांक पाहण्यासाठी येथे टिचकी द्या.

हुस्ना..

लेखक शिवोऽहम् यांनी सोमवार, 26/08/2013 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानात कोण जायला बसलंय? जायलाच कशाला पाहिजे, तुमचा-आमचा, प्रत्येकाचा सेप्रेट, पाकिस्तान तुमच्या-आमच्या मनात आहे. तो कधी नव्हता? केन-एबलच्या मनात होताच की! महाभारतातल्या भाऊबंदकीत तो आहेच, मध्ययुगातल्या बेबंदशाहीत बेलगाम उधळला तो. हातपाय ऐसपैस पसरले त्याने. लांब का जा? आजही जनतेचे सेवक निढळाचा घाम गाळून पेरत असतातच की एकेका पाकिस्तानाची बीजं गल्ली-मोहल्ल्यात! तुमच्या-आमच्या फक्त मनातच असतो असं नाही पण मनातही असतो. आणि बाहेरही. मनातला असतो जरासा धूसर, पाचोळ्यानं झाकलेल्या विस्तवातुन येणार्‍या धुराच्या वळशांसारखा. आणि तोच जन्म देतो बाहेरच्याला. ते महत्त्वाचे.

'हवाला-निवडणूक-रुपया-डॉलर'

लेखक इष्टुर फाकडा यांनी सोमवार, 26/08/2013 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
मुलांनो आज अतिशय रोचक अशी गम्मत पाहूयात. हि गम्मत आहे १९८४ पासून निवडणुकीतल्या काळात रुपयाच्या डॉलर च्या तुलनेत झालेल्या घसरणीची. खालील काही आकृत्या पहा बरे...तर या आकृत्यांवरून खालील निष्कर्ष निघतात. 1 १.

पुन्हा अनोळखी होऊ .... !!

लेखक psajid यांनी सोमवार, 26/08/2013 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
संधीकाळी सुखावत होता जो गंध वाऱ्याचा तो विसरू, दिलासा एकमेकां देऊ.... अन पुन्हा अनोळखी होऊ .... !! नको आठवण काढू झंकारणाऱ्या स्वरांची, वादळात विखुरला जो मेणा खांद्यावर घेऊ.... सखे गं.. पुन्हा अनोळखी होऊ .....!! विसरू ती गुंफण कुरवाळणाऱ्या हातांची, नको आवाज झुल्यांचा मन बंदिशीत ठेऊ...... पुन्हा अनोळखी होऊ .....!! एकमेकांच्या पाऊलखुणांवर अंधारून छाया आली, ते व्रण वाळूतले सखे चल, आपणच पुसून पाहू...... सखे पुन्हा अनोळखी होऊ ....!! आहे उमटले प्रतिबिंब एकत्र दोघांचे जळी, छोटासा फेकून खडा विस्कटून त्याला टाकू ..... अन….
काव्यरस

भारत "गॅस" वर

लेखक पेस्तन काका यांनी सोमवार, 26/08/2013 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात गॅस कधीहि फुटु शकतो. सुत्रानुसार सरकार घरगुती गॅस म्हणजेच एलपीजीच्या किमतीचाही आता डीझेलच्या धर्तीवर दर महिन्याला किंवा दर तीन महिन्याला आढावा घेण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे दरमहिन्याला गॅसचे किंमत १० रुपयाने वाढण्याची शक्यता आहे. आणि येत्या ३ वर्षात संपूर्ण सबसीडी टप्प्याटप्प्याने तीन वर्षांत पूर्णपणे रद्द करण्याबाबतचे संकेत दिले आहेत.

तुही नाही मीही नाही …………. !!!

लेखक फिझा यांनी सोमवार, 26/08/2013 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
तुही नाही मीही नाही …………. प्रेमाची रुजुवात झाली होती मनात, पण बोललो हिमतीने कधीच ….तुही नाही , मीही नाही ……… पावसाची रिप रिपही चिंब करणारी, पण भिजलो आकंठ कधीच … .तुही नाही , मीही नाही ……… सहजच घडते अशी असते भेट, पण साधला योगायोग कधीच ….