Skip to main content

एक चविसंदर्भात प्रश्न

लेखक शिल्पा ब यांनी रविवार, 01/09/2013 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हा सगळ्यांना शेंगदाण्याची चटणी चवीला कशी असते हे माहिती असेलच. मला तुमची मतं हवी आहेत. समजा तुम्हाला कोणि छान चमचमीत शेंगदाणा चटणी दिली तर तुम्ही कशी खाल? परंपरागतपणे नाही तर तुमची कल्पनाशक्ती पणाला लाऊन सांगा. काही सजेशन खालीलप्रमाणे : sandwich + चटणी olive oil +चटणी रोटी लवाश /पिटा चिप्स क्रिमी चीज - फ़ोण्टिना वगैरे सगळयांना आगावू धन्यवाद.

प्रेम म्हणजे...

लेखक K Sangeeta यांनी रविवार, 01/09/2013 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे, एक कविता आयुष्यभर करीत रहावे... प्रेम म्हणजे, सुंदर गजल नेहमी गुणगुणत रहावे... प्रेम म्हणजे, सुंदर गिटार आवडत्या व्यक्तीला ऐकवत रहावे... प्रेम म्हणजे, सुगंध सहवासाचा तुझ्या आसपास दरवळतच रहावे... प्रेम म्हणजे, सहवासाची अनुभूती आपल्या जवळच असल्यासारखे वाटत रहावे... प्रेम म्हणजे, एक कविता आयुष्यभर करीत रहावे..

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (७)

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 31/08/2013 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
दर दुसर्‍या तासाला येणारा तिचा फोन.. आज ऑफिसला पोहोचून तीन तास उलटून गेले तरी आला नाही तेव्हा चुकचुकल्यासारखे वाटणे साहजिकच होते.. मात्र कामाच्या घाईगडबडीत डोक्यात येणारे सारेच विचार तसेच रेंगाळत ठेवता येत नाहीत.. दुपारी खिशातला फोन खणखणला तेव्हा तिची आठवण झाली, पण वेगळाच नंबर पाहून चुटपुटलो.. तेवढ्यापुरतेच.. कारण समोरून आवाज तिचाच होता, बातमी तेवढी चांगली नव्हती.. बाईसाहेब फोन कुठेतरी हरवून आल्या होत्या.. तिच्यावर ओरडावे कि डाफरावे या विचारांत असतानाच तिने फोन कट देखील केला. कदाचित मला हे कळवण्यापुरताच केला असावा.. ते ही खरेच, दुसर्‍याच्या फोनवरून कितीसे बोलणार..

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र : नक्की किती खात्रीशीर व सुरक्षित ?

लेखक चेतनकुलकर्णी_85 यांनी शनिवार, 31/08/2013 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण तयार होत आहे. अनेक जण दहशतवाद(हिरवा,भगवा ,निळा इत्यादि ) वैगैरे चे मुद्दे उपस्थित करत आहे. पण नक्की निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निवडणुका घेत आहे त्या किती सुरक्षित व खात्रीशीर आहेत हाच मोठा विषय आहे. निवडणूक आयोगाने आजकाल काही वर्षान पासून इलेक्ट्रोनिक मतदान यंत्र द्वारे मतदान घ्याचे ठरवले आहे. पूर्वी ह्या यंत्रावर अनेकदा शंका घेतली गेली आहे. सध्या ह्याच विषयावर जरा माहिती गोळा करावी असे ठरवले व ती मांडत आहे. तर हि मतदान यंत्रे भारतातील भारत इलेक्ट्रोनिक्स व इलेक्ट्रोनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया ह्यांनी बनवली आहेत.

शेत-तळं

लेखक मीराताई यांनी शनिवार, 31/08/2013 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दूरदूरवर दृष्टी टाकत दिगंबर सायकल रेटत होता. रस्तारुंदीच्या कामात जुनीपुराणी झाडं तोडली गेली, तेव्हापासून रस्त्याला थंडगार सावली देणारी त्यांची डेरेदार छत्रंही गेली. एरवी हिरव्याचार शेतांवरून येणारी झुळुक थंडोसा आणायची अन् त्याबरोबरच तो हिरवा, ओला गंधही! पण आता पाहावं तर कालपरवापर्यंत भेगाळल्यासारखी दिसणारी शेतं, ढेकलं उलून आल्यानं केविलवाणी दिसत होती. बांधाबांधावरच्या एकटया दुकटया चिंचा-बाभळी उसासत कशाबशा तग धरून उभ्या होत्या, उद्याच्या आशेवर! उजाड माळरानांवर तेवढेच हिरवे ठिपसे जिवंतपणाची खूण पटवत होते.

उरेल काही उणे उणे

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 31/08/2013 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
उरेल काही उणे उणे, आयुष्य सारे मला म्हणे, भोगाच्याही पदरी उरते, वेदनेचे गाणे मखमलीच्या दाव्याला, जीवा बांधणे. उरेल काही उणे उणे, आयुष्य सारे मला म्हणे, कुणी गावे उद्याच्या, आशेचे गाणे उगवतीच्या पोटी लपले, अंधाराचे लेणे उरेल काही उणे उणे, आयुष्य सारे मला म्हणे, बेधुंद होऊन छेडावे, उगीच का तराणे भैरवीचे सूर घेते, अखेरीचे गाणे उरेल काही उणे उणे, आयुष्य सारे मला म्हणे, -- सागरलहरी

वा रे न्याय!

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 31/08/2013 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-gangrape-juvenile-guilty… दिल्लीच्या खळबळजनक सामूहिक बलात्कारातील एका आरोपीला अल्पवयीन आहे म्हणून केवळ ३ वर्षाची शिक्षा झाली आहे. एका स्त्रीवर अत्याचार करुन तिचा खून करणार्‍या आरोपीला अल्पवयीन म्हणून अशी सूट देणे योग्य आहे का? भारतीय कायद्यात एखाद्याला अल्पवयीन असताना प्रौढ म्हणून खटला चालवायची तरतूद नाही का? पोलिस तपासात असे दिसते की बलात्कार प्रकरणात सगळ्यात नृशंस कृत्य ह्या तथाकथित अल्पवयीन व्यक्तीने केले.

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ११ : महाप्रवासाचा अंतिम कालखंड

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 31/08/2013 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
===================================================================== पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

कास पठार : फोटो काढण्यासाठी फी

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शनिवार, 31/08/2013 02:37 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच कास पठारावर फुलांचा बहर सुरु झाला . (त्यानिमित्ताने फोटो/ प्रवासवर्णनं येतीलच ) पण ह्यानिमित्ताने वनविभागाने काढलेले दरपत्रक फेसबुक | सातारा ह्या पेज वर पाहण्यात आले . गाड्या प्रवेश फी , व्यक्तिगत प्रवेश फी , फोटोग्राफी फी , कचरा केल्यास दंड ,मागील वर्षीच्या वसुलीतुन आसपासच्या गावात केलेली कामे असे बरेच डिटेल्स आहेत त्यात . ( फेसबुक वरील फोटो इथे कसा शेयर करता येईल हे माहीत नसल्याने फोटो देता आलेला नाही) ह्यातला "फोटो काढण्याची फी " हा प्रकार फार खटकला . प्रवेश फी वाहनांवर फी समजु शकतो , फुलाम्चे नुकसान अन प्रदुषण पसरवणे ह्यासाठी दंड असणे ही लॉजिकल आहे .

भरतनाट्यम मार्गदर्शन हवे आहे..

लेखक शिवोऽहम् यांनी शुक्रवार, 30/08/2013 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
मला मदत, मार्गदर्शन हवे आहे. माझी मुलगी, वय वर्षे ८, गेली दीड-दोन वर्षे पुण्यात भरतनाट्यम् शिकते आहे. तिच्या ग्रुपला ह्या वर्षी पुण्यात झालेल्या नॅशनल हार्मनी 'भाव-राग-ताल' ह्या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. ही स्पर्धा 'अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे' या संस्थेने आयोजित केलेली होती. स्पर्धेत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांतुन लोक आले होते, इतर राज्यातुनही (आसाम, पंजाब, हरियाणा इ.) आले होते. भरतनाट्यम मध्ये मात्र दाक्षिणात्य कोणी आलेले दिसले नव्हते. या उत्तेजनार्थ बक्षिसामुळे तिला पुढील स्पर्धेसाठी सरळ प्रवेश मिळाला आहे असे आम्हाला समजले आहे.