Skip to main content

विकासाची भारतीय संकल्पना-३

लेखक विटेकर यांनी गुरुवार, 10/10/2013 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
थोड्क्यात अशा प्रकारचे "एकात्म सुख" ही सुखाची भारतीय संकल्पना आहे ! अशा प्रकारचे एकात्म सुख घेण्यासाठी जीवनाचा काही एक सुसुत्र पाया असणे भाग आहे. एक विशिष्ट जीवन पद्धती असणे भाग आहे. एक अशी जीवनपद्धती, ज्यामध्ये शरीर ,मन, बुद्धी आणि आत्मा यांच्या सुखाचा परिपाक असू शकेल. अशा जीवनपद्ध्तीचा पाया म्हणजेच चार आश्रम ! धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष या चार पुरुषारार्थाच्या प्राप्तीसाठी चार आश्रमांच्य पायावर आधारलेली सुखी जीवनाची बैठक ! मागे आपण पाहिल्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक सुखापासून वंचित करतो , तसेच कोणत्याही गोष्टिचा अभाव देखील मनुष्यास सुखापासून वंचितच करतो.

वन्दे मातरम का नाही??

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी गुरुवार, 10/10/2013 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो... २-३ दिवसापुर्वी श्री शरद पोन्क्शे यान्च्या व्याख्यानाला जायचा योग आला होता. अतिशय तळमळीने त्यानी जन गण मन आणि वन्दे मातरम मधला फरक आणि त्यामागचे भयानक राजकारण समोर आणले. ऐकुन रक्त खवळले आहे. नेहरु आणि गान्धी घराणे देशाचे मातेरे करण्यात पहिल्यापासून अग्रेसर आहेच...आई भवानीने सर्व दानवान्चा नाश करण्याची शक्ति आमच्या बाहूत निर्माण करावी हीच प्रार्थना.... बातमीचि लिन्क खाली डकवली आहे..... http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/---/arti…

गुंता

लेखक सार्थबोध यांनी गुरुवार, 10/10/2013 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
का उदास, आज वाटे मला श्वास श्वासात, जीव हा कोंदला ll १ ll हृद्य आठवांचा, काय हा उमाळा नेत्रातूनी अश्रूंचा, हाय तोल गेला ll २ ll विराण स्मृती, करिती मनी गलबला का दिशा नित्य, गवसेना पाखराला ll ३ ll जुनाच गुंता, न सोडवी मनाला मिळे संकेत, असा नव्या वादळाला ll ४ ll अडकलो पुन्हा, जुन्या कड्या कपारीला बुजेना चिरा, जो जो मी सांधला ll ५ ll मागतो आधार, फिरुनी त्या अंबराला मज दाखवी, नव्याने निरभ्र चांदण्याला ll ६ ll - सार्थबोध

चल परत नव्याने सुरू करू सारे

लेखक पल्लवी मिंड यांनी गुरुवार, 10/10/2013 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
चल परत नव्याने सुरू करू सारे ओळख नव्हती कधीच आपली असे पुन्हा भेटू डोळ्यात येईलच पाणी माझ्या त्या अश्रुं समेच आपले अहं पण विरघळून टाकू खूप पहिले आपण हिशोबचे जगणे त्या पल्ल्याड जाऊन फक्त आपल्यासाठी जगू असेल अजूनही अल्लड बालपण आपल्यातही त्या निरागस पणाची थोडी चव चाखून पाहू चल बरोबर मिळून चालू जरासे हृदयातील स्वप्नापर्यंत पर्यन्त असेच आपण पोहोचू आयुष्यात असणारच वळणे थोडीशी गहिरी त्यातूनच आपल्या प्रेमाचा अर्थही नव्याने उमजू

वैष्णोदेवी, काश्मीर ट्रीप साठी मार्गदर्शन करा.

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 10/10/2013 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो, या वर्षी जाने.२०१४ ला मी वैष्णोदेवी काश्मीर, वाघा बोर्डर, ताज महल इकडे जायचे ठरवत करीत आहे. वेग वेगळ्याtours कंपनी मध्ये चौकशी करत आहे पण tours च्या किमतीमध्ये बरीच तफावत आढळली. मी इथेउन फोनेवरून काश्मिरच्याच एका Aalaa Tours Travels शी व्यव्याहार करीत आहे.
या आधी कोणी अशा tours ला जावून आलेले असतील तर त्यांना विनंती कि मला योग्य माहिती द्यावी.
दुसरे असे के इतक्या लांब आपण जातो आणि आजूबाजूची काही ठिकाणे/ स्थळे माहित नसल्यामुळे बघायची राहून जातात.

ओदिशा - ६ : पिपली आणि कोणार्क

लेखक सुधीर कांदळकर यांनी गुरुवार, 10/10/2013 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
ओदिशा - १ ओदिशा - २ ओदिशा - ३ ओदिशा - ४ ओदिशा - ५ २१-११-२०१२. सकाळी पाचच्या आधीच फटफटले होते. मी घरून येतांना विजेवरची चहाची किटली सोबत घेतली होती. एक चहा करून प्यालो. हवामान मुंबईसारखेच. त्यामुळे गार पाण्याने अंघोळ केली.

गालिब च्या शायरी चा आस्वाद भाग २

लेखक गुल-फिशानी यांनी गुरुवार, 10/10/2013 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
शेर दाम-ए-हर मौज मे है हल्का-ए-सद्काम-ए-निहंग देखे क्या गुजरे है कतरे पे गुहर होने तक. आस्वाद या सुंदर शेर मध्ये गालिब असे सुचवितो की बघा एक सुंदर प्रवास एका नाजुक थेंबा चा (कतरा) नुकताच सुरु झालेला आहे.आणि कुठे तर जीवनरुपी महासागरा त.आणि या प्रवासा ची मंझील काय आहे तर एखादा शिंपला गाठुन मोती बनणे. पण साह्ब ये जिंदगी का सफर इतना आसान होगा ?

ज्योतिषांकडे जावे का? का जावे? … आमचेही काही प्रयोग

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 09/10/2013 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
सांप्रतकाळी भारतवर्षात काय, किंवा विलायतेस काय, बरेच उच्चविद्याविभूषित जंटलमन आणि सुविद्य लेड्या ज्योतिषांची टर उडविताना दिसतात; कां की त्यांचे मते ज्योतिष हे एक थोतांड असून लबाड ज्योतिषी मडळींनी केवळ आपली तुंबडी भरण्यासाठी ते रचिलेले आहे, आणि ज्याअर्थी विश्वचूडामणि असलेल्या ‘आम्रविका’ खंडातील प्राख्यात ‘सायनस’या महासिकाची ज्योतिषविद्येस मान्यता नाही, त्याअर्थी हे थोतांड असल्याचे निर्विवादपणे सिद्धच होते, सबब समस्त लुच्च्ये ज्योतिषी हे खेटरे मारण्याच्या लायक होत.

चारोळ्या - २

लेखक धन्या यांनी बुधवार, 09/10/2013 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
चारोळ्या - १ या चारोळ्या मी जवळपास साडे पाच वर्षांपूर्वी लिहिलेल्या आहेत. यमकं बर्‍यापैकी जुळलेली असली तरी हे "र ला र आणि ट ला ट" जोडणं नव्हतं. बरंचसं उस्फुर्त.
काव्यरस

पुरावा

लेखक सार्थबोध यांनी बुधवार, 09/10/2013 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
काही बोलू कशाला, झालेत शब्द आसू आयुष्य ओघळून गेले, आणि कितीक सोसू ll १ ll त्यांचे रक्तही बदलले, वागणे असे बेताल आम्ही तुमच्यातले नाही, आम्हा रंग नका फासू ll २ ll तुमच्याच दोर हाती, केले विषण्ण जगणे आमचेच नशीब होते, आम्ही कोणास कोसू ll ३ ll भरवसा होताच आमचा, शब्दावर माणुसकीच्या चुकलो; सापडलो आम्ही, नका दुसऱ्यास नासू ll ४ ll मारून आम्हास तरीही, उजळ तुमचा माथा नाही बदलणार दुनिया, असे लागले भासू ll ५ ll आहे ठाऊक काहींना, चांगुलपणा आमचा तो जगू दिलेत न तुम्ही, मरणोत्तर पुतळ्यात वसू ll ६ ll येईल तुमचाही अंत, तो दूत फटकारेल तुम्हा दावण्या पुरावा माणुसक