काही बोलू कशाला, झालेत शब्द आसू
आयुष्य ओघळून गेले, आणि कितीक सोसू ll १ ll
त्यांचे रक्तही बदलले, वागणे असे बेताल
आम्ही तुमच्यातले नाही, आम्हा रंग नका फासू ll २ ll
तुमच्याच दोर हाती, केले विषण्ण जगणे
आमचेच नशीब होते, आम्ही कोणास कोसू ll ३ ll
भरवसा होताच आमचा, शब्दावर माणुसकीच्या
चुकलो; सापडलो आम्ही, नका दुसऱ्यास नासू ll ४ ll
मारून आम्हास तरीही, उजळ तुमचा माथा
नाही बदलणार दुनिया, असे लागले भासू ll ५ ll
आहे ठाऊक काहींना, चांगुलपणा आमचा तो
जगू दिलेत न तुम्ही, मरणोत्तर पुतळ्यात वसू ll ६ ll
येईल तुमचाही अंत, तो दूत फटकारेल तुम्हा
दावण्या पुरावा माणुसकीचा, आम्ही तुमच्यात नसू ll ७ ll
- सार्थबोध
| लेखनविषय: |
|---|
वाचने
932
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरच छान रचना.
नोंद घेतली आहे.