Skip to main content

दिवाळी स्पेशल कट्टा..

लेखक नानबा यांनी गुरुवार, 17/10/2013 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, दिवाळी येऊ घातलीये. सुट्ट्या, फ़राळ, भटकंती किंवा आरामाचे आपापले कार्यक्रम ठरले असतील किंवा ठरू लागले असतील. सोबत एखादा दिवाळी गप्पा कट्टा झाला तर? गेल्या अचानक डोंबिवली कट्ट्याप्रमाणेच भेट, गप्पा, खाबूगिरी, अजून गप्पा, अजून खाबूगिरी असा विचार आहे. ठिकाण, तारीख, वेळ प्रतिक्रियांमध्ये चर्चा करून ठरवूया. कोणाकोणाला जमेल यायला?? समस्त मुंबई, पुणे आणि येऊ इच्छिणा-या मिपाकर मंडळींचे दिल से स्वागत आहे.

सल अंतरीचा..

लेखक फुंटी यांनी गुरुवार, 17/10/2013 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
खंतावून सोडणारी एक अस्वस्थ पोकळी.. हुरहूर आजवर अव्यक्त राहिलेली.. त्या सूक्ष्म वेदनेला स्मरून खरडतोय काही... कविता बिविता जे काय समजायचं ते समजा.. तिच मला टाळण फलाची इच्छा मनात न धरता कर्म करा म्हणे... प्रेम करता येईल अस? फलेच्छा सोडून...?? कर्म आणि फलेच्छा वेगळी कुठे आहे इथे?? सगळ एकच दिसतंय...तुझ्यात...

भारत जिंकला , क्रिकेट हरले

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी गुरुवार, 17/10/2013 06:22 या दिवशी प्रकाशित केले.
कालचा क्रिकेटचा सामना पहायचा राहिला , त्याच्या हायलाईट पाहण्याआधी चेहरा पुस्तकाच्या भिंतींवर भारतीय विजयाची बातमी वाचली , वृत्त पत्रात सविस्तर वाचले आणि अपेक्षाभंग झाला , भारत जिंकला पण क्रिकेट हरले पाटा निर्जीव खेळपट्टी वर फलंदाजांनी गोलंदाजांचे वस्त्र हरण केले , मला नख काढलेल्या वाघाची व दात काढलेल्या नागाची आठवण झाली. क्रिकेट लोकप्रिय करण्याच्या नादात भारतीय उपखंडात अश्या निर्जीव व सदोष खेळपट्ट्या बनवल्या जाऊ लागल्या , व खेळाची रया केली , समतोल खेळ पाहायला मिळेनासा झाला , वाईट एकाच गोष्टीचे वाटते , एकेकाळी राहुल , सचिन , सौरभ , व स्टीव , मार्क , ह्या सारख्या खेळाडूंनी समतोल पिचवर टिचून धा

कथा एका निवडणुकीची

लेखक हर्षद खुस्पे यांनी बुधवार, 16/10/2013 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रामधील सातारा जिल्हा म्हणजे दऱ्या डोंगरांनी भरलेला. बारमाही वाहत असलेल्या नद्या असलेला परीसर जास्तीत जमिनीवर असलेले नगदी ऊसाचे पिक ह्यामुळे हातामध्ये खुळखुळत असलेले पैसे. ह्यामधुन शेतीतून उरणारा वेळ व त्यातून वेळ घालविण्यासाठी म्हणुन गावाच्या राजकारणामध्ये असलेला सहभाग. कातोली असंच एक गाव. कुठल्याही गावामध्ये असतात तसे इथेही दोन गट होतेच, आबा आणी नाना. आबा आणी नानां साखर कारखाना आपापल्या ताब्यात ठेवण्यासाठी अश्या अनेक गावांमधील लोकांना झुलवत ठेवत त्यातून गावांमध्ये मारामाऱ्या , दंगल, झालाच तर खून इ. ला तर निवडणूक काळामध्ये तर अगदी उत येत असे.

शब्द चिमुकले सांडत होते ...

लेखक जेनी... यांनी बुधवार, 16/10/2013 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
त्या इवलुश्या पानावरती शब्द चिमुकले सांडत होते फुलपाखरापरी फडफडणारे कवितेचे मन भासत होते अलगद कागद हातावरती हाताच्याही बोटावरती मन बोटासंगे बोलत होते शब्द चिमुकले सांडत होते बरेच काहि अवती भवती भोवतालीच्या ओठावरती सार तयाचे मांडत होते शब्द चिमुकले सांडत होते मी न माझी, माझे न काहि माझ्यासाठी मीपण नाहि नाहि नाहि म्हणता म्हणता कवितेला मी सांगत होते ओळी ओळीवर अक्षरांचे पुंजकेच जणु साठत होते शब्द म्हणुनी शब्दासंगे कवितेचे मन डोलत होते शब्द चिमुकले सांडत होते शब्द चिमुकले सांडत होते...

देरसूचा निरोप...........भाग-४...लेफू नदीतून..

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 16/10/2013 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ - निशाचर भाग-२ - डुकराची शिकार भाग-३ - कोरियन गाव ४ दुसऱ्या दिवशी मी ऑलिन्टिएव्ह व मार्चेंको नावाच्या रायफलमनला माझ्याबरोबर घेतले आणि इतरांना चेर्निगोव्हका नावाच्या गावाजवळ आमची वाट पहायला सांगितले. गावपुढाऱ्याच्या मदतीने आम्ही एक सपाट बुडाची, बऱ्यापैकी सुस्थितीतील बोट मिळविली पण त्यासाठी आम्हाला त्याला तब्बल १२ रुबल्स रोख व तीनचार व्होडकाच्या बाटल्या द्याव्या लागल्या.

मॉल संस्कृति

लेखक बलि यांनी बुधवार, 16/10/2013 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम मला सामील करून घेतल्याबद्दल मिपा चे आभार. माझं पहिलं लेखन तुमच्यासमोर ठेवतो आहे . चूकभूल माफ असावी . काही दिवसांपूर्वी मी माझ्या फेसबुक च्या भिंतीवर एक चित्र प्रकाशित केले होते. त्यात एक गरीब स्त्री रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकत होति. त्या चित्राचा आशय असा होता कि, " कृपया रस्त्यावर भाजी विकणाऱ्या लोकांबरोबर भाव कमी जास्त करू नका. ते आपल्या शेतातील माल कमी किमतीला विकतात. मॉल मध्ये खरेदी करू नका. शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी भाजी विकत असतो. " ह्या चित्रावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. माझ्या मित्राबरोबर मी ह्या विषयी खूप वेळ गप्पा मारल्या .

शैलू

लेखक अक्षरमित्र यांनी बुधवार, 16/10/2013 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
टीप : ही व्यक्तीचित्रणे सत्य घटना व पात्रे यांवर आधारीत आहेत. काळ साधारण इ.स. १९८७ ते १९९३ दरम्यानचा आहे. पात्रांची नावे बदलली आहेत. प्रसंगांतील भाषा काही प्रसंगी शिवराळ व अश्लील वाटण्याची शक्यता आहे. ज्यांना अशा प्रकारच्या वाचनाची नावड असेल त्यांनी कृपया येथेच थांबावे.) शैलू मी तेव्हा साधारण ५ वी / ६वीत असेन. आमच्या चाळीतच शैलू राहायची. शैलूचा बाप तिच्या लहानपणीच तिच्या आईला टाकून गेला होता. तो कुठे होता, काय करीत होता, जीवंत होता की नव्हता ह्याचा पत्ता शेवटपर्यंत चाळीतल्या बायांना आणि बाप्यांना लागला नाही.

वानोळा

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 16/10/2013 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ धीर गंभीर मेघदळ स्तब्ध अचल का वारा ? चंचल मन बेभान चिंतनी पहाटेस पट कोरा रुधिराचे घर विषम स्वरांचे हृदयी अलख चकोरा अंतर्यामी कल्लोळांचा सागर उसळे खारा नकोच वाटे पण ना त्यजवे कर्तव्याचा तोरा आस आंसवे अभिलाषेची गोचिड सम अंगारा पंख निखळले मिटले डोळे अंध दिशा धांडोळा ना कळते आकळते मग हा जन्म कसा वानोळा ? ........................अज्ञात
काव्यरस

देरसूचा निरोप.............भाग-३....कोरियन गाव..

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 16/10/2013 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ - निशाचर भाग-२ - डुकराची शिकार ३ कोरियन गाव... सकाळी मी उठलो तर काय सगळेच उठून आवराआवर करत होते. ‘जरा उशीरच झाला उठायला’ मी मनात म्हटले. पण उठल्या उठल्या माझ्या लक्षात कोणती गोष्ट आली असेल तर ढगाळ आकाश. सूर्यमहाराज त्या ढगाआड अदृष्य झाले होते. सगळे जण संभाव्य पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांचे सामान काळजीने बांधत होते. ते बघून देरसू म्हणाला, ‘घाई नाही. आज रात्री पाऊस. आत्ता नाही.’ मी त्याला विचारले हे तो कसे काय सांगू शकतो तर तो म्हणाला, ‘तुम्हीच बघा. छोटे पक्षी येतात जातात.