Skip to main content

घोटाळा

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 24/10/2013 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
सालस थंडी लालस डोळा गंध मदनमय घोटाळा समिर नव्हाळा करतो चाळा झुळझुळतो मद लडिवाळा एकल बेटावरती फिरतो खग पक्षांचा नभ मेळा पाउल पाउल नटल्या वाटांवर झुलवी मन हिंदोळा वेस क्षितीजाची असीमच माणुस ऐसा भव भोळा कसा पुरावा पुरवावा हा नाही ठावे वानोळा कुणा पुसावे काय करावे भरे न ओंजळ जीव खुळा कल्लोळांचे लोळ अचानक राशीवर झाले गोळा .......................अज्ञात
काव्यरस

तुझपे दिल कुरबान

लेखक चौकटराजा यांनी गुरुवार, 24/10/2013 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
तुझपे दिल कुरबान भारतीय फिल्म संगीतातील गायनाचार्य माननीय श्री मन्ना डे यांचे गुरूवारी दु:खद निधन झाले. या काळातील समर्थ , शैलीदार गायकांच्या रत्नहारातील एक रत्न आज गळून पडले. उत्पती, वधेन व लय या चक्रातून सर्व चराचराना जावे लागते हे जरी खरे असले तरी काही जण आपला एक खास ठसा जनमानसावर व इतिहासावर उमटवितात. मन्ना डे हे नाव गेली साठ सत्तर वर्षे संगीत रसिकांच्या गळ्यातील ताईत बनून राहिले होते.

राज ठाकरे यांचे काय चाललेय?

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 23/10/2013 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी राजसाहेब ठाकरे सेनेतून बाहेर पडले .. त्यांनी मराठी आणि विकास हे मुद्दे उचलून धरले. तेव्हा महाराष्ट्राला नवनिर्माणाच्या काही आशा निर्माण झाल्या होत्या. त्याचं प्रतिबिंब मतांमधेही दिसून आलं... पण काही प्रश्न निर्माण होतातच. राज यांनी बांगलादेशींच्या हिंसाचाराचा निषेध करणारा मोर्चा आझाद मैदानावर नेला त्यावेळी "आता यापुढे आपण हिंदुत्त्ववाचा मुद्दा उचलून धरणार का ? " असं विचारल्यावर त्यांनी हिदुत्त्व झटकून टाकलं. "छे छे हिंदुत्त्व वगैरे मला चिकटवू नका" असं उत्तर होतं.

आयुष्य हे.....

लेखक पियुशा यांनी बुधवार, 23/10/2013 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य हे...... संध्यासमयी सुमारे ४ वाजता आम्ही फेसबुक फेसबुक खेळण्यात मग्न असताना मोबाइल खणखणला , स्क्रीनवर घरचा नंबर. अरेच्या ! ह्यावेळी कोणी फोन केला असेल ? म्हणुन फोन पट्कन उचलला पलिकडुन आई " ह्यालो सोनुडया तुला एक तास अगोदर रजा मिळेल का ग ऑफिसातुन ? मी : का ग आई ? काय झाले ? काही गड्बड आहे का ? आई : हो जरा काम आहे मह्त्वाचे घरी आल्यावर सांगते पण तु ये पटकन . मी जरा चाचरतच विचारले आइ सगळे व्यवस्थित तर आहे ना ग ? काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला ?

दुनियादारी REMIX

लेखक विअर्ड विक्स यांनी बुधवार, 23/10/2013 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, गेले अनेक दिवस मी मिपा वरील खरडवही पाहुणा बनून वाचलेली आहे. आज प्रथमच सदस्य बनून लेखनाचा श्रीगणेशा करतोय. 'काचा'वर म्हणजेच whatsapp वर टिकटिक वाजली डोक्यात या गाण्याचे विडंबन तर सर्वत्र फिरत आहे. या गाण्यातील बोल ऐकून माझ्या गटामधील काही महिला सदस्यांनी याआक्षेप घेतला त्यावेळेस मला सुचलेले या गाण्याचे विडंबन आज सादर करत आहे. माझा मिपावरील लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न असल्याने चू.भू. द्यावी घ्यावी.

ओढ

लेखक विअर्ड विक्स यांनी बुधवार, 23/10/2013 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
निशब्द राहिलो जरी मी पाहुनी सारे न्याहाळले कायम तुज विसरुनी तारे, भावनेस शब्दांची जोड का हवी कधी ओळखशील माझी ओढ हि खरी...
काव्यरस

सरत चालली रात

लेखक आनंदमयी यांनी बुधवार, 23/10/2013 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
'अमर प्रेम' या चित्रपटामधील 'रैना बीती जाए'या हिंदी भावगीताला मराठीमध्ये साकारण्याचा हा प्रयत्न...

ऐका इंटरनेट देवा तुमची कहाणी - ४ (www आणि टीम बार्नर्स ली)

लेखक नानबा यांनी बुधवार, 23/10/2013 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
इंटरनेटच्या वाढत्या वापराबरोबरच त्याच्याशी निगडीत बाकी गोष्टींवरदेखील संशोधन होऊ लागल्यामुळे त्यांचाही वेगाने विकास होऊ लागला होता. इंटरनेटच्या सुरूवातीच्या काळात वेबसाईट्स चे पत्ते http:// ने सुरू होत असत. परंतु सामायिक डेटाबेस आणि presentation softwares च्या अभावामुळे माहितीच्या आदानप्रदानात बरेच अडथळे येत होते. त्यावर उपाय काढण्यासाठी बरीच संशोधनं चालली होती. टीम बार्नर्स ली या अडथळ्यावर मात करण्यासाठी एका सामायिक वेब पत्त्याची संकल्पना सर्वप्रथम मांडली ती टीम बार्नर्स ली यांनी.

दुबई सफरनामा भाग - 7 शेख झाएद - ग्रेट ग्रँड मॉस्क

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 23/10/2013 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
दुबई सफरनामा भाग - 7 शेख झाएद - ग्रेट ग्रँड मॉस्क 1 Figure 1 Late President of the United Arab Emirates (UAE), HH Sheikh Zayed bin Sultan Al Nahyan’s Mosque अबुधाबीच्या आमच्या ट्रिपचे महत्वाचे हे आकर्षण होते. ही जगातील सर्वोत्तम प्रचंड म्हणून गाजलेली मशीद. या मशीदीत महिलांना व अन्य धर्मियांना प्रवेश हे ही या मशीदीचे आणखी वैशिष्ठ्य म्हणता येईल.

दाटून मेघ येता

लेखक आनंदमयी यांनी मंगळवार, 22/10/2013 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
दाटून मेघ येता अवचीत सांजवेळी त्या संथशा नदीला सुचल्या अबोल ओळी.. हुंकार गर्जनांचा देई कुठून हाक, का मेघ सावल्यांना पुसती सवाल लाख? काळोख भेदणारी ये वीज लखलखूनी... घनदाट रात गाई मग एकटीच गाणी.. विरहात पोळलेली धरती पुन्हा नव्याने, उमलून आज येई मन दरवळे सुखाने! ही ओढ आगळीशी पूर्णत्व आज साधे मन होऊनी भुपाळी परतूनिया निनादे !! © अदिती जोशी