Skip to main content

दुनियादारी REMIX

लेखक विअर्ड विक्स यांनी बुधवार, 23/10/2013 14:39 या दिवशी प्रकाशित केले.

किटकिट होई दोघांत
हळहळ होई मनांत
बांधले बंधन पर्ेमाने ,
कळेना कसर कशाने.....

किटकिट होई दोघांत...

ना होती कसूर पर्ेमात,
तरी का बेसूर घरात
किटकिट होई…….
दिन सरत असे बोलत ,
निशा ना सरे स्वप्नात,
बदलला का हा खेळ सारा ,
आता फक्त का नयनी धारा

किटकिट होई…….

वाचले मन मी डोळ्याने ,
नाही पुसले अश्रू हाताने ,
भिजलो चिंब तुझ्या मायेत ,
का रखरख लागे आता पायात

किटकिट होई…….

संसार हा आहे एक खेळ ,
घालून दोन जीवांचा मेळ ,
अपमान सारे घालू पोटात
नव्याने करू एक सुरुवात

लेखनविषय:

वाचने 1162
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया