Skip to main content

"बाई गेली"

लेखक अमेय६३७७ यांनी शुक्रवार, 25/10/2013 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
बाई गावापुढं गेली, बांबू-काठीची कमान. खाल्ला नाही धड घास, चूल रांधताना जिनं, तिच्या तोंडामधे सोनं. बाई अहेवपणीची, लाल माखलेली टाळू. अंगी नेसलं जुनेरं, जिणं जगताना जिनं, तिला मरताना शालू. बाई लाकडावरती, तूप-तेल ओघळलं. एका गजऱ्याची नाही, आस माळलेली जिनं, तिच्या अंगभर फुलं. बाई चंदनाची हवा, जाळ भणाणून फार. माप ओलांडलं नाही, दारावेशीतलं जिनं, पापापुण्याच्या ती पार. -- अमेय

शाप

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 25/10/2013 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
(शतशब्द कथा) तिन्हीसांजेच्या संधिप्रकाशात एक कृश आणि अतिजिर्णं असा वृद्ध वटवृक्षाच्या पारावर विसावलेला होता. पारावर एक लहानसे हनुमान मंदिर होते. दिव्याला नुकतीच तेलवात केलेली असावी.लोक येतजात होती. तितक्यात एका लहान मुलाला घेऊन मोठा जमाव तेथे आला. देवदर्शन करून त्यांनी तिथल्या लोकांना प्रसाद वाटला. या वृद्धाला प्रसाद देत एकजण म्हणाला, "आशीर्वाद द्यावा बाबा, घरी पुत्र जन्मला". "मी असा भणंग.. काय आशीर्वाद देणार?" वृद्ध उत्तरला. "या मारूतीरायासारखा चिरंजीव हो म्हणा". वृद्धाच्या चेहर्‍यावर विलक्षण वेदना उमटली. अबोलपणे हात उंचावत त्याने मनोमन आशीर्वाद दिला.

ढोकळा

लेखक त्रिवेणी यांनी शुक्रवार, 25/10/2013 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- 2 वाटी ढोकळा पीठ, (1किलो जाडा तांदुळ +1 किलो हरबरा डाळ गिरणीतून रवाळ दळून आणावे.) दही- पावून वाटी, कोमट पाणी- साधारण 1 वाटी, 8-10 पाकळ्या लसूण आणि 4 हिरवी मिरचीचा खरडा, हळद- ½ टे. स्पुन, मीठ आणि साखर- चवीनुसार, इनो- 1 टे.

मिपा वरील सुधारणांसाठी विनंती

लेखक मेघनाद यांनी शुक्रवार, 25/10/2013 02:13 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा हे मराठी संकेतस्थळ समजल्यापासून अगदी रोज न चुकता भेट देत आहे. मिपावर रोज येणारे लेख, कविता हा म्हणजे तर जणू खजिनाच आहे. इथे एकदा भेट दिली कि काहीतरी मनोरंजक, ज्ञानवर्धक लिखाण नाकीच वाचायला मिळत. इस्पिकचा एक्का, गवि, स्पा, वामनसुत, विसोबा खेचर, जॅक डनियल्स यांचे लेख म्हणजे तर पर्वणीच असते वाचकांसाठी. हे सर्व वाचत असतांना लेखनासारख्या नवीन क्षेत्रात माझ्यासारख्या नवीन व्यक्तीला काहीतरी लिहिण्याची स्फूर्ती न येओ तर नवलच. मला ह्या संस्थळावर काही गोष्टींची उणीव भासते, ती मी इथे मुद्देसूद मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.

अथ: चिखल कथा/ शतशब्द कथा

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 24/10/2013 19:31 या दिवशी प्रकाशित केले.

चिखलात होते कमळ, बुडवुनी चिखलात सर्वांग, तोडले तयाने कमळ, कमळाला लागले चिखल. सायकल वर होउनी स्वार, तक्क्षणी पोहचला घरी. सायकलला लागले चिखल. देवावर वाहिले पुष्प, चिखल पोहचला देव्हाऱ्यात. चिखलात बरबटलेले वस्त्र फेकले अस्तव्यस्त, हात आणि घड्याळाला ही लागले होते चिखल. चिखलाने बरबटलेले घर पाहुनी, आठवण झाली बायकोची. करायास घर साफ घेतली हातात झाड़ू, चिखल लागले झाडूला. भिंतीवर उडले शिंतोडे, हत्तीच्या चित्रफलका वर. चिखलाने शोभिवंत झाले घर, कृपा झाली चिखल लक्ष्मीची. इति.

अरे रे, मन्ना दा गेले!

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 24/10/2013 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
वाईट वार्ता बहुधा खरी ठरते, आताच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक मन्ना डे यांचं बेंगलुरु येथे दीर्घ आ़जाराने निधन झाल्याचं वाचलं, खूप वाईट वाटलं. Manna Dey त्याना श्रद्धांजली म्हणून काही गाणी खाली देतोय, वेळ मिळेल तशी भर रसिक घालतीलच.

करवा चौथ

लेखक क्रेझी यांनी गुरुवार, 24/10/2013 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी एका वातानुकुलित मॉल मधे शिरतांना कानांवर एक संवाद धडकला दारामधेच,सर्वांगाला तपासून आत सोडण्याच्या यंत्रामधून मी जात असतांना तिथे उभ्या असलेल्या दोन सिक्युरिटी गार्ड्स स्त्रिया बोलत होत्या - पहिली स्त्री - कल करवा चौथ का उपास किया का गं? मैने तो नहीं किया, बहुत कडक होता हय! दुसरी स्त्री - कुत्सितपणे हसत, करवा चोथ! मेरेकु इसी जनम में पती नहीं चाहिए तो आगेके सात जन्मोंके लिए कौन उसे मांगेगा! मी ते ऐकून पुढे सरकले पण डोक्यामधे तो संवाद घोळत राहिला. मॉलमधे ब-याच स्त्रिया हातावर मेंहदी काढलेल्या दिसल्या तेंव्हा वाटलं हे करवा चौथ नेमकं काय असेल बरं?

तू...!!!!!!!!!!!!!

लेखक पल्लवी मिंड यांनी गुरुवार, 24/10/2013 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दात गुंफले तुला मनातच नेहमी झूलवले तुला खाष्ट या जगापासून मनातच लपवले तुला इवल्याश्या तुझया कल्पनेने स्वप्नवादी बनवले मला वैराण या जिण्याकडे दुर्लक्ष करणे शिकवले मला स्वप्नातल्या तुझया सुमधुर स्वराने गाणे शिकवले मला गाण्याच्या प्रत्येक रागाबरोबर आयुष्याचे लेणे भेटले मला कशी म्हणू मी तुला माझी कल्पना कारण तुझया विचरानेच घडवले आज मला

ख्यातनाम आणि सुप्रसिद्ध मन्ना डे अर्थात मन्नादा कालवश !

लेखक psajid यांनी गुरुवार, 24/10/2013 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
ख्यातनाम आणि सुप्रसिद्ध गायक मन्ना डे अर्थात मन्नादा यांनी आज पहाटे बंगळूरू येथे अखेरचा श्वास घेतला. मृत्युसमयी त्यांचे वय ९४ होते. शास्त्रीय बाजातील गीत गायन ही त्यांच्या गायकीचे वैशिष्ट होते. हिन्दी, भोजपुरी, मल्याळम, मराठी इत्यादी भाषांमध्ये त्यांनी जवळपास साडे तीन ते चार हजार गीत गायली आहेत. मुकेश, मो. रफी किशोरकुमार यांच्या काळात ही आपली वेगळी गायकी त्यांनी रसिकप्रिय केली.

त्रासदायक बॉस आणि ऑफीस मधील राजकारण कसे सांभाळावे ?

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी गुरुवार, 24/10/2013 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
आपण् आपल्या दिवसातले बरेचसे तास ऑफीसमधे असतो(काही सुदैवी जीव स्वताचा व्यवसाय करतात !! ). मन लावून काम करावे आणि त्या काळात डोके शांत आणि नीट रहावे अशी इच्छा सगळ्यांचीच असते. पण ह्या सगळ्याला सुरूंग लावण्याचे सामर्थ्य असलेला बॉस नामक खत्रूड प्राणी जगणे हैराण करून सोडतो. 'भीक नको पण कुत्रे आवर' अशी परिस्थिती निर्माण करण्याची ताकद प्रत्येक बॉसकडे असतेच . काही वर्षांपूर्वीची 'हरी साडु' ची जाहिरात अजूनही कित्येक जणांना आठवत असेल.