Skip to main content

मॉरिशस सफरनामा (1) – प्लॅनिंग आणि प्रस्थान

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 13/11/2013 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
डिप्लोमाला असताना, त्यावेळची ‘दिल की धडकन’, शिल्पा शिरोडकर, आमच्या विरारचा छोकरा गोविंदा, ‘टारझन’ फेम किमी काटकर, अभिनयसम्राट अमिताभ बच्चन आणि दस्तूरखुद्द रजनीकांत असा सगळा मसाला ठासून भरलेला हिट चित्रपट, हम, त्यावेळी कैक वेळा पाहिला होता. खास आकर्षण अर्थात ‘दिल की धडकन’, शिल्पा शिरोडकर. त्यात एक गाणे आहे ‘सनम मेरे सनम...कसम तेरी कसम’ . त्यावेळी, ते गाणे बघताना शिल्पा शिरोडकरच्या तोडीस तोड आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे निळेशार समुद्र आणि सफेद रेतीचे किनारे असलेला सुंदर मॉरिशस.

Will you kill the fat man? नैतिकते चा मुलगामी वेध घेणारी एक विलक्षण TEST !

लेखक कुमारकौस्तुभ यांनी बुधवार, 13/11/2013 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
या चाचणीची पार्श्वभुमी नैतिकते च्या तत्वाचा शोध घेणारी ही Test सर्वप्रथम बनविली ती Philippa Foot या तत्ववेत्ती ने आणि १९६७ मध्ये आपल्या Abortion and Doctrine of Double Effect या रीसर्च पेपर मध्ये प्रकाशीत केली. पुढे Judith Thomson या दुसरया एका तत्ववेत्तीने त्यात Fat Man चा अंतर्भाव करुन त्याला एक नविन कलाटणी दिली. आता या Test चे भरपुर variations तयार झालेले आहेत आणि ही वेगवेगळ्या तज्ञांनी यात भर घालुन अतिशय उत्क्रांत झालेली अशी चाचणी आहे. ही अतिशय समर्थपणे नैतिकतेच्या प्रश्नाचा मुलगामी असा वेध घेते.

भूकंप....!

लेखक psajid यांनी बुधवार, 13/11/2013 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज खूप दिसांनी पुन्हा त्या वास्तूत आलु, पडक्या पांढरीच्या इटा बघून काळूखात त्या हरवून गेलू !! माती सारता हातांनी डोळं उघडं निर्जीव धूड, नवलाईत सगळं डोळं वासं झोपल्याचं त्यात गूढ !! वाटतंय राहून राहून मना माती कृतघ्न नसावी झाली, आखीरपर्यंत आसंल थरथरली जरी शेजाऱ्यांनी मान ढाळली !! या मातीतच वलावा उभारा त्यावर निर्धास्त सोडला पसारा, दोन चिमुकली फळे संसारा झोपली गार ओढून ढिगारा !! दैव घालाच तिथं वास्तूचं काय ? बायको मुलांसंगती कारभारी जाय, पर मी आकारल्या मातीला वाटलं असावं समद्यासोबत माझा हात धरायचा नाय !! डोळ्यांतल्या पाण्याबरोबर पांढरी माय चमकत हुती, पाणी साचल्या डवंग्यात मातुर पानकणसं तुरय
काव्यरस

आठवण

लेखक वडापाव यांनी बुधवार, 13/11/2013 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
छोट्याशा या जगात माझ्या तू खूप मोठी कामगिरी केलीस मी जरा थोडं अजून जगावं म्हणून स्वतः झिजुन झिजुन मेलीस माझा हट्ट पुरवत आलीस नेहमी सगळी कामं पाठी टाकून सलगी केलीस माझ्याशी तू विश्वास ठेवलास डोळे झाकून ऐश-आरामात जगायची सवय होती, शून्य विकास फक्त विलास वाईट दिवस आल्यावर बिथरलो तेव्हा फक्त तूच आधार दिलास भावनिक ब्लॅकमेल करुन मी तुझ्याकडून घेतलं स्वतःला आंजारून गोंजारून तू दिलेला मैत्रीचा हात पकडून चान्सही मारला प्रेमाचा मी चोरून खरंय की मी खोटं बोलत आलोय खोटं बोलून मी खरंच खोटारडा झालोय पण एक खरी गोष्ट तुला सांगू पाहतोय तुझ्यावरच्या प्रेमात अगदी बुडून निघालोय कंटाळलोय मी दूरून प्रेम करून मला

तू आलीस त्याला सोडून

लेखक दिपक.कुवेत यांनी मंगळवार, 12/11/2013 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आज परत फा......र दिवसांनी विडंबनाचा मूड जमून आलाय तो कितपत जमलाय हे तूम्हिच ठरवा. खालील विडंबनाचं मूळ श्री. वडापाव ह्यांच्या ह्या कवितेत आहे. सदर विडंबन श्री. वडापाव ह्यांची माफि मागुन. प्रेमाचा त्रिकोण / एक फुल दो माली हि नेहमीच एखाद्यासाठि वेदनामय घटना. त्यातुन प्रेयसी आपल्या सख्ख्या मित्राची झाली तर अजूनच नैराश्य येतं. पण कालांतराने तीला मित्राच्या प्रेमातील फोलपणा जाणवतो आणि मग ती परत त्याच्याकडे येते........कायमचीच!
काव्यरस

झुंजु मुंजू

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 12/11/2013 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
मेघांस कांही रुपेरी किनारी तळी त्याच काळ्या कपारी कपारी जणू कातळाचे भले अंग ओले तया जोजवी भास्कराची सवारी तमा ना जगाची भरे रोज मेळा सावळ्या कतारी सकाळी सकाळी क्षितीजी पहाट झुंजु मुंजू हिवाळी सरी पावसाच्या आता,…. दूरच्या आभाळी ……. ……………… अज्ञात
काव्यरस

संकीर्ण : चौकशी ; मदत, सल्ला हवा

लेखक मन१ यांनी सोमवार, 11/11/2013 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
काही बाबतीत सल्ला हवा आहे. अगदि घरगुती वापरातील इएलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते अगदि नाव लावण्यापर्यंत. इथे विचारण्यास संकोच वाटतो आहे. पण मदत मिळण्याची , निदान योग्य बाजूकडे अंगुलीनिर्देश होण्याची बरीच शक्यता वाटल्याने इथे धागा टाकतो आहे. १. विवाहोत्तर मुलीने नाव आहे तसेच ठेवले, तर सरकारदरबारी कुठे अडचण येण्याची शक्यता आहे का? किंवा बँक, पासपोर्ट, व्हिसा ह्या ठिकाणी काही त्रास होउ शकतो का? एक काल्पनिक नावांनी उदाहरण घेउ. समजा, "अवनी महेश गणोरे " हिचं "नरेश सोपान आवळे" ह्याच्याशी लग्न झालं; तर आधीचं आहे तसच नाव तिला सुरु ठेवण्यास काय काय अडचणी आहेत?

डोंबिवली दिवाळी कट्टा.....दि. १७/११/२०१३

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 11/11/2013 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, ह्यावेळी दिवाळी कट्टा डोंबिवलीला करायचे नक्की झाले आहे. वेळ रात्री ८ वा. ठिकाण : नंदी पॅलेस रविवार असल्याने हॉटेल मध्ये गर्दी असणारच आहे.त्यामुळे ८ नंतर जागा मिळवायला खूप त्रास होतो.मी आणि प्रथम फडणीस जागा अडवून ठेवूच.जे येणार असतील त्यांनी व्य.नी. करावा.ह्यावेळी बिल ज्याचे,त्याने द्यायचे, असे ठरले आहे. साधारण दर माणशी ५००रु. खर्च येईल.