Skip to main content

ग़ावातलं भुत

लेखक mohite jeevan यांनी गुरुवार, 21/11/2013 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
‘भुत भुत.. भुत... भुत....’ आसा आवाज विहीरीजवळ जसा घुमला तसे ग़ावातले लोक जाग़े झाले. पण घराबाहेर कोणी पडेना, का ? तर मध्यरात्री नुकतीच आमावस्या लाग़ली होती, कुत्री भुकत होती,रडत होती. जो तो घरात दडुन बसावा तसा बसलेला. सकाळ झाली आणि जो तो घरात लिंबु दोरा बांधु लाग़ला, नारळ फोडु लाग़ला, सकाळी बायका विहीरीवर पाणी भरण्यास ग़र्दी केली होती,त्या विहीरीवर एकच विषय ‘भुताचा’, कोणि म्हणत काल रात्री भुत दिसलं,तर कोणि म्हणत भुताची पालखी निघाली रात्री, आता बायकाच्या तोडंचा विषय पुर्ण ग़ावभर झाला,आता ज्या त्या घरात भुताच्या बाता.

हझल

लेखक विदेश यांनी गुरुवार, 21/11/2013 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
ते वार लाटण्याचे चुकवू कितीक आता हा पोळपाट हाती तोही फुटेल आता पाठीस ढाल केले त्या लाटण्यासमोरी डोक्यावरी निशाणा धरणार हाय आता तो संपला 'पुरुषदिन' कळता तिला अखेरी लोटांगणाविना ना पर्याय काय आता प्राविण्य नेमबाजी कौतूक फार झाले का भोगणे तडाखे मज ह्या वयात आता ती सात जन्म नशिबी हिटलर म्हणून आली आज्ञा किती झुगारू उरले न त्राण आता . . .
काव्यरस

तरूण तेजपाल, तेहेलका आणि पत्रकारीतेतील नैतिकता

लेखक विकास यांनी गुरुवार, 21/11/2013 02:52 या दिवशी प्रकाशित केले.
तेहेलकाचे नाव ऐकल्यावर भारतात "स्टींग ऑपरेशन" कसे प्रचलीत झाले ते लक्षात येते. बंगारू लक्ष्मण यांचे लाच घेताना काढलेल्या चित्रफिती आठवतात. तोच प्रकार इतर राजकारण्यांबरोबर देखील केला. मोदींच्या विरोधात गोध्रादंगलीवरून आवाज करणार्‍यांमधे तेहलकाच पुढे होते. त्याचे संस्थापक - प्रमुख संपादक तरूण तेजपाल हे इंडीया टूडे, आउटलूक आदी कम्युनिस्ट विचारसरणींच्या माध्यमातून वर आलेले असल्याने सगळा तेहेलका हा भाजपा, संघ आणि तत्सम (आणि कधी कधी काँग्रेसच्या) विरोधातच असणे ह्यात काहीच आश्रर्यकारक नव्हते.

प्रतिभा सान्त की अनंत?

लेखक प्यारे१ यांनी गुरुवार, 21/11/2013 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! नेहमीच्या पेक्षा थोडा वेगळा विषय. म्हणजे पटतंय का बघा. मला जे वाटतंय ते लिहीतोय. अनेक क्षेत्रातील कला- अभिनय, दिग्दर्शन, गीतकार, साहित्य- ह्यात कथा, कादंबर्‍या, कविता, सगळे प्रकार, संगीत, क्रिडा नि अनेक अशाच क्षेत्रांतील बर्‍याच प्रतिभावंत लोकांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला हे लोक ज्या दर्जाच्या क्रिएशन्स (निर्मिती?) करतात तशा, त्याच दर्जाच्या क्रिएशन्स नंतर करु शकत नाहीत का? उदाहरणादाखलः ए आर रेहमान ह्या अत्यंत प्रतिभावान संगीतकाराची कुठली गाणी आपल्याला पटकन आठवतात?

तू गुड बॉय ना

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 20/11/2013 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख वाचला या लेखातल्या एलिफंटवरून जाणवलं. आम्ही लहानपणी अगदीच खेडवळ होतो. आजकालची मुले छान टाय, बूट मधे असतात. पाहूनच ती कशी स्मार्ट दिसतात. इंग्लिश फाड फाड बोलतात. आम्हाला इंग्लिश जाऊद्या हिंदीसुद्धा ऐकायला कधी मिळायचे नाही. चपला घालणे सातवीपर्यंत माहीत नव्हते. जीवन शिक्षण मंदिर नावाची शाळा. शाळेत गेल्यावर शाळेची घंटा अडकवण्यापासून, शाळा भरताना ती वाजवण्यापर्यंत सर्व कामे मुलांनाच नेमून दिलेली असत. शाळेत आलो की पहिल्यांदा खराटा हातात घेऊन अंगण झाडावे लागे. पडलेले कागदाचे कपटे बाजूला करून मैदान साफ करावे लागे.

एक आगळा Lesbian विवाह सोहळा !

लेखक मारवा यांनी बुधवार, 20/11/2013 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम या सुंदर फ़ोटोग्राफ़्स वर एक नजर टाका ! http://www.stephgrantphotography.com/blog/shannon-seema-indian-lesbian-… काही दिवसांपुर्वीच शॅनॉन आणि सीमा या दोन स्त्रियांमधील हा सुंदर लेस्बीयन विवाहसोहळा लॉसएंजल्स या अमेरीकेतील शहरात थाटामाटात संपन्न झाला. हा एका अर्थाने क्रांतीकारी विवाह म्हणावा लागेल. कारण हा नेहमीसारखा एक स्त्रि व एक पुरुष यांच्यातील विवाह नव्हता. तर एका स्त्रि ने केलेला दुसरया स्त्रि बरोबर चा विवाह होता.

पद्म पुरस्कार… सन्मान की खैरात ?

लेखक रामबाण यांनी बुधवार, 20/11/2013 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
देशातल्या सर्वोच्च अशा पद्म पुरस्कारांची घोषणा होते. लगेच त्यावरुन वाद होतात. काही काळ तरी आपली चांगली करमणूक होते. या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘पद्म’ वरुन दक्षिणात्य गायिका एस. जानकी, कुस्तीवीर सुशीलकुमार यांच्या मानापमान सोहळ्याचीच जास्त चर्चा झाली. खरं तर त्यावेळीच म्हणजे जानेवारीत मी हा ब्लॉग लिहायला घेतला होता. पण नेहेमीप्रमाणेच आळस आणि पार्किन्सन्स लॉ या दोन्हींमुळे लिहिणं मागे पडलं. आता पद्म पुरस्कारांवरुन पुन्हा चर्चा सुरु आहे. पुरस्कार मिळालेले दिग्गज पद्मरत्न, या पुरस्कारांसाठी आपल्या घरच्यांचीच कशी शिफारस करतात वगैरे बातम्या सुरु झाल्या.

उत्तर-पूर्व भारत: निसर्गप्रेमींसाठी पर्वणी

लेखक तिमा यांनी बुधवार, 20/11/2013 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
चारधामच्या अनुभवाने पोळल्यानंतर आता हिमालयात कुठे फिरायला जावे याचा विचार करत होतो. कारण एकदा का तुम्ही हिमालयात जाउन आलात की तो तुम्हाला बोलावतच रहातो. आणि तुम्हीही कुठल्यातरी अनामिक ओढीने त्याला प्रतिसाद देऊ लागता. नॉर्थ-ईस्ट कधीचे डोक्यांत होते. अचानक संधी चालून आली आणि एका टूर तर्फे आम्ही तिथले बुकिंग करुन टाकले. मुम्बई-गुवाहाती-काझीरंगा-बोमदिला-तवांग्-दिरांग् (सर्व अरुणाचल)- गुवाहाती-शिलाँग्-चेरापुंजी-शिलाँग्-गुवाहाती-मुंबई असा ११ दिवसांचा कार्यक्रम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होता. गुवाहातीला पोचल्यावर आमच्या दिमतीला इनोव्हा होत्या. प्रथम आम्ही काझीरंगा अभयारण्याला गेलो.

केईनोरहासेन

लेखक निनाद यांनी बुधवार, 20/11/2013 06:27 या दिवशी प्रकाशित केले.
केईनोरहासेन लुडो नावाचा एक पेज थ्री पत्रकार आहे. हा दास ब्लाट नावाच्या वृत्तपत्रासाठी त्याच्या फोटोग्राफर सोबत काम करतो. याचे प्रमुख काम म्हणजे प्रसिद्ध व्यक्तींवर हेरगिरी करायची आणि त्यांचे बिंग किंवा कुलंगडी बाहेर काढायची. कुठे मंत्र्याच्या मैत्रिण प्रेग्नंटच असल्याचे फोटो छाप वगैरे उद्योग चालत असतात. त्यासाठी तो आपल्या उर्मट आणि उन्मत्त स्वभावाचा आणि तेज बुद्धीचा चांगला उपयोग करून घेत असतो. पण यासोबतच तो व्यवसायाचा वापर मनमुराद सेक्स मिळवण्यासाठीही करतो. झकास सिक्स पॅक शरीर लाभलेले असल्याने बायकाही त्याच्याकडे आकर्षित होत असतात.

कारवार- दांडेली भाग-२

लेखक पुतळाचैतन्याचा यांनी मंगळवार, 19/11/2013 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या भागाच्या प्रतिसादानुसार जास्त वर्णन करायचा प्रयत्न केला आहे. कारवार च्या समुद्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते.