Skip to main content

कांदे पोहे … एक अनुभव…

लेखक चिन्मय श्री जोशी यांनी शुक्रवार, 29/11/2013 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
झालं काय होतं कि आमच्या लग्नाची घाई झाली होती घरच्यांना.... आणि तसं बघायला गेलं तर सगळ्या "आवडत्या" मैत्रिणींच्या लग्नाचं जेवण पण आम्ही पचवलं होता (दुःख पचवलं या अर्थी पचवलं).... म्हणून ठरलं कि आता बघायच्या कार्यक्रमांना सुरुवात करायची आणि मग पत्रिका, फोटो (हा माझ्या आज पर्यंतच्या काढलेल्या सगळ्या फोटोत सगळ्यात जास्त पैसे देऊन काढलेला सगळ्या वाईट फोटो होता... ) इत्यादी तयारी झाली आणि शुभारंभ (????) झाला....

मैत्री......एक आगळंवेगळ नातं

लेखक अनिल तापकीर यांनी गुरुवार, 28/11/2013 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
(सदरचा लेख याला कविता म्हणावी की निबंध काही समजत नव्हते माझी मुलगी आरती दहावित शिकते तिने स्वता तयार करुन वाचयला दिला नि थक्क झालो. तिचे हे पहिलेच लेखन वाचुन खुप आनंद झाला. पहा आपल्याला कशी वाटते.) कु. आरती आनिल तापकीर , भारती विध्यापीठ कन्या प्रशाला , कोथरूड ,पुणे गाव- मुलखेड . तु मैत्रीण नाहीस , मैत्रीतला पहिला शब्दच तु आहेस . तु एक दिवस जरी शाळेला आली नाहीस कि असं की काही तरी घरीच विसरले . तुझ्यासारखी मैत्रीण मिळण्यासाठी नशीबच लागते . मैत्री करण्यासाठी प्रेम लागतं . तू माझं जीवनच बदलून टाकलं आहेस . मनातलं स्वप्न साकार करण्याची जिद्द दिली आहेस.

ऐक सखे

लेखक अमेय६३७७ यांनी गुरुवार, 28/11/2013 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
कशाला उसासे हवे आर्जवांचे   नवी वागण्याची तर्‍हा ही कशी उगा श्वास श्वासांस जाळीत येतो  फिरे जो तुझा हात देहानिशी  तिथे चंद्र माथी चढूनी नभाच्या  मनासारखे चांदणे शिंपुदे  रतीला म्हणावे तुझ्या साजणाचे  जरासे निखारे विखारास दे   प्रिये खेळ आहे खरा संयमाचा  कसे आवरावे कळेना तुला  अगे मंद चालीतली रागदारी  असे ही नव्हे हा स्वरांचा झुला  जसे मोगर्‍याने फुलावे सुखाने  तसे वाढवूया निशेला सखी   हळू माधुरीचे भरू देत प्याले  उधाणास येऊ नको सारखी    -- अमेय

मॉरिशस सफरनामा (३)

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 28/11/2013 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
>> तर तेही असो, जलसा बीच रिसॉर्टला पोहोचल्यावर असा नजारा होता. रिसॉर्टला पोहोचल्यावर त्यांच्या रिसेप्शन मॅनेजरने सर्व चेक इन फॉर्मॅलिटी पूर्ण करून झाल्यावर एक आनंदाची बातमी दिली. प्रत्येक आठवड्यात एकदा हॉटेल मॅनेजमेंट कॉकटेल पार्टी आयोजित करते आणि त्या आठवड्यातली ती कॉकटेल पार्टी आम्ही पोहोचलो त्या दिवशी होती.

पुखेत-पट्टाया-बँकॉक टुर - दिवस पहिला-दुसरा/भाग २

लेखक दिपक.कुवेत यांनी गुरुवार, 28/11/2013 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
========== १/१, ========== चवदार जेवण, मस्तपैकि ताणुन दिल्यावर प्रवासाचा थकवा कुठच्याकुठे पळुन गेला आणि आम्हि पुखेत शहर बघायला निघालो. पुखेत किंवा ऑल ओवर बँकॉक मधे एक बरं आहे कि तुम्हाला साईट सीईंगचे बरेच ऑप्शन्स उपलब्ध असतात शीवाय बरेच टुर ऑपरेटर्स पण असतात (जर तुम्हि गाईडेड टुर बरोबर नसाल तर उदा. केसरी, सचिन ट्रॅव्हल्स वगैरे). तर हातात राहिलेला वेळ आय मीन संध्याकाळ पाहता आम्हि वॅट चलाँग (देवळांचा परीसर) आणि बिग बुद्धा पहायचं ठरवलं. पैसे भरुन लगेच दुसर्‍या दिवशीची पुर्ण वेळ फुकेत आयलंड टुर पण बुक केली. १.

बेधुंद मनीचे बोल...

लेखक आनंदमयी यांनी गुरुवार, 28/11/2013 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
बेधुंद मनीचे बोल निसटून चालले होते चंचलशा त्या लहरींना मी हळूच टिपले होते ते बोल खुळेसे काही अविचल त्या अस्फुट तारा वळणाशी भिरभिरणारा तो सोसाट्याचा वारा बांधून कधीचे ज्यांना मी उरात जपले होते मी बोल बोलता सारे अस्तित्वच बहिरे झाले अविभाव आर्त स्वत्वाचे ते अजून गहिरे झाले जिद्दीच्या तेज कणांनी आयुष्य रापले होते त्या उधाणलेल्या लहरी संकोच गोठवुन गेल्या, विझलेल्या सामर्थ्याला अवचीत पेटवुन गेल्या...! मी ध्येय गाठले तेव्हा हे भान हरपले होते... © अदिती शरद जोशी

घसरता रुपया सावरण्यासाठीचे उपाय...

लेखक अव्यक्त यांनी गुरुवार, 28/11/2013 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
घसरता रुपया सावरण्यासाठीचे "साधे" उपाय *********************************** १) दरमहा आपण फक्त एक लिटर पेट्रोल वाचवूया. *कसे तेही सांगतो. फार काही नाही. सुट्टीच्या दिवशी जवळच कुठे जायचे तर पायी किवा सार्वजनिक वाहतुकीने जावे. (०.३ लिटर बचत नक्की.) *पार्किंगमधेच गाडी चालू करून बाहेर काढण्या पेक्षा इमारती बाहेर आणून सुरु करू. (०.३ लिटर बचत नक्की.) *सिग्नल ला गाडी बंद ठेवू (०.१ लिटर बचत नक्की ) *रस्त्याने जाताना निष्कारण ब्रेकवर पाय दाबून ठेवल्याने इंधन जास्त जळते. तुम्ही पहा ना, अनेक गाडीचे ब्रेक लाईट कायम लागलेले असतात. गाडी तरी कडे avarage देणार? हि सवय टाळूया.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना विनम्र अभिवादन

लेखक सचीन यांनी गुरुवार, 28/11/2013 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीज्योत महात्मा फुले ह्यांचा २८ नोव्हेंबर हा महानिर्वाण दिवस. जातीयवादाच्या चक्रात सापडलेल्या दिन दुबळ्यांचा कैवारी म्हणजे महात्मा फुले. ह्या स्वाभिमानी नेत्याने देशाच्या सामाजिक जीवनात अशी काय उलथापालथ घडवली कि त्याची दखल इतिहासाला घ्यावीच लागली.त्याग,आदर्श, साहस ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महात्मा फुले.

अष्ट्विनायक यात्रा खाजगी गाडीने करण्या बाबत माहीती ह्वी आहे.

लेखक शिल्पा नाईक यांनी गुरुवार, 28/11/2013 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, इथे कोणाला खाजगी गाडीने अष्टविनायक यात्रा करण्याबद्दल माहिती आहे का? जसे की, आम्हाला डोंबिवली हून २ दिवसात ही यात्रा पुर्ण करायची आहे. सोबत ४ वर्षाची २ मुलं आणी ६० च्या आतील जेष्ठ नागरीक आहेत.