Skip to main content

माझे शाळा अनुभव

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी गुरुवार, 10/11/2022 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
माझे शाळेचे अनुभव खुप छान होते. शाळेच्या मुख्य मैदानात एखादा कार्यक्रम असायचा. कार्यक्रम असला शाळेत तर भयानक दंगल घडायची. जनरली प्रमुख पाहुणे नंतर कार्यक्रमस्थळी येतात. पण माझ्या शाळेत प्रमुख पाहुणे आधीच स्टेज वर आणून बसवले जायचे. स्टेज समोरच असलेले बाहेर जायला फक्त २ गेट. ते गेट पक्के बंद करून, कूलूप लावून समोर दोन शिपायांचा खडा पहारा ऊभा केला जायचा. त्या नंतर दोन तासाचं भाषण एकवण्यासाठी पाचवी ते दहावी चे विद्यार्थी आणले जायचे. कुणी पळून जाऊ नये म्हणुन सर/ मॅडम हातात मोठमोठ्या काठ्या घेऊन ऊभे असायचे. पण तरी एखादा मोठा लोंढा कार्यक्रम सुरू असताना किंवा सुरूवातीलाच गेट जवळ पळत सुटायचा.

एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - २

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 10/11/2022 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
image host इव्हॅन तुर्गेनेव्ह (९ नोव्हेंबर १८१८ ते ३ सप्टेंबर १८८३) Turgenev: the Novelist's Novelist एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - २ काही वर्षांपूर्वी काही क्षुल्लक कारणांमुळे (पण माझ्यासाठी महत्वाचे) एका विचित्र परिस्थितीत मला सहाएक महिने एका “ओ...” नावाच्या गावात राहण्याचा प्रसंग आला. हे गाव डोंगराच्या उतारावर वसले आहे. लोकवस्ती असेल साधारणतः आठशे एक. तसे लोक गरीबच वाटले मला. जुनीपुराणी झ्ाोपड्यांसारखी दिसणारी त्यांची घरे, मला तरी गलिच्छ वाटली.

काही लिहावयाचे आहे.......

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 10/11/2022 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
काही लिहावयाचे आहे पण लिहीणार नाही ठावे मजला शब्द माझे, कुणी वाचणार नाही अंतरात माझ्या, भावनांना फुटती धुमारे कोणास वेळ आहे, त्यांचे प्रदर्शन मी मांडणार नाही कल्लोळ जाणिवांचा, उसळे लाटा परी मनात परी अक्षरांचा किनारा तयांना लाभणार नाही मनी आठवणींचे, सप्तरंग जरी विखुरले तरीही शब्दचित्र त्यांचे,मी रेखाटणार नाही साद प्रतीसाद, छिन्नी हातोडीचे घाव ठोके पडल्याविना मुर्ती घडणार नाही. मी उपेक्षितांचा धनी होणार नाही.... जीथे प्रतीसाद भावनांना मिळणार नाही

एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग १

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 09/11/2022 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
image host इव्हॅन तुर्गेनेव्ह (९ नोव्हेंबर १८१८ ते ३ सप्टेंबर १८८३) Turgenev: the Novelist's Novelist रशियन कथा मोठ्या असतात. बऱ्याच लोकांना या वाचताना कंटाळवाण्या वाटतात. ही कथाही तुम्हाला कंटाळवाणी वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण रशियन कथांमध्ये माणसांचे स्वभाव, त्यांच्या स्वभावाचा इतरांवर होणारा परिणाम अगदी अचुकपणे टिपलेले असतात. एकतर्फी प्रेमाचे दुष्परिणाम आपल्याला येथेही दिसून येतो पण शेवटी ते प्रेमच असते.

Silver Trumpet and Trumpet Banner

लेखक पराग१२२६३ यांनी सोमवार, 07/11/2022 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
ऱाष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 ऑक्टोबरला राष्ट्रपती अंगरक्षक (President’s Body Guard) दलाला राष्ट्रपतींची चंदेरी तुतारी आणि पताका प्रदान केली.

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना

लेखक मार्गी यांनी सोमवार, 07/11/2022 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना ✪ कृतज्ञता! ✪ निसर्ग तीर्थयात्रा ✪ तयारी व नियोजन ✪ भारत विकास संगम आणि इतर अनेक संस्था ✪ वेंगुर्ला राईड- सागरा प्राण तळमळला! ✪ केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे! ✪ निसर्गाने प्रत्येकाला क्षमता दिली आहे ✪ कुडाळ आणि कराची! सर्वांना नमस्कार. मानसिक आरोग्य जागरूकतेसंदर्भात संवाद हा विषय घेऊन महाराष्ट्रातल्या कुडाळवरून गोवा- बेळगांव- बागलकोट- कलबुर्गी- हैद्राबाद- वारंगल- गडचिरोली- नागपूर असा साधारण १४५० किलोमीटरचा १८ दिवसांचा सायकल प्रवास नुकताच केला. वाटेमध्ये खूप सुंदर अनुभव मिळाले.

मद्रासकथा-२

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी रविवार, 06/11/2022 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
. भारतातील पहिल्या महिला आमदार . भारतात आरक्षण ना आंबेडकरांनी आणले होते ना पेरियारानी. ते आधीच आले होते. ब्राह्मणवादाच्या विरोधात मद्रासमध्ये जस्टिस पार्टीची स्थापना झाली आणि त्यांनी सरकार स्थापन केले हे मी आधी नमूद केले आहे. त्यावेळी पेरियार काँग्रेसमध्ये होते, आणि खादीचा प्रचार करत होते. जस्टिस पार्टीनेच आरक्षण विधेयक मंजूर केले. पेरियार यांची त्यात कोणतीही भूमिका नव्हती.

रंगभूमीवरची पहाट

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी रविवार, 06/11/2022 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
पुष्पांमाजी मोगरी आणि परिमळांमांजी कस्तुरी असलेल्या माझ्या माय मराठीचं एक वैशिष्ट्य म्हणजे लवचिकता. लाकूड तेच - पण जात्यात घातलं की खुंटा होतो, गोठ्यात रोवलं की खुंट होतो आणि भिंतीत ठोकलं की खुंटी होते. त्याचप्रमाणे, चौथरा तोच - पण रस्त्याच्या कडेला असेल तर आम्ही त्याला कट्टा म्हणतो, झाडाखाली असेल तर पार आणि समोर नारळ फोडून धूप लावला की आमच्यासाठी तो होतो "रंगमंच"! बाकी ते तुमचे लाइट्स, मायक्रोफोन, विंगा वगैरे सगळे लाड आहेत. ते नसले म्हणून "प्रयोग" थांबत नाही. माझी मराठी लोकं पण जरा वेडीच. ह्यांना थ्री-डी अ‍ॅनिमेशनचं अप्रूप नाही की कुठल्या स्टीरिओफोनिक सराउंड साऊंडचं कौतुक नाही.