सखे ..........
सखे ,
खर सांगू , आता न खूप हलके वाटतेय! खर तू परत आलीस, यावर विश्वास बसतच नव्हता. का कुणास ठाऊक, तुझ्यात ती पूर्वीची तू दिसत नव्हतीस, आणि ते तू कबुल हि केलेस. एरव्ही माझ्या एका शब्दाला तुझे १० शब्द असायचे पण आज ? चक्क तू ? तूच होतीस ती ? कदाचित माझ्या जागी तू जरी असतीस तरी विश्वास ठेवला नसतास यावर. शांतपणे म्हणालीस तू ‘’ .... मी आता तिला ( माझ्या त्या पूर्वीच्या ) ..... मारून टाकलेय.
आतापर्यंत हळवी, मनमिळाऊ. भावनाप्रधान, पाहिलीस तू मला, पण आज मी त्या माझ्या रुपाला तिलांजली दिलीय .......किती धक्कादायक सुखद धक्का होता तो? तुझा विश्वास बसणार नाही पण मला तू अशीच हवी होतिस.
मिसळपाव
