Skip to main content

इन्शुरन्स कंपन्यांची फसवेगिरी

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 30/11/2022 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
पॉलिसी च्या नावाखाली इन्शुरन्स कंपन्या सामान्य माणसाची कशी मनमानी लूट करत आहेत, याचा नुकताच अनुभव आला. २००९ मध्ये मी पीएनबी मेटलाईफ कंपनीकडून एक युनिट लिंक्ड लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली. वर्षाला एक लाख हप्ता आणि पुढची ५६ वर्षे १५ लाखाचे जीवनविमा कव्हर. पहिले ३ हप्ते कंपल्सरी नंतर ऑप्शनल. मी पॉलिसी घेतली आणि दोनच वर्षांनी सदर पॉलिसी नवीन ग्राहकांसाठी बंद करण्यात आली. पॉलिसी च्या नियमाप्रमाणे मी ५ वर्षांनंतर म्हणजे २०१५ मध्ये ₹ ७५०००/- पार्शल विथड्रॉवल घेतले. त्यावेळी पॉलिसी फंड व्हॅल्यू ₹ ३२५०००/- शिल्लक असल्याचे मला सांगण्यात आले.

एक झलक तुझी पाहता...

लेखक Deepak Pawar यांनी मंगळवार, 29/11/2022 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
एक झलक तुझी पाहता आयुष्य उधळून जाते चैत्रातच झरती मेघ शिशिरात बहरून येते. रूप तुझे पाहुनी बघ सूर्याचे दिपती नयन चाहूल तुझी लागता वाऱ्याचे थबकती चरण तू नुसती पाहून हसता रात्र उजळून निघते. रातीस तुला पाहण्या हा चंद्र नभात तरसे अंगास चुंबून घेण्या मेघ ही अवचित बरसे उन्हं कोवळे तू दिसता बाहूत लपेटून घेते. पाण्यास लावता हात पाण्यास लागे आग पाहून तुला वैरागी भगव्याचा करती त्याग डोळ्यांचे गहिरेपण मजनूस डुबवून देते.
काव्यरस

उदयपूर,हल्दीघाटी,कुंभलगड व चितौडगड भटकंती पूर्वतयारी

लेखक श्वेता२४ यांनी मंगळवार, 29/11/2022 18:10 या दिवशी प्रकाशित केले.

     गेल्या वर्षापासून माझा उदयपूरला जाण्याचा प्लान चालू होता. शेवटी 2022 च्या दिवाळीच्या सुट्टीच्या आधी उदयपूरला जायचं नक्की झालं. बजेट ट्रीप नियोजन करायचे होते. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त स्थलदर्शन करता यावं हा मुख्य उद्देश होता. त्यामुळे कंजूस सरांचे मार्गदर्शन घेतलं. त्यांनी तत्परतेनं अतीशय उपयुक्त माहिती दिली. त्यांच्या सल्याप्रमाणे माऊंट अबू या सहलीत समाविष्ट न करता माझ्या सहलीच्या नियोजनात काही बदलही केले. या सहलीचे नियोजन करताना ट्रिप ॲडव्हायझर आणि इतरही चॅनल वाल्यांचे व्लॉग कामी आले.आम्ही ट्रेनने जायचे ठरवले.

एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - ६ (शेवटचा)

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 29/11/2022 05:26 या दिवशी प्रकाशित केले.
image host इव्हॅन तुर्गेनेव्ह (९ नोव्हेंबर १८१८ ते ३ सप्टेंबर १८८३) Turgenev: The Novelist's Novelist एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - ६ मार्च ३०. बर्फ. .... हंऽऽ मी काय सांगत होतो, मी त्याच्या अभ्यासिकेत प्रवेश केला. स्वतःचे कपडे सावरत तो धडपडत उठला आणि घाईघाईने त्याने पुढे येऊन हात पुढे केला. अरे देवा! त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर कुठले भाव होते हे माझे मलाच पाहता आले असते तर किती मजा आली असती.

द ब्यूटिफुल गेम

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी सोमवार, 28/11/2022 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्रमंथन - पाश्चिमात्य व्हर्जन खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट बरं का! हे यूरोपियन्स, आफ्रिकन्स आणि दक्षिण अमेरिकन लोकं होते ना - त्यांनी आपली पुराणं वाचली आणि त्यांना किडा आला समुद्रमंथन करण्याचा. म्हणाले आपण अ‍ॅटलान्टिक महासागर ढवळून काढू. झालं! लोकं लागली कामाला. अँडीज कि आल्प्सचा एक पर्वत घेतला, अ‍ॅझटेकांच्या केत्झालकोआत देवाची रस्सी केली आणि लागले की समुद्र घुसळायला. आता पाश्चिमात्यच समुद्र तो! त्यातून पहिली आली ती हिरे माणकं नेली आफ्रिकन्सनी. मग आली वाईन - ती फ्रेंच लोकं घेऊन गेली. मग आलं सांंबा नृत्य - ते नेलं ब्राझिलियन्सनी.

सिद्धेश्वर,लक्ष्मीनारायण मंदिर -मांडवगण

लेखक Bhakti यांनी सोमवार, 28/11/2022 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात मांडवगण हे नदीच्या प्रवाहात वेढलेले गाव आहे.मांडव्य ऋषींची तपोभूमी आणि समाधी स्थान असल्याने गावाचे नाव मांडवगण आहे. गाव सिद्धेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध मंदिरात प्रवेशद्वारातून आत येताच जुने प्रचंड मोठे वड-कडूनिंबाचे वृक्ष ही तपोभूमी असल्याची ग्वाही देतात.

खंडाळ्याच्या घाटासाठी...

लेखक पराग१२२६३ यांनी सोमवार, 28/11/2022 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
Rajmachi point यावेळी प्रत्यक्ष खंडाळ्याच्या घाटामध्ये वेळ काढायचा असं ठरवलं होतं. अचानक निघालो आणि पटकन शिवाजीनगर गाठलं. खंडाळ्यापर्यंत जायचं असल्यामुळं सकाळच्या शेवटच्या लोकलशिवाय पर्याय नव्हता. सध्या लवकर अंधार होत असल्यामुळं दुपारची लोकल पकडून खंडाळ्याला पोहोचणं सोयीचं वाटत नव्हतं.

गोळ्या आणि गांधी

लेखक बाजीगर यांनी सोमवार, 28/11/2022 03:59 या दिवशी प्रकाशित केले.
विषय : सोलापूर ला विमानसेवा कधी येणार पिस्तूल दाखवणाऱ्या धर्मराज कडादींना ललित गांधी यांचे आव्हान, https://maharashtratimes.com/maharashtra/solapur/maharashtra-chamber-of… केतन शहा सोलापूर मंच कधी जाईल विमान उंच? काय आले त्यांचे मनी हे म्हणे पाडा चिमणी संचालक धर्मराज कडादी म्हणाले,किसने बात बढादी रिव्हाल्वर दाखवून,घालीन गोळ्या घडकीभरली,कोण वाजवील टाळ्

Fifa World Cup: ५ मुलांची आई मेस्सीची चाहती, केरळहून कार घेऊन एकटीच पोहोचली कतारला,

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 26/11/2022 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
Fifa World Cup: ५ मुलांची आई मेस्सीची चाहती, केरळहून कार घेऊन एकटीच पोहोचली कतारला, कारमध्ये स्वयंपाकघर https://www.thehindu.com/life-and-style/fifa-world-cup-qatar-2022-najir… नाजी नौशी खूपच हौशी काढली कार गेली ती कतार पाच मुलांची आई मेस्सीला बघण्याची घाई. असेल चँम्पीयन मेस्सी कोई नही नाजी जैस्सी अर्जेंटिना ची फॅन अशक्य? शी कॅन !

मला (न) जमलेली पाककला (पोळ्या)

लेखक मालविका यांनी गुरुवार, 24/11/2022 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
पाककला नावातच कला आहे. ते कौशल्य आहे. ज्याला साधलं त्याला साधल. अन्नपूर्णा देवी ज्याला प्रसन्न झाली त्यांना सलाम. माझ्यावर देवीने प्रसन्न व्हायला जरा वेळ घेतला. म्हणजे अजूनही मी निष्ठेने तिची सेवा करीत नाहीच त्यामुळेच असेल, अजून पूर्ण प्रसन्न नाही झाली. पण निदान माझे स्वतःचे खायचे वांदे होत नाहीत एवढे तिचे आशीर्वाद मात्र लाभले नक्की. मुळात स्वयंपाकघरात रमणारी मी अजिबात नाही. त्यापेक्षा बाई ठेवून सगळं आयत खायला मिळालं तरी आवडेल मला. स्वयंपाक करण्यापेक्षा मी ढीगभर पुस्तक वाचून काढेन किंवा शेकडो किमी सायकल चालवेन. ते सोपं.