Skip to main content

विचीत्र आणि दु:खद वर्तन

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 14/01/2014 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
ठाण्यात प्लेग्रूप (बालगट) शाळेच्या बसची एका कुत्र्यास धडक बसली म्हणे. त्या नंतर कुत्र्यास धडक बसल्याने संतप्त झालेल्या युवकांनी म्हणे शाळेच्या बसची मोडतोड केली म्हणे. प्रत्येक वृत्तपत्रा गणिक वृत्तात जरासा फरक आहे.एका वृत्तात बस रिकामी नुसती थांबलेली असताना मोडतोड झाल्याचे म्ह्टले आहे तर एका वृत्तात मुलांना खाली उतरवून बसची मोडतोड केल्याचे म्हटले आहे. दुर्दैवाने कुत्र्याचे मालक अबकड राजकीय पक्षाचे आहेत आणि स्कुलच्या मुख्याध्यापिका हळक्षज्ञ विरोधी राजकीय पक्षाच्या आहेत असे काही वृत्तात म्हटले आहे. झाल्या गोष्टीचा राजकीय संबंध असावयास नको.

चारोळी: तीळ अन् गुळाची नाती !!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 14/01/2014 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
विचारांची जुळणी गुळाची असावी.. शब्दांत पेरणी साखरेची असावी.. विचार अन् वाणी यांची मैत्री अतूट राहावी.. तीळ अन् गुळाची नाती प्रेरणा देत राहावी.. संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा....॥
काव्यरस

लहसूनी दाल / लसणीचं वरण

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 13/01/2014 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः छोटी १/२ वाटी तूरीची डाळ छोटी १/२ वाटी मुगाची डाळ ५-६ लसूण पाकळया (जरा जास्तं घेतले तरी चालेल, इथे पाकळ्या मोठ्या असतात) १/२ टीस्पून मोहरी १/२ टीस्पून जीरे २-३ लाल सुक्या बोर मिरच्या (साध्या मिरच्या वापरल्या तरी चालतील) ३-४ कढीपत्ता पाव टीस्पून हिंग १/२ टीस्पून हळद १/२ टीस्पून लाल तिखट मीठ चवीनुसार बारीक चिरलेली कोथींबीर . पाकृ: तूरीची

विवेकसिंधु, मुकुंदराज, आणि राजा जैतपाळाचे तळे

लेखक माहितगार यांनी सोमवार, 13/01/2014 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
विवेकसिंधु हा कवी मुकुंदराज यांनी लिहिलेला ग्रंथ मराठी भाषेतील आद्य काव्यग्रंथ समजला जातो.विवेकसिंधु ग्रंथाबद्दलच्या मराठी विकिपीडियाव्रील लेख अद्ययावत करताना विवेकसिंधूचे लेखन अंबेजोगाई, आंभोरा, फलटण,पैकी नेमके कुठे झाले हि चर्चा सध्या पुढे आली आहे.

सैनिक

लेखक अमेय६३७७ यांनी सोमवार, 13/01/2014 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा संपल्यावरही केबिनमध्ये  दिवा जळता ठेवून  योजना आखत राहणारे मुख्याध्यापक  कलत्या दिवसावेळी दमून येऊनही 'पुस्तक हवे' म्हणल्यावर  उत्साहाने सायकल काढणारे बाबा  तापाने फणफणत असूनही  थंडीत चार वाजता उठून  अभ्यासाआधी चहा देणारी आई स्वत:ची दिवाळी मनाआड टाकून  माझ्यासारख्या अनेकांना  उत्सवासाठी घरी नेणारा एसटीचालक महायुद्धाच्या पटावरचे लक्षावधी छोटे सैनिक  कदाचित असेच असतील नाही?…  जीव विझू आला तरीही  शेवटच्या श्वासापर्यंत….  मनापासून कर्तव्य बजावणारे !  -- अमेय

प्रात्यक्षिकः चित्रे माऊंट कशी करावीत

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 13/01/2014 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
कागदावर केलेले चित्र माऊंट कसे करावे, याचे प्रात्यक्षिक या लेखात बघा. साहित्यः कागदावरील चित्र, माऊंट बोर्ड, स्टीलची पट्टी, मोजण्याचा टेप वा स्केल, पेन्सिल, माऊंट कटर, जाडा पांढरा कागद, कटिंग मॅट (किंवा साधा पुठ्ठा), सेलोटेप वा अन्य चिकट टेप. . कृती: १. चित्र माऊट बोर्ड वर ठेऊन बघितले. बोर्ड एका बाजूने पांढरा, आणि दुसरी बाजू राखाडी असा आहे, यापैकी कोणताच रंग चित्राला उठाव देणारा वाटला नाही, त्यामुळे बोर्ड रंगवून घ्यायचे ठरवले.

ठाणे कट्टा -अचानक

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 13/01/2014 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता थोड्या वेळापुर्वी श्री जैक डेनियलचा व्यनि आला की मी आज आणि उद्या ठाण्यात आहे.आणि उद्या संध्याकाळी माझे परतीचे विमान आहे त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी उद्या दुपारी तीन वाजता ठाणे तलाव पाळीवर साइकृपा हॉटेल मध्ये जमण्याचे ठरत आहे.श्री मुक्त विहारी येत आहेत. सर्व मिपाकराना हार्दिक आमंत्रण आहे. हॉटेल श्री जैक डेनियल यांच्या सोयीने ठरविले आहे.

माणुसकी आणि भावना मरत चालल्याय का ?

लेखक वात्रट मेले यांनी सोमवार, 13/01/2014 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात सौ आणि लेकीला घेऊन फिरायला जाताना आमच्या कॉलोनी च्या कॉर्नर वरतीच गर्दी दिसली, मीही मनुष्य योनितला असल्यामुळे साहजिकच थांबलो, बघतो तर काय, एका आपे रिक्श्याने एका जुन्या एस्टीम ला धडक दिली होती आणि त्या चारचाकी मधले एक दक्षिण भारतीय जोडपे त्या रिक्श्यावाल्याबरोबर तावातावाने भांडत होते. तसे पहिले तर ते जोडपे हि वयस्कर होते आणि त्यांची परिस्तिथी पण चांगली होती. तो रिक्श्यावाला पण म्हातारा होता परंतु गरीब दिसत होता. बरीच मंडळी जमली होती. ती स्त्री पोलिसात तक्रार दाखल करण्याविषयी बोलत होती तर काही लोक मिटउन घेण्यास सांगत होते.

एक संवाद

लेखक शुचि यांनी सोमवार, 13/01/2014 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योतिषाचे वावडे असेल त्यांनी दूसरा धागा उघडावा ___________________________________________ "शुचि तुझी मजा आहे बाई नवीन नवीन पार्ट्या अन सोशल इव्हेंट्स नेहमी एन्जॉय करत असतेस. मला तुझा हेवा वाटतो बरेचदा" - कामिनी गेल्या काही महिन्यात तिसर्यांदा मला बोलली. "कामे हजारदा तुला सांगीतले आहे - कितीका उडले तरी मी खरी किंचित पटकन विशवास न टाकणारी अन संषयीच आहे. तुला माझं "मिथुन" लग्न तेवढं दिसतं अन वृश्चिक स्टॅलिअम मात्र तू सोइस्कर रीत्या विसरतेस." - मी चिडूनच बोलले. "शुचि तुझा प्रॉब्लेम काय आहे?

कस्टर्ड ड्रॅगन (Translated Poem)

लेखक शुचि यांनी रविवार, 12/01/2014 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
इवल्याशा खेड्यातील इवल्याशा घरात बेलिंडा रहात असे सुखात आनंदात तिच्याकडे होता एक उंदीर, मांजर, कुत्रा लहान लाल गाड़ी अन ड्रॅगन एक भित्रा . मांजराचे नाव तिने ठेवले होते इंक कार्ड़याशा उंदराला ती हाक मारे ब्लिंक पिवळा कुत्रा वागायला होता मोठा परखड़ त्याचे नाव मस्टर्ड अन ड्रेगनचे कस्टर्ड . कस्टर्ड दिसे भयंकर फार खूंखार अंगावरती खवले त्याची नखे धारदार मुख त्याचे आग ओके नाक धूर फेके त्याला पाहताच सर्वांची उड़े फेफे फेफे . बेलिंडाच्या शौर्याला नव्हता पारावार साहसी इंक-ब्लिंकही सिंहास पळवित पार मस्टर्ड होता शूर त्याची वाघास वाटे भीती कस्टर्डच्या मागे मात्र ब्रह्मराक्षस भीतीपोटी . बेलिंडा कस्ट
काव्यरस