ठाण्यात प्लेग्रूप (बालगट) शाळेच्या बसची एका कुत्र्यास धडक बसली म्हणे. त्या नंतर कुत्र्यास धडक बसल्याने संतप्त झालेल्या युवकांनी म्हणे शाळेच्या बसची मोडतोड केली म्हणे.
प्रत्येक वृत्तपत्रा गणिक वृत्तात जरासा फरक आहे.एका वृत्तात बस रिकामी नुसती थांबलेली असताना मोडतोड झाल्याचे म्ह्टले आहे तर एका वृत्तात मुलांना खाली उतरवून बसची मोडतोड केल्याचे म्हटले आहे. दुर्दैवाने कुत्र्याचे मालक अबकड राजकीय पक्षाचे आहेत आणि स्कुलच्या मुख्याध्यापिका हळक्षज्ञ विरोधी राजकीय पक्षाच्या आहेत असे काही वृत्तात म्हटले आहे. झाल्या गोष्टीचा राजकीय संबंध असावयास नको. रिकाम्या नुसत्या बसची तोडफोड पण चुकीचीच आणि पालकांमध्ये दहशत निर्माण करणारी ठरते.
कार्यकर्ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असोत घडल्या चुका कबुल करून कायद्दास समोर न जाता राजकिय आरोप प्रत्यारोप करणे योग्य नाही.अशा प्रसंगी संबंधीत पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना परस्पर राजकीय आरोपबाजी पासून आवरण्याची संवेदनशीलता दाखवावयास हवी.बरे हे तथाकथीत दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्या महिला आहेत. बातमी दारांनाही कुत्र्यावरून चालू असलेले राजकारण असे वृत्त देतात. शाळेतल्या मुलांच्या सुरक्षीततेचा विचार बातमीदारही करत नाहीत का काय असा प्रश्न पडतो.
एकुण संयमाचा अभाव असलेल्या विचीत्र वर्तना बद्दल दु:ख होते.
खाली वृत्ताचे दुवे आहे कोणते बरोबर कोणते नाही कल्पना नाही:
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/Dog-inju…
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/Again-ra…
http://www.loksatta.com/mumbai-news/after-school-bus-hits-thane-corpora…
http://www.ibnlokmat.tv/?p=110771
http://prahaar.in/mahamumbai/thane/174484
वाचने
4441
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
जावू द्या हो....
इंग्रजी वृत्तपत्रातील वृत्ते
त्याचे
आजकाल....नुसते " समर्थाघरचे श्वान" बघून चालत नाही...तर...
In reply to त्याचे by अनिरुद्ध प
सामान्य माणूस
In reply to आजकाल....नुसते " समर्थाघरचे श्वान" बघून चालत नाही...तर... by मुक्त विहारि
+ आणि +
In reply to सामान्य माणूस by माहितगार
मस्त चालू आहे !!
लिंका सवडीने पाहतो...
सहज आठवलं
गोवेकर मुळातच सभ्य (सं म खु
In reply to सहज आठवलं by पैसा
तोड्फोड संस्कृती ला न्युज