Skip to main content

अंतर्गत सीमावाद (भाग-२)

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 24/12/2022 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
ईशान्येकडील राज्यांमधील सीमावाद स्वातंत्र्यानंतर ईशान्येकडील आसाम, नागालँड, त्रिपुरा इत्यादी प्रदेशांचे भारतीय संघराज्यात विलिनीकरण झाले. मात्र त्यात आसाममध्ये अनेक भाषिक, वांशिक, धार्मिक गटांचा समावेश असल्यामुळं हे सर्वात मोठं आणि वैविध्यपूर्ण घटकराज्य बनलं होतं. कालांतरानं स्थनिक समुदायांची मागणी आणि भाषावार प्रांतरचनेचं सूत्र यांच्या आधारावर आसाममधून विविध घटकराज्यांची निर्मिती करण्यात आली. तसं होत असताना सर्व घटकराज्यांनी एकमेकांच्या प्रदेशावर आपापले दावे करण्यास सुरुवात केली.

हरंगुळचं "हरहुन्नरी" शिक्षणकेंद्र

लेखक मार्गी यांनी शनिवार, 24/12/2022 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
✪ हरंगुळच्या शिस्तबद्ध व अष्टावधानी जनकल्याण निवासी विद्यालयाला भेट ✪ विद्यार्थ्यांसाठी आकाश दर्शन व फन लर्न सत्र घेण्याचा अनुभव ✪ सत्रांमधला मुलांचा सहभाग आणि ऊर्जा! ✪ पहाटे चंद्र बघण्याचा मुलांचा अनुभव आणि त्यांना तो दाखवण्याचा माझा अनुभव! ✪ शिक्षकांचं काम किती कठीण असतं ह्याची झलक ✪ दिवसातून अडीच तास मैदानावर खेळणारे विद्यार्थी- दुर्मिळ दृश्य! ✪ सेरेब्रल पाल्सी व इतर बौद्धिक व शारीरिक दिव्यांगांसाठीच्या संवेदना प्रकल्पाला भेट सर्वांना नमस्कार. लातूरजवळच्या हरंगुळ इथे असलेल्या जनकल्याण निवासी विद्यालयामध्ये तीन दिवस राहण्याचा योग नुकताच आला. आदरणीय प्रकाशजी लातुरे व श्री.

(झाली किती रात सजणी...)

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 24/12/2022 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ कवी दिपक पवारांची क्षमा मागून.... (आली जरी रात सजणी...) आली जरी रात सजणी झाली किती रात सजणी, नावडे मजला "थांब जरा येते", सांगणे. अधिरला जीव माझा, असे कसे तुझे हे वागणे. खडबड, खडबड आवाजास, ताल देती तुझी काकणे. बरे वाटते का असे, सारखे सारखे वाकून माझे पाहणे.

बदामी २: बदामी किल्ला, मंडप, धान्यकोठारे आणि शिवालये

लेखक प्रचेतस यांनी शुक्रवार, 23/12/2022 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी खरं तर बदामी किल्ला, अगस्ती तलाव, त्याच्या काठावरील मंदिरं ही तिसर्‍या दिवशीची सफर. बदामीस पोहोचल्यावर पहिल्या दिवशी बदामी लेणी पाहून दुसरे दिवशी ऐहोळे आणि पट्टदकलची मंदिरे पाहून तिसरा दिवस थोडा आरामाचा जावा म्हणून त्या दिवशी फक्त बदामी किल्ला आणि त्याच्या आसपासचा परीसर आणि महाकूट मंदिर संकुल बघायचे ठेवले होते, मात्र ह्याच दिवशी हे सर्व बघूनही सिडलाफडी अनपेक्षितरित्या झाल्याने एक दमदार वाटचाल झाली होती.

संस्कार

लेखक ज्ञाना यांनी शुक्रवार, 23/12/2022 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कार म्हणजे काय? मूल संस्कारी आहे म्हणजे मोठ्यांचा आदर करणे, त्यांच्या वेळोवेळी पाया पडणे, चांगला अभ्यास व देवधर्म या सवयी तिला किंवा त्याला आहेत असं म्हणायचे. हल्लीच्या काळात हे निकष थोडे वेगळे आणी कालानुसार आधुनिक असतील पण गर्भितार्थ तोच. एखाद्या व्यसनाधीन वा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर वाईट संस्कार झाले आहेत असं मानलं जातं. खरं तर संस्कार हे दुसरे तिसरं काही नसून लहानपणी तुमच्या मन:पटलावर कोरल्या गेलेल्या आठवणी असतात.

व्यसन

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 21/12/2022 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
व्यसन माझ्याकडे एक ४८ वर्षाच्या बाई आल्या होत्या. त्यांचा डावा हात दुखत होता. त्यासाठी त्यांच्या डॉक्टरांनी त्यांच्या डाव्या खांद्याची सोनोग्राफी करायला सांगितली होती. सोनोग्राफी करण्याच्या अगोदर त्यांच्या आजाराची माहिती असावी म्हणून आणि मध्यम वयीन, डावा हात दुखतो आहे म्हणून मी त्यांना विचारले कि त्यांच्या हृदयाची तपासणी झाली आहे का? त्यावर त्यांनी आपली फाईल दाखवली.

अंतर्गत सीमावाद (भाग-1)

लेखक पराग१२२६३ यांनी मंगळवार, 20/12/2022 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच महाराष्ट्रातील विविध सीमावर्ती भागांमधील गावांनी आपल्याला शेजारच्या राज्यांमध्ये समाविष्ट व्हायचे आहे, असं म्हटलं आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. स्वातंत्र्यानंतर भाषा-आधारित घटकराज्यांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळं काही घटकराज्यांमध्ये वांशिक, धार्मिक, भाषिक असे वैविध्य मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. पुढील काळात विविध कारणांनी देशातील प्रत्येक समुदायाकडून आपल्यासाठी स्वतंत्र घटकराज्याची मागणी लावून धरली जात आहे. त्यामुळं भाषेच्या आधारावर घटकराज्यांची निर्मिती करण्याचे तत्व मागे पडले आहे.

व्यासपर्व (ऐसी अक्षरे मेळवीन-७)

लेखक Bhakti यांनी सोमवार, 19/12/2022 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
व्यासपर्व –लेखिका दुर्गा भागवत A काही पुस्तकं मनमुराद अनुभवण्यासाठी मनाचं क्षितीज विस्तारलेलं पाहिजे. व्यासपर्व मनाचं कवाड विस्तारल्यावर हातात पडलं. धर्मग्रंथाला कलाकृती म्हणून अनुभवताना वीण घट्ट झालीये. मराठी साहित्यातील व्रतस्थ दुर्गा भागवत यांनी केवळ ११० पानांमध्ये महाभारताचे व्यासांच्या मांडणीनुसार केलेले विश्लेषण शब्द सौंदर्याने सुशोभित आहे. महाभारत-गीता ही ज्ञान, कर्म, भक्ती यांची वात तेजोमय करतात. तेही जगासाठी, केवळ भारतापुरते नाही.

आली जरी रात सजणी...

लेखक Deepak Pawar यांनी सोमवार, 19/12/2022 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
आली जरी रात सजणी पण नभी हे चांदणे तुझिया मनातील गुज मज सांगती तव कंकणे. हा गार वारा बिलगता झाकता तू लोचने हे मेघ ही बरसले तव पाहता ते लाजणे. का डोलती या लता? ही वाट झाली धुंद का? तू चालता छेडताती सुर तुझी ती पैंजणे. डोळ्यात डोळे मिसळुनी तू मला गे पाहता नाही जरी बोललो हृदयात या झंकारणे. रेंगाळतो दीस माझा रूसुनी बसताच तू तेव्हा मला आवडे ना ते तुझे गे वागणे. . . दीपक पवार.
काव्यरस