विपश्यना साधकवीर परतले
विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ५
विपश्यना साधकवीर परतले
दुपारची वेळ. ‘मी गाडीत आहे. साधारण 4ला घरी पोहोचेन’ म्हणून पत्नीच्या सेल फोनवर साहेबांचा निरोप आला आणि घरच्यांची लगबग सुरु झाली. गेले 12 दिवस घरी मरगळून पडलेला सेल फोन आता मालक कामाला लावणार असे वाटून चार्जिंगला चढला. कारण ही तसे जबरदस्त होते. बरेच दिवस गाजत असलेले विपश्यना केंद्राचे काम पेंडिंग होते, ते करून साहेब परतणार होते. मुले मुद्दाम सुट्टी काढून घरी वाट पहायला आली होती. मुलगी ‘डॅड कसा दिसतोय? हाडकला कि काय?
मिसळपाव