Skip to main content

दमलेल्या तुमची आमची कहाणी

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 29/06/2014 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
परवा मला माझा एक जुना मित्र भेटला. तो परदेशात राहातो, सध्या इथे भारतात आला होता. गेली अनेक वष्रे तो परदेशात होता, त्यामुळे अर्थातच तिथल्या अनेक गोष्टी त्याला सांगायच्या होत्या आणि मला त्या ऐकायच्या होत्या. असाच गप्पांचा विषय नोकरी आणि तिथली माणसं, तिथलं वातावरण, संस्कृती, या बाबींकडे वळला. साधारणपणे आपलं हेच मत असतं की, तिथे म्हणजे परदेशात आरामाचं आयुष्य असतं, वेळच्या वेळी घरी येता येतं, शनिवार-रविवार फिरायला जाता येतं, भरपूर वेळ मिळतो, इत्यादी.

<पोरगीपटावशास्त्र - लग्न तरुणी, भावखाऊ तरुणी आणि इतर षोडशवर्ष तरुणी >

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 29/06/2014 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
महत्वाची सुचना: पोरगीपटाव शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा.... चर्चेचा विषयच मुळात पोरगीपटाव शास्त्राशी संबंधीत आहे. त्यामुळे येथे "पोरगीपटाव शास्त्र खरे की खोटे" किंवा "पोरगीपटाव शास्त्राचा उपयोग होतो की नाही" यावर चर्चा अपेक्षित नाही. तेव्हा खबरदार जर कोणी याविरुद्ध बोलाल तर. मिपाला कुठच्याच विषयाचं वावडं नाही हे ध्यानात ठेवा!!

मिपा सहल पळसदरी

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 29/06/2014 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
काल दिनांक २८ जून २०१४ रोजी उत्साही मिपाकर पळसदरी येथे वर्षा सहलीसाठी गेलो. पण वर्षा नसल्याने तिला नुसती सहल म्हणत आहोत हि नोंद घ्यावी. अर्थात मूळ कल्पना मुवि यांची होती आणि त्यानी सौदी मधुन व्यनि करून आमच्यासारख्या आळशी लोकांना जागे केले. ७. ४२ ला डोंबिवली ला येणारी कर्जत गाडीच्या कल्याण डब्यात ठरले.

उमड घुमड ...

लेखक मैत्र यांनी शनिवार, 28/06/2014 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारपासून उकाडा जास्तच जाणवत होता. कुठे जावं तर रस्त्यावरची गर्दी नकोशी वाटत होती. गाडी चालवण्यासाठी किंवा वाट काढण्यासाठी होणारी चिडचिड लक्षात घेता तो बेत रहित केला. उगाच काहीतरी किरकोळ उद्योग करत घरीच बसून राहिलो. घरात कोंदट वाटत होतं म्हणून अनेक दिवसांनी बाल्कनीत जाऊन बसलो थोडी मोकळी हवा मिळावी अशा विचाराने. फोनचा चाळा होताच वेळ घालवण्यासाठी. थोड्या वेळाने काहीतरी फरक जाणवला की हवा बदलते आहे. वारा सुटला आहे. आजूबाजूची मोठी झाडं सळसळत होती. छोटी झुड्पं वार्‍याच्या वेगाने थडथडत होती... आभाळ भरून आलं होतं.. एखाद्या उत्तम जलरंग चित्रासारखे ग्रे ढग पसरले होते.

नवा भिडू..

लेखक निखळानंद यांनी शनिवार, 28/06/2014 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांनी वसवलेला हा नेटका गाव.. घेतो आम्हा नेटसरुंच्या मनाचा ठाव.. इथे कोणासही नाही पावभाजी ची हाव.. सगळे मारतात फक्त मिसळीवरच ताव.. इथे सगळ्यांमधे दिसतोय आपुलकीचाच भाव.. नाही दिसत कुठे आत्मप्रौढीचा प्रभाव.. मझ्यासारख्या नवख्याला सांभाळून घ्या राव.. चुकलो माकलो तर घालू नका घाव.. मला बघायला आवडतील तुमचे हाव-भाव.. मला आपले म्हणा.. निखळानंद माझे नाव ! - मी इथे नवीन सभासद आहे. इथल्या कोणाशीही मझी ओळख नाही. इथल्या मोजक्याच गोष्टी वाचल्यायत. पण पहाताक्षणी प्रेमात पडतात तसे मी लगेचच इथला सभासद होण्याकडे ओढला गेलोय ! आशा आहे इथला प्रवास रम्यच होइल...
काव्यरस

वातव्याधी सामान्य आहार :-

लेखक बाबा पाटील यांनी शनिवार, 28/06/2014 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
वातव्याधी सामान्य आहार १)सकाळी ज्वारीची भाकरी किंवा गव्हाचा फुलका. २),दोडका ,कारले,घोसाळे,पडवळ,लाल माठ,भोपळा,पालक,शिमला मिर्च,कोहळा, काटेमाठ, राजगिरा,भेंडी,तांदुळचा.फ्लावर,कोबी,कोवळे वांगे फक्त ३)मुगाची डाळ,मुग तांदळाची खिचडी, ४)सफरचंद,मोसंबी,शहाळे,डाळिंब,अंजिर,बीट,सॅलड चालेल ५)गाइचे दुध,तुप, ताक दररोज घ्यावे. ६)उपिठ,शिरा भाजणीचे थालीपिठ,भरपुर साजुक तुप टाकुन ७)हुलग्याचे माडगे दररोज घ्यावे. ८)रात्री बाजरीची भाकरी खावी,त्यात १/४ च.स

फुटबॉल विश्वचषक :२०१४ (उपउपांत्य ते अंतिम सामना)

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 28/06/2014 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, फुटबॉल फिवरने आता चांगलाच जोर धरलाय हौसे नवशे सर्वच आता फुटबॉलची चर्चा करु लागले आहेत. आपणही मिपावर पहिल्या फेरीतील सामन्यांचा आनंद घेतला आहे. आता बाद फेरीतील सामने सुरु होत आहेत जो जिंकेल तो पुढे जाईल. पहिल्या फेरीत भले भले बाहेर पडले. पोर्तुगाल, स्पेन,इटली,इंलंड,यांनी चांगला खेळ करुनही ते बाहेर पडलेत. पोर्तुगाल केवळ एकट्या रोनोल्डोच्या भरवशावर राहीले आणि सरासरी आवश्यक असतांनाही घानाचा पराभव करुनही परतीच्या मार्गावर लागावं लागलं. बाकीच्या खेळाडुंनी चांगला खेळ करायला पाहिजे होता.

इमारत..

लेखक vaibhav deshmukh यांनी शनिवार, 28/06/2014 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
इमारत.. मी टकमक पाहतो त्या उच्चभ्रु अलिशान इमारतीकडॆ जीला गर्व जाणवतो स्वत:च्या उच्च्भ्रु अस्मितेचा आणि तिच्या प्रस्थापित संस्कॄतीचा म्हणुनच; ती हसते माझ्य़ा खुज्या अस्तित्वाकडॆ बघुन.. रंगबेरंगी प्रकाशात ती सजते पिवळ्य़ा कांतीची नववधु भासते आता तीलाही जाणवते स्वत:मधील एक हुकमी अस्तित्व मग; ती स्वत:च्या साहेबांचे अनुकरण करते आणि काही फ़ुटाच्या अंतरावर असलेल्या माझ्य़ाकडॆ व माझ्य़ासारख्या असंख्य लहान खुराड्य़ांकडॆ बघुन ती स्वत:ताला पुन्हा एकदा प्रस्थापित करते....! वैभव देशमुख २३८
काव्यरस

महाभारताची वेगळी कथा...

लेखक माधुरी विनायक यांनी शुक्रवार, 27/06/2014 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज थोडं वेगळं लिहू का... माझं वाचन नियमीत सुरू असतं. मुख्यत्वे मराठी आणि बऱ्यापैकी इंग्रजी. शिवा ट्रायॉलॉजी वाचल्यानंतर पौराणीक साहित्य वाचायला आवडू लागलं. पुराणातल्या माहिती नसलेल्या अनेक गोष्टी जाणून घ्यायची ओढ लागली आणि हाती लागेल तसं बरंच काही वाचत गेले. अशीच एक कथा. फार कमी लोकांना माहिती असावी, म्हणून इथे लिहावी, असं वाटलं. ही गोष्ट आहे कौरव-पांडवांची. पंडुच्या मृत्युनंतर पाच पांडवांना घेऊन कुंती हस्तिनापुरात परतलेली. वनात जन्मलेले, लहानाचे मोठे होणारे पाचही पांडव जरासे दांडगटच. युधिष्ठीर त्यातल्या त्यात शांत, सौम्य. साधारण तसेच नकुल-सहदेव.