Skip to main content

पढत मुर्ख व मुर्खाची लक्षणे

लेखक आयुर्हित यांनी मंगळवार, 01/07/2014 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
एका पढत मूर्खाची एक गोष्ट आहे. एक पढत मुर्ख एका गाढवावर बसला होता आणि गाढव पळत होता. त्याच त्याचं रस्त्यावरून तो बराच वेळ गोल गोल फिरत राहिला. तेव्हा कुणीतरी त्या सज्जन गृहस्थाला विचारले की,” मी बराच वेळ तुम्हाला इथेच फिरताना बघतो आहे. तुम्हाला नक्की कुठे जायचे आहे? तर तो म्हणतो, “मला माहित नाही. गाढवाला विचारा.” बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असेच होते. आपण समजून न घेताच काम करत रहातो, अनेक गोष्टी करत रहातो की याचा उद्देश काय आहे? असे करताना निसर्गाने जे उपलब्ध केले आहे त्याचा आनंदही उपभोगत नसतो.

नायगारा - एक सुंदर रंगीत धबधबा

लेखक अमित खोजे यांनी मंगळवार, 01/07/2014 04:49 या दिवशी प्रकाशित केले.
कोणीही न्यूयॉर्क ला आले कि त्यांची फिरण्याची ठिकाणे तशी ठरलेली असतात. न्यूयॉर्क शहरामधली ठिकाणे, उत्तरेला बॉस्टन, नायगारा धबधबा, थाउजंड आयलंड, तर दक्षिणेला फिलाडेल्फिया, वॉशिंगटन डी सी इत्यादी. त्यातल्या नायगारा ला मात्र माझे बर्याच वेळेला जाणे झाले. अगदी मोजायचे झाले तर ११ वेळा. मला स्वतःला फिरायची भारी आवड. ज्या नवीन ठिकाणी जाईन तेथिल आजूबाजूची ठिकाणे मी आवर्जून पाहायला जातो. शिक्षण आणि नोकरी निमित्ताने बर्यापैकी फिरणे झालंय. पण अजून काही हा छंद पुरा झालेला नाही. आता न्यू यॉर्क मध्ये तशी बरीच मंडळी येउन फिरून गेली असणार.

आडवाटेवरील रियासी

लेखक चलत मुसाफिर यांनी मंगळवार, 01/07/2014 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
रियासी हे नाव ऐकून कदाचित डोक्यात प्रकाश पडणार नाही. ते साहजिक आहे, कारण जम्मू-काश्मीरमध्ये असूनही रियासी हे ना तीर्थक्षेत्र आहे ना हिलस्टेशन. किंबहुना, कटरा (वैष्णोमाता मंदिर) हा अतिप्रसिद्ध शेजारी लाभल्यामुळे रियासीचे नाव अधिकच विसरले जाते. पण तरीही एकदा जाऊन पहावी (अगदी दोन दिवस राहून) अशी जागा आहे. Reasi 1 शिव खोरीच्या रस्त्यावर लागणारे रियासी गाव चिनाब नदीच्या तीरावर वसलेले आहे. पीरपंजाल पर्वतरांगा इथे सपाट मैदानाला येऊन मिळतात. त्यमुळे नदीचा प्रवाह सुसाट असतो.

चिकन सुवालाकी

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 30/06/2014 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या ग्रीसवारी करुन आल्यामुळे आणि तिकडचे खाद्य पदार्थ आवडल्यामुळे ते घरी बनवून बघीतल्याशिवाय राहवेना ;) ग्रीक चिकन सुवालाकी म्हणजे ग्रीक पिटा ब्रेडमध्ये स्क्युअरवर ग्रील केलेले मीट / मांसाचे तुकडे, सॅलॅड्स, सॉस घालून रोल सर्व्ह करतात. ग्रीक पिटा ब्रेड अतिशय छान, मऊ असतो. त्याचा वापर सुवालाकी, यीरोस, फलाफल मध्ये करतात. हुम्मुस, त्झात्झिकी बरोबर ही खाल्ला जातो.

शॉपिंग

लेखक वाचनपिपासु यांनी सोमवार, 30/06/2014 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारची दुपार मस्त ताणून द्याईचा प्लान होता ,तितक्यात कानात काहीतरी कुजबुज होते थोडा समान आणैईचा होता मार्केट मधून .....!! अलॉखे ,पिलॉखे घेत का - कु करत हो म्हणत तयार झालो . थोड्या फार अनुभवा वरुन एक गोष्टा शिकलो , ती मणजे बाहेर कोणतेही आणि कितीही समान आणैचे असल्यास , एक लिस्ट करून घ्यावी सामानाची . लिस्ट करण्याचे 2 फ़ाइदे , एक तर तुमाला स्मरण शक्तीचे खेळ खेलाईची गरझ नाही , आणि दुसर आणि महत्वाचा ,उद्या जौन तुमच्या वर आरोप होऊ शकतो की ही गोष्टा सांगितली होती आणि ती नई आणली , ही लिस्ट प्रूफ म्हणुन दाखवू शकता. आणि जमले तर रिजिस्टर्ड पोस्ट प्रमाणे घरी आल्या वर त्या वर सगळे समान आले अशी साही न शिक

ड्रेस्डेन - प्राग - ३

लेखक मधुरा देशपांडे यांनी सोमवार, 30/06/2014 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
ड्रेस्डेन - प्राग - १ ड्रेस्डेन - प्राग - २ सकाळी उठून पुन्हा ड्रेस्डेन च्या मुख्य स्थानकावर नाश्ता करून पुढे निघालो. फ्राउएनकिर्श (Frauenkirche) म्हणजेच येथील प्रमुख चर्च. जर्मन भाषेत फ़्राउ म्हणजे स्त्री. इंग्रजीत चर्च ऑफ अव्हर लेडी म्हणजेच मदर मेरी चे चर्च. ड्रेस्डेन मधील इतर इमारतींप्रमाणेच या चर्चला महायुद्धाचे परिणाम भोगावे लागले.

आपण सारे विक्रम (कथा: पृथ्वीचा अंत)

लेखक पगला गजोधर यांनी सोमवार, 30/06/2014 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
१५ ऑगस्ट २९४७ रोजी, वेताळाच्या बेताल बोलण्याकडे दुर्लक्ष करीत राजा विक्रमादित्य भराभरा टायटन ग्रहाकडे चालू लागला. वेताळाने राजाला एक गोष्ट सांगायला सुरुवात केली.. पृथ्वीचा अंत १६ मार्च २२८० साली झाला. अनेक वर्षे पृथ्वीवरील खगोलशास्त्रज्ञ एका महाप्रचंड उल्केवर नजर ठेवून होते आणि ३ मैल व्यास असलेली (१९५०-डीए असे नामकरण केलेली) ही उल्का वरील दिवशी पृथ्वीवर ताशी ३८ हजार मैलांच्या वेगाने आदळेल असा अंदाज होता. १९५०-डीए ही उल्का प्रथम २३ फेब्रवारी २२४७ रोजीपासून सतत दिसली.

भारताला वाघा सीमारेषेवरील प्रात्यक्षिकाची खरंच गरज आहे काय?

लेखक प्रमोद देर्देकर यांनी सोमवार, 30/06/2014 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या मे महिन्याच्या सुट्टीत मी उत्तरभारतात सहली निमित्त जावुन आलो. त्या सहली मध्ये एक ठिकाण हे "वाघा सीमारेषा (बॉर्डर)" होते . रोज संध्याकाळी सीमारेषेजवळ हा फक्त ६.०० ते ६.३० असा अर्ध्या तासाचा ध्वज संचालनाचा कार्यक्रम होतो. त्यासाठी अमृतसर येथुन २८ कि.मी. अंतर पार करुन सर्व पर्यटक खाजगी अथवा सार्वजनिक वाहन पकडुन दु. ३.०० वाजल्या पासुनच मुख्य कार्यक्रम स्थळाच्या सुमारे २.३० कि.मी. अलिकडे असलेल्या पहिल्या सुरक्षाकड्यापाशी रांग लावतात. आम्हालाही आमच्या संयोजकाने हा कार्यक्रम बघण्यासाठी दुपारी ४.३० ला तिथे नेले.

शायरी - भाग २

लेखक चिनार यांनी सोमवार, 30/06/2014 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
मेरी जिंदगी मे तेरा वजूद कुछ ऐसा है, , के तू नही तो मेरा कोई वजूद नही ! तुझे पाने के ख्वाईश कुछ ऐसी है, , के तू नही तो कोई और ख्वाईश नही ! ! यू तो अकेला ही चला था मै एक राह पर , , हां ! ,तेरे मिलने से राहत मिली अब तेरे ना होने का गम तो नही, , पर सामने देखता हू तो कोई मंजिल भी नही ! ! एक और दिन बीत गया तेरे खयाल मे , एक और शाम ढल गयी तेरी याद मे , अब इस रात से डरता हू , कही ये भी ना गुजर जाये तेरे इन्तेजार मे ! ! एक दिन ,एक शाम, एक रात तो बीत जायेगी , कही सांस न रुक जाये तेरे इन्तेजार मे ! !
काव्यरस

पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगती अकबर बीरबल कहाणी

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 30/06/2014 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
पंतप्रधान कार्यालयात मी ज्या केबिन मध्ये बसतो ती एका मोठ्या हाल मध्ये आहे. मधोमध दरवाजा आणि दोन्ही बाजूला साडेतीन फूट उन्च पार्टिशन असलेल्या सहा केबिन्स आहेत. त्यात सहा अधिकाऱ्यांचे निजी सचिव व अन्य कर्मचारी मिळून जवळपास २४-२५ स्टाफ बसतो. दरवाजा उघडल्या बरोबर समोर मी जिथे बसतो ती केबिन दिसते. हालचा दरवाजा उघडा असेल तर माझ्या समोरच्या केबिनचा काही भाग दरवाजाच्या मागे झाकला जातो, तिथे एक ३ फुट उंचीची अलमारी आहे. सहजासहजी कुणाला दिसत नसल्यामुळे, तिथला स्टाफ त्यांचे रिकामे चहाचे कप इत्यादी त्या अलमारीवर ठेवतो.