Skip to main content

किस्सा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 16/08/2014 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
एक वाचलेला किस्सा सादर करीत आहे.. इंदोर मध्ये एक धनी मराठी परिवार रहात होता..पिढीजात श्रीमंती व त्या बरोबर परिवार रसिक पण होता व श्रद्धाळू पण.. कोजागरी च्या रात्री त्यांचा कडे रात्र जागवण्याचा मोठा कार्यक्रम असे. नामवंत गायक कलाकार हजेरी लावत असत. व नंतर केशरी दूध सर्व उपस्थितांना दिले जाई व कार्यक्रमाची सांगता होत असे... एका वर्षी असाच कार्यक्रम झाला ..पाहुणे गेल्यानंतर यजमान व यजमान बाई आवराअवर करत होते.. त्यांचे केशरी दूध घ्यायचे राहिले होते..

मेरा नाम करेगा रोशन .....

लेखक मार्मिक गोडसे यांनी शनिवार, 16/08/2014 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेतील दिवस म्हणजे गोल्डन मेमरीज असतात.शाळेतील प्रत्येक दिवस म्हणजे एक मजाच असायची.शाळेत मस्ती आणि खोड्या काढणे यासाठीच जवळ जवळ सर्व मुल येत असतात कारण शिकण्यासाठी क्लास लावलेला असतोच.पण खोड्या काढण्याची मजा काही वेगळीच असते. आमच्या शाळेत मजा म्हणून प्रत्येक मुलाला त्याच्या वडिलांच्या म्हणजेच बापाच्या नावाने हाका मारायचे.जर कोणाचे वडील रिक्षा चालवणारे असतील तर त्याला रिक्षा म्हणून हाका मारायचे आणि जोर जोरात हसायचे.जे मुल हसायचे अशा मुलांमध्येच एका मुलाच्या वडिलांचे नाव तानाजी होते.त्या मुलाचे नाव काय होते हे आठवत नाही कारण त्याला सर्व जन “ताना” म्हणायचे.ताना हा मस्ती करण्यात एक नंबर होता.जे

फेसबुक आणि संवादक्षम मराठी संकेतस्थळे प्रेरणा साम्य आणि फरक कोणते ?

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 15/08/2014 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
आदूबाळ यांचा मिपावर मंत्रचळाच्या मागोव्यावर (http://www.misalpav.com/node/28407) असा एक विश्लेषणात्मक आणि चर्चा रंगलेला लेख बर्‍याच जणांनी वाचला असेलच. त्यापुढे जाऊन काही अधिक माहिती चर्चा करून हवी आहे. १) संवादक्षम मराठी संकेतस्थळांच्या विवीध धागाचर्चात सहभागी होणार्‍या मंडळींचे मुख्य एरीआ ऑफ इंटरेस्ट/सब्जेक्ट्स कोणते असतात, सहभागाच्या मागच्या मुख्य प्रेरणा कोणत्या असतात इत्यादी प्रकारचे अधीक खोलवर खीस पाडून विश्लेषण आणि अभ्यास उपलब्ध करून हवा आहे.

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 15/08/2014 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
(दिल्लीत श्री दत्त विनायक मंदिरात दरवर्षी दास नवमीच्या निमित्ताने समर्थांचे विचार आणि शिकवण लोकांपर्यंत पोहचविण्या साठी कार्यक्रम होतात. या वर्षी मनोबोधावर कार्यक्रम होता. श्रीरामाचा सर्वोत्तम दास कसा असतो या विषयावर आपल्या अल्प बुद्धीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे).

दोन अश्रू आणि एक सलाम..!

लेखक अजय जोशी यांनी शुक्रवार, 15/08/2014 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत ज्यांच्यावर भरभरून लिहिलं, त्यांना कधीच विसरलो आहोत... त्यांच्या नावानं जे पुढारले, त्यांच्यावरच विसंबलो आहोत... 15 ऑगस्ट, 26 जानेवारी... मिळणाऱ्या सुट्टीमुळे लक्षात असतील.. सुट्टी जर जोडून आली, तर फारच बहार आणतील... तीन-चार दिवस स्वातंत्र्याला, बघा कसं उधाण येईल.. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी जीव दिले, त्यांच्या प्रयत्नांचं चीज होईल... जुन्या लोकांच्या जुन्या गोष्टी, पुन्हा कशाला आठवायच्या..? असे जर म्हणत असाल, तर मग सुट्ट्या कशाला घ्यायच्या..? आपण करतो मौज-मजा, त्यांनी सांडलेल्या रक्तावर.. आपण उपभोगतो स्वातंत्र्य, त्यांनी भोगलेल्या शिक्षांवर... देशासाठी मेले ते...

पेरू : भाग ३ : वाळवंटाची सफर

लेखक समर्पक यांनी शुक्रवार, 15/08/2014 10:51 या दिवशी प्रकाशित केले.

या भागात अजुन थोडे पूर्वतयारीविषयी. भाषा हा अतिशय महत्वाचा घटक आहे. हा देश स्पेन साम्राज्याचा भाग होता त्यामुळे व्यवहाराची भाषा 'एस्पान्योल्' आहे. इंग्रजीशिवाय कोणतीही भाषा बोलली जात असलेल्या प्रदेशात जर तिथल्या रंगात रंगायचे असेल तर भाषेचा रंग आधीपासूनच चढवायला घेणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या भूमीवर उतरताक्षणीच मिसळून जाणे कठिण जात नाही... आपण भाग्यवान भारतीय, देशांतर्गतच हे अनुभवू शकतो, पण ती रंगण्याची इच्छा आणि तयारी हवी. याआधीही अशा एका देशाला भेट दिल्यामुळे या भाषेचा अभ्यास आधी एकदा झालेला होता, आता परत त्याची उजळणी आणि काही नवीन भर असा पहिले दोन महिने उद्योग होता.

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.

लेखक कविता१९७८ यांनी शुक्रवार, 15/08/2014 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
आज १५ ऑगस्ट २०१४ , आज भारतात सगळीकडे ६८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्‍या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम. सर्व मिपाकरांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

बँकेची कर्जवसुली आणी कारवाई (माहीती हवी आहे )

लेखक विलासराव यांनी शुक्रवार, 15/08/2014 05:57 या दिवशी प्रकाशित केले.
माझे वडील पंचायत समीतीमधे काम करत असत.२००३ ला ते गेले. त्यानंतर रीतसर पेपर्स जमा केल्यावर आईला पेन्शन चालु झाली.तब्बल १० वर्षांनी २०१३ ला पंचायत समीती मधुन आईला फोन आला की तुम्हाला डबल पेन्शन येत आहे. आनी तुम्हाला जवळपास ६ लाख रुपये भरावे लागतील. तुम्ही येउन भेटा. आई तर घाबरुनच गेली. मला फोन आला, मी तिला म्हनालो मग भरुन टाकु ,तुझ्याकडे असतीलच ना जादाचे पैसे. ती म्हणाली मला काय माहित होते का? मी आलेले पैसे खर्च केलेत. थोडेफार आहेत पन ईतके? मग मी तिला तिकडे न जाण्याचा सल्ला दिला.

स्ट्फ्ड कांदा पूरी आणि जीरा-आलू

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 14/08/2014 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य जीरा-आलू: १२-१५ छोटे बटाटे (बेबी पटेटोज)उकडून, सालं काढून घेणे १ टीस्पून जीरे १/२ टीस्पून हळद दीड टीस्पून लाल तिखट १ टीस्पून धणेपुड १ टीस्पून जीरेपूड मीठ चवीनुसार १ टेस्पून लिंबाचा रस बारीक चिरलेली कोथींबीर . पाकृ: बटाट्यांना काट्याने टोचे मारून घ्यावे. पॅनमध्ये तेल गरम करुन जीर्‍याची फोडणी करावी. त्यात उकडलेले बटाटे, मीठ व सुके मसाले घालून परतून घ्यावे. झाकून एक वाफ काढावी. त्यात शेवटी लिंबाचा रस व चिरलेली कोथींबीर घालून एकत्र करावे.

जॉर्डनची भटकंती : ०३ : नेबो पर्वत (Mount Nebo)

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 14/08/2014 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७...