पेरू : भाग ३ : वाळवंटाची सफर
या भागात अजुन थोडे पूर्वतयारीविषयी. भाषा हा अतिशय महत्वाचा घटक आहे. हा देश स्पेन साम्राज्याचा भाग होता त्यामुळे व्यवहाराची भाषा 'एस्पान्योल्' आहे. इंग्रजीशिवाय कोणतीही भाषा बोलली जात असलेल्या प्रदेशात जर तिथल्या रंगात रंगायचे असेल तर भाषेचा रंग आधीपासूनच चढवायला घेणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या भूमीवर उतरताक्षणीच मिसळून जाणे कठिण जात नाही... आपण भाग्यवान भारतीय, देशांतर्गतच हे अनुभवू शकतो, पण ती रंगण्याची इच्छा आणि तयारी हवी. याआधीही अशा एका देशाला भेट दिल्यामुळे या भाषेचा अभ्यास आधी एकदा झालेला होता, आता परत त्याची उजळणी आणि काही नवीन भर असा पहिले दोन महिने उद्योग होता. साधारण मूलभूत प्रश्न विचारता आले पहिजेत (उदा. रहायची सोय, बघण्यासारखी ठिकाणे, स्वच्छतागृहे, प्रवासी थांबे, ठिकाणापासून अंतर-वेळ, समय, पोलिस-डॉक्टर-पोस्ट,भारतीय दूतावास इ.) तसेच 'ही सुंदर भाषा मला थोडीशीच येते' 'मला समजलं नाही, परत/हळू सांगता का?' आदी उपयोगी वाक्ये आणि समोरच्याने सोप्या भाषेत बोललेले कळणे आवश्यक आहे. आणि एकल प्रवासामध्ये तर भाषा येणे अजून महत्वाचे. तुम्ही एकटे असता तेव्हा निश्चितच दुर्बल असता, त्यामुळे फ़सवले जाण्याची शक्यता अधिक, तेव्हा भाषा समजणे, व आपल्याला भाषा समजते हे इतरांना समजणे याने मोठा फ़रक पडतो. अजुन एक फ़ायदा मला असा झालाः शक्यतो एकल प्रवासी संस्कृती मधे वेगवेगळ्या ठिकाणचे लोक एकत्र रहातात, फ़िरतात आणि त्या त्या ठिकाणी त्यांचा एक तात्पुरता कंपू बनत जातो. (क्वीन चित्रपटात याची एक झलक पहावयास मिळते). मुख्यतः जपान, ऑस्ट्रेलिया, पूर्व युरोप त्यांच्या कंपूत भाषा येणा-यांचे अजून महत्व वाढते. आता या भागातील भटकंती, पराकासवरून आता जरा समुद्रापासून दूर ईका शहराकडे प्रस्थान. जवळच पिस्को नावाचे शहर आहे. त्या नावाची ब्रॅन्डी इथे फ़ार् प्रसिद्ध आहे. त्याच्या वाईनरीज्/डिस्टिलरीज् जवळपास आहेत. त्यातील एकाला भेट दिली. 'टकामा' दारूभट्टी शतकाहून जुनी व अजून कार्यरत आहे. 'पिस्को सोअर्' या नावाने प्रसिद्ध इथली मदिरा जणु पेरूचे 'राष्ट्रीय मद्य' आहे. ईथून इका जवळच आहे. आता आपण भर वाळवंटात आहोत. जगातील सर्वात उंच वाळूच्या टेकड्यांचा हा प्रदेश आहे. शहराच्या पश्चिमेला अगदी जवळच एक निसर्गाचा चमत्कार, व्हाकाचिना मरूद्यान आहे. उंचच् उंच वालुकापर्वतांच्या मध्ये एक सुंदर तलाव आणि त्या पाण्याच्या आधाराने वाढलेली रम्य हिरवळ. इथेच बर्फ़ाप्रमाणे वाळूचे खेळ खेळता येतात. 'स्नो बोर्डिंग' ब्लॅक डायमंड लेवल् पर्यंत येत असल्याने सॅन्ड्बोर्डिंग अजून मजेदार वाटले. एक बग्गी दिलेली होती, ती आपल्याला टेकडीवर घेऊन जाते आणि मग आपण घसरत खाली यायचं, परत बग्गी दुस-या टेकडीवर घेउन जाते, असा हा सूर्यास्ताजवळच्या एक दोन तासांचा खेळ. वाळवंट असलं तरी तापमान इथे खूपच कमी असते. इथूनच पुढे जगप्रसिद्ध नाझ्का रेषा आहेत. तिथे विमान सफ़र उपलब्ध आहे. तेथील गूढ अद्यापही तसेच असल्याने फ़क्त बघून परत यायचे एवढेच. त्याविषयी जालावर भरपूर माहिती आहेच्, त्यामुळे त्याविषयी अधिक नंतर कधी.
अटाकामा वाळवंट
मस्त !
मस्त !
पेरु देशाबद्दल फक्त
सर्व फोटो आणि माहित छान !
छान वर्णन आणि फोटो. दुसरा
In reply to छान वर्णन आणि फोटो. दुसरा by सखी
म्हणून तर निसर्गाचा चमत्कार
फारच छान.
सुंदर प्रवासवर्णन. उच्च फोटो.
In reply to सुंदर प्रवासवर्णन. उच्च फोटो. by प्यारे१
फोटो बघताना 'ममी' सीरिज आणि
In reply to फोटो बघताना 'ममी' सीरिज आणि by प्यारे१
+१
माझा आधीचा प्रतिसाद मिपा च्या
In reply to माझा आधीचा प्रतिसाद मिपा च्या by प्रसाद१९७१
जरूर
मरूउद्यान फारच सुंदर. तिथे
स्वप्नवत!!! मस्त!
झक्कास!
व्हाकाचिना मरूद्यान
उशीरा प्रतिसाद देत आहे..पण ते
मरूउद्यान अतोनात सुंदर आहे.