Skip to main content

मला माहीती असलेली महाराष्ट्रातील गणेश देवस्थाने

लेखक मित्रहो यांनी रविवार, 31/08/2014 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
मयुरेश्वर - मोरगाव महागणपती- रांजणगाव चिंतामणी- थेउर बल्लाळेश्वर- पाली विघ्नहर- ओझर लेण्याद्री सिद्धटेक वरदविनायक - महड सिद्दिविनायक - दादर महागणपती- टिटवाळा सारसबाग पुणे दगडूशेठ हलवाइ - पुणे मोरया - चिंचवड दशभुजा- पौंड फाटा पुणे पर्वती पुणे गणपतीपुळे टेकडी गणपती - नागपूर सिद्धीविनायक - केळझर (वर्धा) चिंतामणी - कळंब(यवतमाळ) माझी यादी फार छोटी आहे. एक दोन सोडले तर बहूतेक ठिकाणी मी स्वतः गेलेलो आहे. आपण भेट दिलेली गणेश देवस्थाने? मित्रहो

स्मार्ट्फोन

लेखक vikramaditya यांनी रविवार, 31/08/2014 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, स्मार्ट्फोन विकत घेण्याचे ठरत आहे. एका बाजुला बजेट (१०,००० च्या आत) आणि दुसरीकडे कार्बन, मायक्रोमेक्स ते samsung असा brand and model selection चा नुसता घोळ झाला आहे. ड्युअल सिम, ५ इन्च किंवा अधिक स्क्रीन, Android OS अश्या माफक (!) अपेक्षा आहेत. फेसबुक थोडेफार वापरले जाइल. आणि हो, नेट वर काहि कंपन्यांच्या आफ्टर सेल्स सर्विस विषयी फार वाईट अनुभव वाचले. काहि मार्गदर्शन करा की राव.

आदिकैलास ओमपर्वतदर्शन, पार्वती सरोवर परिक्रमा भाग-४

लेखक खुशि यांनी रविवार, 31/08/2014 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी गडबड,लगबग सुरु झाली घोडेवाले पोर्टर आले.पुन्हा एकदा बरोबर नेण्याचे प्रत्येकाचे सामान तागडीत टाकुन बरोबर २५ किलो असल्याची खात्री त्यानी केली आपले सामान नेण्यासाठी निगम घोडा-पोर्टर देते,पण स्वतःसाठी घोडा हवा असेल तर त्यासाठी ३५०० रुपये लागत होते.तो घोडा पुर्ण यात्रेत आपल्या बरोबर राहतो दोघाना ७००० रुपये लागले असते आम्ही आपल्या दोन दोन पायांचेच घोडे ठरवले. आज फक्त १९कि.मि. बसचा प्रवास होता.तवाघाट आले. हा डोंगरमाथ्या वरचा सपाटीचा भाग पार्वतीचा तवा.काली आणि गोरी गंगा या नद्यांचा सन्गम आहे.

माझ्या घरचा बाप्पा!

लेखक संपादक मंडळ यांनी रविवार, 31/08/2014 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. काहीजणांकडे बाप्पांना पुढच्या वर्षी यायचे निमंत्रण देऊन निरोपही दिला आहे. सगळी मंडळी मोदकांवर ताव मारून सुस्त झालेली असणार! गेल्या वर्षी आपण घरोघरच्या गणेशासाठीच्या सजावटी, मखरे यांच्या फोटोंची स्पर्धा आयोजित केली होती आणि तिला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी मात्र छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त "महास्पर्धा" चालू असल्याने श्रीगणेश सजावटीची स्पर्धा रद्द करत आहोत. मात्र घरबसल्या सर्वांना इतर मिपाकरांच्या घरच्या गणपतीबाप्पाचे दर्शन व्हावे म्हणून हा धागा काढत आहोत.

परदेशातला संस्कृती संगम

लेखक कल्पक यांनी रविवार, 31/08/2014 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या अनेक शतकांपासून माणूस हा शिक्षण, नोकरी, व्यवसाय, समृद्धी ह्या कारणांसाठी स्थलांतर करतोय आणि नविन प्रदेशाशी जुळवून घेताना आपले खाद्यपदार्थ, भाषा, संगीत, कला आणि संस्कृती ह्यांचं आवर्जून जतन करतोय. आज तंत्रज्ञानामुळे आणि प्रगतीच्या संधींमुळे देशादेशातील अंतर कमी होऊन अनेक संस्कृती एकमेकांमध्ये मिसळत आहेत. आणि जागतिक खेड्यातील ह्या संस्कृतीसंगमामध्ये प्रगतीसाठी धडपड हा एक समान धागा आहे. अशा संस्कृतीसंगमामध्ये खाद्य पदार्थ, भाषा, संगीत, कला, ज्ञान यांची देवाणघेवाण होते आहे.

पेरू : भाग ८ : अॅमेझॉन

लेखक समर्पक यांनी रविवार, 31/08/2014 00:19 या दिवशी प्रकाशित केले.

सर्वांगीण प्रवासानुभूतीचे अजून एक महत्वाचे अंग म्हणजे निसर्ग. जेथे जातो तेथील निसर्गविशेष शक्य तितक्या जवळून अनुभव करता आलं तर अजून मजा. एक उदाहरण, ग्रँड कॅन्यन बघायला हजारो लोक जातात, पण ते एक कोलोरॉडो नदीचे खननोत्पन्न शिल्प आहे हे लक्षात घेउन ती खोली उतरून त्या गंगेला स्पर्श करण्यास यातले किती जातात? तिथून नदीसह बघितलेली दरीची भव्यता हा त्या विस्मयानुभवाचा पूर्णविराम! या निसर्गानुभवामधे भूरूपे, प्राणि, पक्षी, वनस्पती, कीटक, फळे इत्यादि सर्वांचाच समावेश होतो. मानवी संस्कृती हे या अनुभवाचे एक सोपे माध्यममात्र...

बाप्पाचा नैवैद्य - चुरमा लाडू आणि पंचखाद्याचे मोदक

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 31/08/2014 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. गणपती बाप्प्च्या नैवेद्यासाठी चूरम्याचे लाडू आणि पंचखाद्याचे मोदक देत आहे.

राम गोपाल वर्माने लावलेली आग!

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 30/08/2014 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक गाजलेले सिनेमे आणि शोलेचा केविलवाणा रिमेक बनवणारा राम गोपाल वर्मा पुन्हा चर्चेत आला आहे. ऐन गणपतीच्या सणाच्या दिवशी त्याने गणपतीबद्दल अनेक वादग्रस्त ट्वीटे करुन खळबळ माजवली आहे. काही नमुने इथे आहेत. http://www.deccanchronicle.com/140829/entertainment-bollywood/article/r… ह्यातली काही विधाने म्हटली तर गमतीदार म्हटली तर अपमानकारक आहेत. सुदैवाने हिंदू धर्मात देवांची चेष्टा करणे हे इतके अब्रह्मण्यम मानले जात नाही.

माझे स्वयंपाकाचे प्रयोग

लेखक बाप्पू यांनी शनिवार, 30/08/2014 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
1) कोल्हापुरी चिकन मसाला. रविवार निवांत बारा वाजेपर्यंत लोळून कंटाळा आला. मग मध्येच चिकन खायची हुक्की आली. मनात आले की आज सुट्टी आहे तर हॉटेल मध्ये जाण्यापेक्षा स्वतःच बणवुया . लगेचच बाजारातून सगळे समान घेऊन आलो. जसे की चिकन, सुहना मसाला, कोथिंबीर, कांदे, तीळ, ओले खोबरे ई. आज काहीही झाले तरी झणझणीत चिकन बनवायचे आणि मिपावर पाककृती टाकून प्रतिसादांचा पाऊस पाडायचा असे मनात ठरवून मी स्वयंपाक घराकडे वळलो. चिकन बनवण्यासाठी जे काही मसल्याचे वाटण करतात ते करत असताना त्यात ओले खोबरे घालावे लागते.. मी मुद्दाम थोडे जास्त खोबरे घातले...

Bank account मधुन पैसे परस्पर काढ्ले गेलेत...

लेखक vrushali n यांनी शनिवार, 30/08/2014 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, पुन्हा थोडा त्रास देतीये आत्ता दोन दिवसांपुर्वी बाबांच्या मोबाइलवर असा मेसेज आला thank you for using your sbi debit card XXXXX for a purchase worth Rs 43350 on POS xxxxxxx at PayTM IN txn#xxxxxxxx बाबांनी असली काहीही खरेदि केलेली नाहिये,बाबा लगेच बॅन्केत गेलेत्, atm मधे जाउन चेक केले तेव्हा पैसे कापलेले दिसलेत्,बॅन्केच्या अधीकारी लोकांनी हात वर केलेत PayTM वाले फोन न देत नाहीत(१८००१८००१२३४ वर फक्त मेसेज रेकॉड करता येतो) care@paytm वर इमेल केली,ते लोक तीन दिवसांनी रिप्लाय देउन बॅन्केचे स्टेट्मेन्ट मागत आहेत्,जे आम्ही आज दिले,तेव्हा अजुन ४२००० रुपये PayTM इथे कापलेले दिसलेत CCAven