Skip to main content

मिरवणूक

लेखक धन्या यांनी सोमवार, 08/09/2014 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला, या प्रेमवेडीला या प्रेमवेडीला ही दुनिया पितळेची ही दुनिया पितळेची ही पोळी साजुक तुपातली, हीला लागलाय म्हावर्‍याचा वास तुज्या पिरतीचा इन्चू मला चावला जवा नविन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला अहो रात्री या आंटीची जवा घंटी मी वाजवली आता माझी सटकली... मला राग येतो.. गोल गोल चामडयाला दांडकं हे घासतंय

अनंतचतुर्दशी

लेखक प्रसाद गोडबोले यांनी सोमवार, 08/09/2014 19:11 या दिवशी प्रकाशित केले.

"इट्स डन "

****************************************************************************** साधारण १४ -१५ वर्षांपुर्वीची गोष्ट . अनंतचतुर्दशीचा दिवस ! महादरे तळ्याच्या काठावर विसर्जनासाठी तुडुंब गर्दी ओसंडली होती. तळ्याकाठच्या घाटावर लोक गणेशमुर्तींची आरती करत होते. पायर्‍यांवर उदबत्त्यांचा , निर्माल्याचा , चिरमुरे बत्ताशे फुटाणे वगैरे नैवेद्याच्या गोष्टींचा खच जमु लागला होता . छोट्या मोठ्या मंडळांच्या ढोलताशांच्या आवाजात सगळा परिसर दुमदुमुन निघत होता. तळ्याकडेच्या गणेशमंदीराच्या कळसावर सुरेख रोषणाई करण्यात आलेली होती.

स्पॅनिश ऑम्लेट (घरगुती)

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी सोमवार, 08/09/2014 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- १. ३ अंडी २. अर्धी सिमला मिर्ची (२*२ सेमी चे चौकोन तुकडे) ३. एक मोठा किंवा २ मध्यम कांदे (चौकोनी तुकडे वरील प्रमाणेच , पाकळ्या सुट्या करुन घेणे) ४. २ मोठे बटाटे, मध्यम पातळसर (जास्त पातळ ही नाही) तुकडे चौकोनी ५. टोमॅटो २ (जास्त पिकलेले असल्यास गर काढुन नाहीतर तसेच, वरील प्रमाणे चौकोनी तुकडे) ६. २ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन ७. चवी नुसार मीठ - मिरपुड ८. तेल 1. १.

वेरूळ: भाग ८ - बौद्ध लेणी (तीन ताल व दोन ताल)

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 08/09/2014 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
वेरूळ : भाग ७ - नवी सफर (रावण की खाई) वेरूळच्या जैन लेणींपासून सुरुवात करून ब्राह्मणी लेण्यांचे दर्शन घेत कैलासावरून सरकत सरकत म्हणजेच लेणी क्र. ३४ पासून लेणी क्र. १३ पर्यंत उलटा प्रवास करत करत आपण आता पोहोचलो ते वेरूळच्या सर्वात जुन्या लेण्यांपाशी, बौद्ध लेण्यांपाशी. ह्या लेण्या जुन्या म्हणजे किती जुन्या? तर फार जुन्या नाहीत, फार जुन्या नाहीत म्हणजे ह्या हिनयानपंथीयांच्या नाहीत. ह्या आहेत महायान कालखंडाच्या शेवटी शेवटी खोदल्या गेलेल्या म्हणजेच साधारण ६ व्या ते ८ व्या शतकात खोदल्या गेलेल्या.

आदिकैलास ॐ पर्वत दर्शन यात्रा, पार्वतीसरोवर परिक्रमा भाग - १२

लेखक खुशि यांनी सोमवार, 08/09/2014 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
चौदावा दिवस. जड अंतःकरणाने पुन्हा येऊ अशी आशा पालवत परतीचा प्रवास सुरू केला. आपल्या सैनिक बंधूंना विचारले, घर कब आओगे? आणि आमच्या व त्यांच्या डोळ्यांना अश्रूधारा कधी लागल्या ते समजलेच नाही. आदिकैलासनाथाचे पुन्हा एकवार दर्शन घेऊन निघालो. निसर्गसौंदर्य डोळे भरुन अंतःकरणात साठवत यथावकाश कुट्टीच्या मुक्कामी परतलो. आज इथेच मुक्काम असल्याने भरपूर वेळ होता. मग भोजन झाल्यावर कुट्टी गाव बघायला बाहेर पडलो. प्रथम पांडवांचा वाडा बघायला गेलो. तिथे तसे काहीच नव्हते, पण जाणवले की भिंती बांधण्यासाठी वापरलेल्या विटा वेगळ्या होत्या. आकाराने खूप रुंद आणि रंगही लालभडक.

मँगो मलई लड्डू/लाडू

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 08/09/2014 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः पाकृत टिन्ड मँगो पल्प/प्युरे वापरलाय. हापुस आंब्याचा सीजन निदान आता तरी संपलाय. ladoo 1 वेल खरं तर बाप्पाच्या आगमनाआधी हि पाकॄ द्यायची होती पण राहून गेली. पण हरकत नाय...एकदा ट्रायल बेसीस वर करुन बघा. जमली/आवडली तर पुढल्या वेळेस करुन दणक्यात पेश करा.

अ‍ॅ अक्षराच्या लेखन वाचनातील समस्या आणि प्रमाणीकरण

लेखक माहितगार यांनी सोमवार, 08/09/2014 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
आपण काही वेळा समस्यांनाही एवढे सरावलेले असतो कि नियमीत भेडसावणारी गोष्ट समस्या वाटेनाशी होते.

र्‍य आणि ऱ्य पैकी अधीक बरोबर कोणता ? आणि का ?

लेखक माहितगार यांनी सोमवार, 08/09/2014 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
र्‍य आणि ऱ्य हे दोन्ही वेगवेगळे आहेत का ? तर उत्तर होकारार्थी आहे. उदाहरणार्थ इथे मिपावर टाईप होतोय तो पहिला र्‍य आहे. हे दोन्ही साध्या डोळ्यांनी सर्वसाधारणपणे सारखेच दिसतात तर वेगळे ओळखायचे कसे ? न्याहाळकाच्या (ब्राऊजरच्या) कंट्रोल F मध्ये यातला एक एक र्‍य आणि ऱ्य वेगळा वेगळा घेऊन शोध घ्या, दोन्ही र्‍य एकमेकांना शोधात ओळखत नाहीत हे दिसून येईल.

आमचे गणपती-(बसतात..!)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 08/09/2014 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
भली पहाट, या शब्दाचा अर्थ मला माझ्या या पौरोहित्याच्या कामात अनेक अंगानी उमगलेला आहे.पण त्याची खरी किंमत कळली, ती या गणपतिच्या प्राणाला-प्रतिष्ठा देणार्‍या त्याच्या उत्सवाच्या,या पहिल्या दिवशीच!.. वेदपाठशाळेतून-सुटून,कामाला लागलेल्या गुरुजिपणाच्या पहिल्या ३ वर्षात (हाय..हाय..!) ही खरी चव चाखायला मिळते. तर...आदले दिवशी संध्याकाळी..आमचा बाप,हा वाड्यात आपले कार्टे जिथे दिसेल तिथून हकलत असतो.

पेरू : भाग ११ : लोकजीवन

लेखक समर्पक यांनी सोमवार, 08/09/2014 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
या भागात पेरूच्या समाजाचे जवळून दर्शन. कुठल्याही प्रदेशात नुसतं 'बघायला' न जाता अनुभवायला जायचं असेल तर स्वत:च्या 'फॉरेनर टॅग' चा उपरेपणाचा रंग उतरवून उत्सुक, जिज्ञासू रंगाचा उपयोग करून घेता आला पाहिजे. आजुबाजूच्या लोकांशी शक्य तितका संवाद साधत आपला अनुभव अधिकाधिक गडद व सखोल करता आला तर अभ्यास व आनंद दोन्ही वृद्धिंगत होतात. प्रत्येक समाजाची एक वैशिष्ट्यपूर्ण वीण असते, पोत असतो, त्याविषयी जाणण्याचा, ज्या ज्या लोकांना भेटण्याचा योग आला त्यातून या समाजाविषयी जाणण्याचा केलेला हा प्रयत्न, व बरोबरच काही साधी चित्रे.