Skip to main content

क्षण तो.....

लेखक psajid यांनी शनिवार, 22/11/2014 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
नाही विसरलो तुझं मला ओलांडूनी जाणं, जाता जाता मनाचं इतकं कठोर होणं !! कालपर्यंत दोघांचं एकच होतं जीणं, एका वळणावर मात्र त्या हाताचं झिडकारणं !! गैरसमज क्षुद्र तरीही जीवाचं करतो मागणं, आयुष्यच शून्य होईल गं तुला करता उणं !! तेही आठवतात क्षण तुझं उचंबळून येणं, आसू हासुच्या आठवांत गंध वर्षावूनी जाणं !! ते तुझं चालता चालता बोलणं बोलता बोलता हसणं, गालामधल्या खळीमध्ये माझ्या मनाचं बसणं !! आता ती खळी नाही टाकलंस ते बोलणं, तुझ्या वाचून नाही जगणं आयुष्याचं तूच तर देणं !! आठव आणाभाका त्या ज्यात आपलं होतं जीणं, प्रवाहाविरुद्ध पोहेन मी तुझ्यासंगती निर्मीन नवं गाणं !! :श्री.
काव्यरस

एलिझाबेथ एकादशी

लेखक मनिष यांनी शनिवार, 22/11/2014 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
Elizabeth Ekadashi परवाच 'एलिझाबेथ एकादशी' पाहिला, थोडयाफार त्रुटी असल्या तरी एकूण चांगला आहे. कर्जामुळे वडिलांनी बनवलेली सायकल 'एलिझाबेथ' विकावी लागणार आणि तिला वाचवण्यासाठी त्या दोन्ही मुलांचे प्रयत्न, त्यातला अस्सल प्रामाणिकपणा हा चित्रपटाचा प्राण - आणि त्यात येणारे पंढरपूरच्या छोट्या गल्ल्या-बोळांचे, लहान घरांचे आणि त्यांच्या भावविश्वाचे दर्शन हा भाग मस्त जमून आला आहे. ते घर एखादे पात्रच असल्यासारखे कथेत फिट्ट बसले आहे!

छावणी - ३

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 22/11/2014 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/29500 http://www.misalpav.com/node/29514 ******************** व्हाईसरॉय माऊंटबॅटन यांनी दिल्ली आकाशवाणीवरुन घोषणा केली आणि पाकीस्तान अस्तित्वात येणार हे पक्कं झालं! हिंदूंचे हिंदुस्तान आणि मुसलमानांचा पाकीस्तान अशी सर्वसामान्य जनतेची धारणा झाली होती. पाकीस्तानातील मुसलमानांनी हिंदूंच्या अस्तित्वाबद्द्ल प्रश्न केल्याबरोबर हिंदूस्तानात मुसलमानांचे काम काय असा प्रश्न साहजिकच पुढे आला.

शिंच्याचं पत्र.

लेखक Targat Porga यांनी शुक्रवार, 21/11/2014 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
होय रे बेण्या! कसा आहेस? तुझं पत्र काही येणार नव्हतंच. म्हटलं,चला आपणच देऊ एखादं धाडून परत. तू केलेला गुन्हा माझ्यासाठी कितीही अक्षम्य असला तरी फार काळ मी तुझ्याशी अबोल राहणार नव्हतोच. तुझ्याइतकं निष्ठूर होणं नाही जमायचं मला. तसं विशेष कारणही होतंच… परवा सुंद्री भेटली होती.,हो तीच! शेंबडी,रडकी,ढापणी,दोन वेण्या घालून मिरवणारी पण मनकवडी,मनमिळाऊ,अवसानी,खेळकर आणि तुझ्यावर जीव ओवाळून टाकणारी भोळी सुंद्री.केवढा बदल झालाय म्हणून सांगू तिच्यात!

सकाळी सकाळी कोठे वेळ असतो ....!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 21/11/2014 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी कोठे वेळ असतो थोडाही मोकळा मोकळा ...? ठेवायचा असतो चहा कधी कमी कधी जास्त साखर मात्र थोडी इकडे थोडी तिकडे नंतर असतोच स्वयंपाक नव-याचा भरायचा असतो डबा डब्यात थोडेसे हे थोडेसे ते निघता निघता खिडकीतून बघत बसते कोप-यावर वळले की मात्र थोडा दम खाते मग मुलांचे - थोडे थोडे दटावते मुलाना कधी धम्मक लाडू देते पाठीला सुतासारखे होतात सरळ स्वताला आवरून घेण्यासाठी थोडी थोडी मदत मात्र घेतात पोरांचे करता करता जीव मात्र हैराण होतो त्यांच्या डब्यात त्याना हवे तेच हवे असते रोज रोज बटाटा त्यांचे अगदी फेव्हरेट असते …. मुले गेली तरी सुटका होते कोठे ..?

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव १०

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 21/11/2014 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
५-४ असा एकागुणाने आनंद मागे. १२ डावांपैकी आज दहावा डाव. दहाव्या आणि बाराव्या डावात आनंदची पांढरी मोहोरी. सस्पेन्स याहून जास्त काय असू शकतो? आज विशीला सुलतानढवा करावा लागणार. कोणते ओअपनिंग? कोणत्या हिकमती?

दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष:

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 21/11/2014 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष: १) हे लोक त्याच गोष्टी म्हणतात किंवा करतात ज्या दुसऱ्यांनी करू नये असे यांना वाटते. २) हे लोक त्या गोष्टी आणि नियम कधीच पाळत नाहीत ज्या इतरानी पाळाव्यात असे यांना वाटते. 3) यशस्वी लोकांवर हे नेहेमी टीका करतात आणि त्यांचा द्वेष करतात. ज्या गोष्टी ते प्राप्त करू शकत नाहीत त्याबद्दल ते द्वेष आणि तुच्छता बाळगतात. ४) हे लोक इतरांच्या आयुष्याचे अंधानुकरण करतात.