मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष:

निमिष सोनार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष: १) हे लोक त्याच गोष्टी म्हणतात किंवा करतात ज्या दुसऱ्यांनी करू नये असे यांना वाटते. २) हे लोक त्या गोष्टी आणि नियम कधीच पाळत नाहीत ज्या इतरानी पाळाव्यात असे यांना वाटते. 3) यशस्वी लोकांवर हे नेहेमी टीका करतात आणि त्यांचा द्वेष करतात. ज्या गोष्टी ते प्राप्त करू शकत नाहीत त्याबद्दल ते द्वेष आणि तुच्छता बाळगतात. ४) हे लोक इतरांच्या आयुष्याचे अंधानुकरण करतात. आणि जर इतरांसारखे होकारात्मक परिणाम जाणवले नाहीत तर त्या लोकांच्या आयुष्यांवर टीका करून मोकळे होतात. ५) हे लोक द्वेषापोटी इतरांवर टीका करतात ६) हे लोक व्यक्तिपरत्वे टीका बदलतात. ७) हे लोक खासगीत त्याच गोष्टी करतात ज्या गोष्टींचा ते लोकांमध्ये मिसळले असतांना विरोध करतात.

वाचने 8893 वाचनखूण प्रतिक्रिया 43

सुबोध खरे Fri, 11/21/2014 - 11:44
आपण सर्वच जण थोडे फार दांभिक आहोत. कारण यातील एक किंवा अनेक गोष्टी आपण कधीना कधी तरी करीत असतो. फक्त आपल्याला दुसर्याने दांभिक म्हटलेले चालत नाही.

In reply to by सुबोध खरे

माहितगार Fri, 11/21/2014 - 11:52
स्वार्थाच्यादृष्टीने मानवी स्वभाव स्वहिताचे समर्थन करत असतो हे नैसर्गिक वाटते. धागा लेखातील क्रमांक ३ चा मुद्दा काही वेळा बरोबरही असू शकेल पण नेहमीच बरोबर असेल का या बद्दल साशंकता वाटते.

ह्या निमित्ताने आमची ही कविता आठवली http://www.misalpav.com/node/28280 पण बरेच दिवस मीच काही दांभिकपणा केलेला नाही ... आता काहीतरी खुसपट काढावे म्हणतो :D

पाषाणभेद Fri, 11/21/2014 - 15:19
ऑनलाईन डिक्शनरीनुसार A person who professes beliefs and opinions that he or she does not hold in order to conceal his or her real feelings or motives. म्हणजें एखादे मत किंवा समज, वागणूक वरवरची असेल किंवा त्या व्यक्तीच्या खर्या आयुष्यात तसे आचरण नसणे. थोडक्यात खोटे वर वेगळे अन आतून वेगळे वागणारी व्यक्ती. आपण वर दिलेल्या लक्षणांत तफावत दिसते आहे.

In reply to by पाषाणभेद

एखादे मत किंवा समज, वागणूक वरवरची असेल किंवा त्या व्यक्तीच्या खर्या आयुष्यात तसे आचरण नसणे. थोडक्यात खोटे वर वेगळे अन आतून वेगळे वागणारी व्यक्ती.
पाषाणभेद तुम्ही दगडं फोडता का हो ? ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

पाषाणभेद Fri, 11/21/2014 - 15:33
आपले मत समजले नाही. कृपया विस्तार करून सांगा म्हणजे आपल्या दोघांचेही शंकानिरसन होईल.

In reply to by पाषाणभेद

अहो तुम्हीच विचारले ना की दांभिक म्हणजे काय म्हणुन मी उत्तर दिले तुम्ही दगड फोडत नाही तरीही पाषाणभेद हे नाव घेता .... ह्यालाच म्हणतात दांभिकता आणि तुम्ही दांभिक :D

In reply to by सूड

अरे डु आयडी काढुन मय्यत्तर्री पाठवणार्‍यांची चेच्ष्टा करणे अन योग्य वेळ आली की डु आयडी जाहीर करणे ह्याला दांभिकता म्हणत नाहीत , ह्याला टवाळगिरी म्हणतात किंवा रिकामटेकडा नाव्ही भिंतीला तुंबड्यालावी असे म्हणतात , आयटी च्या भाषेत बेन्चयोग =))

In reply to by सूड

बॅटमॅन Fri, 11/21/2014 - 16:55
विझवलीत काडी!!
अंमळ गधेगाळीतल्या शेवटच्या वाक्यातील क्रियापदाचा 'वि'शेषेकरून भास जाहला. त्यादृष्टीने पाहता 'काडी' हे नामाभिधान चपखल आहे!

In reply to by जेपी

दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष:
>>>> जे पी तुम्ही फालतु (Third class ) लेख ओळखण्याचे सात निकष:>> असा धागा का बरे पाडत नाही ;)

मनीषा Sat, 11/22/2014 - 18:21
दांभिक लोकांची ७ लक्षणे ... १) देखल्या देवा दंडवत घालणे . २) आयजीच्या जीवावर बायजी ऊदार.. ३) मुखी हरीनाम, अंतरी शिव्याशाप. ४) गर्जेल तो पडेल काय ? ५) लोकांच्या डोळ्यातले कुसळ दिसते, पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही. ६) आपला तो बाब्या , लोकाचे ते कार्टे . आणि ७) लोकां सांगे ब्रम्हज्ञान , आपण कोरडे पाषाण.

In reply to by रेवती

प्रभाकर पेठकर Sun, 11/23/2014 - 01:24
ह्यालाच दांभिकपणा म्हणतात. हिन्दीकरण करण्याची प्रचंड उत्सुकता आहे पण शाहजोगपणे विचारून घ्यायचं. *smile* हलकेच घे हो, रेवती. (हाही दांभिकपणाच का??)

In reply to by रेवती

मनीषा Sun, 11/23/2014 - 06:15
---- त्याचा उल्लेख न लपवता केलाय. म्हणजे तुम्ही खर्‍या खर्‍या दांभिक नाहीच . कारण जे आहे ते नाकारणे आणि नाहीये ते आहेच असे आत्मविश्वासाने सांगणे, हे तर दांभिकपणाचे व्यवच्छेदक लक्षण आहे ना?

In reply to by रेवती

मनीषा Sun, 11/23/2014 - 05:58
जरूर जरूर ... माझा काही कॉपीराईट नाहीये . :) पण का..का..का? टीप : क्रमांक ४ मधील पडेल म्हणजे "रत्नांग्रीचा अण्णू गोगटे" नाही. ते -- गर्जेल तो बरसेल काय? असे वाचावे.

रेवती Sun, 11/23/2014 - 08:41
ओक्के. धन्यवाद मनीषा! प्रयत्न केला पण फारसे जमले नाही. मूंह में राम बगल में छुरी हे एकच जमले बाकी शरणागती. ;) हे म्हणजे जो गरजेगा वो बरसेगा क्या? टैप झाले.