Skip to main content

मटाची मैफल - मिपाचा सहभाग

लेखक नीलकांत यांनी शुक्रवार, 19/12/2014 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मराठी साहित्य जगताचा आढावा घेण्यासाठी तसेच साहित्य जगातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची एक मैफल महाराष्ट्र टाइम्सने येत्या शनिवार रविवारी आयोजीत केली आहे. यात मिसळपाव तर्फे रामदास काका सहभागी होत आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी यात सहभाग घ्यावा असे सुचवतो.

आरक्षणा संबंधी नवीन विचार

लेखक येडाफुफाटा यांनी शुक्रवार, 19/12/2014 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
माझे हिंदु/पुरुष/उच्चवर्गीय/ऊच्चवर्गीय/पहिला मुलगा असणे हीसुद्धा matter of fact च आहे. आणी त्याचे 'परिणाम भोगणे' असली काही परिस्थिती आलेली नसून त्याचे वट्ट फायदे मी 'enjoy' करत आहे. तरी काळजी नसावी. मला फक्त आरक्षणाला टार्गेट करायचे नव्हतेच. पण ते कोणाला व कसे दिले गेले आहे याचा 'फेरविचार' मला सुचवायचा आहे. तुम्ही तुम्हाला फायदा मिळत असताना त्याचा फेरविचार करणे अपेक्षित नाही पण थोडा वेळ निदान एकांतात तरी विरूद्ध बाजूने विचार करायला काय हरकत आहे. पण मी पुरुष/straight असूनदेखील feminist/LGBT वाल्यांना पाठिंबा देतो. फक्त माझ्या घरातील सदस्यासाठी नाही.

जडण-घडण 1६

लेखक माधुरी विनायक यांनी शुक्रवार, 19/12/2014 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण वर्षभरानंतर पुन्हा एकदा निवांतपणा. मी मजेत होते. आकाशवाणी सुरू होतंच. रूचेल तसं फ्री लान्सींगही सुरू होतं. फारशा जबाबदाऱ्या नव्हत्या, त्यामुळे हातात पूर्णवेळ नोकरी नसण्याचं टेन्शन नव्हतं आणि मुख्य म्हणजे माझ्या सोयीनुसार मला हवा तेवढाच वेळ काम आणि प्रवास करून माझ्या बरोबरीच्या सर्वांइतकंच, किंबहुना थोडं जास्तच उत्पन्नही हाती येत होतं. त्याहून महत्वाचं म्हणजे माझ्या घरातल्या सर्वांनी कायम दाखवलेला विश्वास. अगदी दहावी किंवा त्यानंतरही मी काय करावं, शिकवणी लावावी का, डी.एड्. करावं का, त्यानंतर पुढे शिक्षण घ्यावं का, अशा सगळ्याच बाबतीत घरच्यांनी सल्ले जरूर दिले, पण दबाव नाही आणला.

माणसे जोडणे ...

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 19/12/2014 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
आपण "माणसं जोडण्याच्या" मोठमोठया गोष्टी करतो आणि नेहेमी त्याची महती गात असतो. आपण मित्र जोडतो, इतर सहकारी जोडतो. पण रक्ताच्या नात्यांनी आधीच आपल्याशी जोडलेल्या माणसांना "जोडण्याचा" प्रयत्न कधी का करत नाही? बाहेरची माणसे जोडतांना आपण त्यांना गुणदोषांसकट स्वीकारतो पण नात्यातील माणसांना मात्र आयुष्यभर वेगवेगळ्या अपेक्षा आणि नियमांच्या खाली दाबून टाकतो आणि आपण स्वतः मात्र आपल्यात बदल करत नसतो. म्हणून ते अवघड आहे. कुणी म्हणेल की मित्र निवडतांना चाॅ‌ईस असतो, नात्यात नसतो. पण देवाने तेच तर एक चॅलेंज दिले आहे आपल्याला.

PK च्या प्रतीक्षेत...

लेखक मंदार कात्रे यांनी शुक्रवार, 19/12/2014 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे "पीके" सिनेमाचे वादग्रस्त पोस्टर प्रकाशित झाल्यापासून या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. त्यात २ महिन्यांपूर्वी गाणी अन ट्रेलर रिलीज झाला आणि उत्सुकता ताणली गेली .

अतिरेक्यांची मुख्य केंद्रे आणि आंतरराष्ट्रिय लष्करी कारवाई

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 19/12/2014 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
जेथे जागतिक दहशतवादाची केंद्रे व शिक्षणस्थाने आहेत आणि जेथून दहशतवाद निर्यात केला जातो या जागांबद्दल (खुद्द तो/ते देश सोडून) जागतिक सर्वसहमती आहे. तरिही या वस्तुस्थितीवर संयुक्त राष्ट्रसंघ अथवा इतर बहुदेशिय संघटनांकडून काही ठोस, विशेषतः लष्करी कारवाई का केली जात नाही याबाबत नेहमी आश्चर्य व्यक्त केले जाते. असे करावे असे सांगताना "हे करणे खूप अवघड असले तरी अशक्य नाही" असेही म्हटले जाते. तरीही अशी कृती केली जात नाही.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- १८

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 18/12/2014 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग- १७ फक्त मंगलाष्टकांचा लाइव्ह शो...........ऐका! आणि आवडला तर या आत्मूभटाला द्या एक... . मंङ्गलाष्टक....वन्स मोअर!!! पुढे चालू... ================= पर्वा दुपारी (नेहमी सारखाच) थकून,या पूजेच्या कामाहून आलो. जेवणंही टेचुन झालवतं अगदी. म्हणून जरा एक कडक पान लावलं आणि खोलीत पंखा सोडून सतरंजीवर कलंडलो जरा...! तेव्हढ्यात दाराची कडी वाजली जोरजोरात.. कोण मेलं आलं या इश्रांतिच्या टायमाला मधे...म्हणून चिडचिडून उठलो..आणि दार उघडलं..तर समोर उभा हा आमचा काका..

  एक चुकलेली बस - रेडबस डॉट इन २

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी गुरुवार, 18/12/2014 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
  एक चुकलेली बस - रेडबस डॉट इन २ पहीला भाग इथे पाहता येईल h एक चुकलेली बस, ते पकडलेली पहिली बस. बस आत्ताशी सुरु होत होती, अजून पुढे बराच प्रवास बाकी होता. रेडबसचे बिझनेस मॉडेल अगदी नवीन नव्हते. ऑनलाइन तिकीट एजंट सिस्टीम जगभर सर्वत्र विमानांच्या तिकीटांसाठी वापरली जाते. बहुतांश इंटरनेट सुशिक्षित वर्गाला या कार्यपद्धतीची कल्पना असते.

एsssssssss...कटा..,चला सुटाsssssssssssss

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 18/12/2014 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ पीठ.. + आंम्ही(...ह्ही ह्ही!!! ) = जिल्बी! =)) बघतो आहे वाट ,कधी तरी शब्द-येईल, आणलाच..!असाच..!बळंच..!,तरी..कविता कशी-होईल...? शब्दांचे ते डोंगर,अन् माझिया हतातील गदा, जुळणार्‍या ओळी पाहून ,यमके -पाडिन बदाबदा... तिच जागा=घोड्यांची पागा... शब्दाला शब्द जमला, "पडली नजर-की केला "वार" , यावर विश्वास बसला... एक वरीस झालं.., तरी..

वरदायिनी कालिका

लेखक मंदार कात्रे यांनी गुरुवार, 18/12/2014 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
देवी वरदान काळकाई ऊर्फ वरदायिनी कालिका ह्या देवी चे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर जवळ मुंबई-गोवा हायवे नजीक धामणी गावी आहे . या देवस्थानाला सुमारे 1000 वर्षापूर्वीपासूनचा इतिहास असून या मंदिरानजीक असलेल्या पुरातन शिल्पात काही सांकेतिक चिन्हे कोरलेली आहेत ,ज्यायोगे असे सिद्ध होते की हे देवस्थान हिमालयातील कटरा vaishnodevi च्या खालोखाल जागृत आहे. परंतु आजतागायत ते प्रसिद्धीस आलेले नसून प्रसिद्धी-पराङ्ग्मुख आहे.