Skip to main content

कलर्स वाहिनी वरची मालिका: चक्रवर्तीन अशोक सम्राट!

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 06/02/2015 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
स्टार प्लस वरील महाभारताची आपली चर्चा चांगली रंगली होती. महाभारत चा शेवटचा एपिसोड संपेपर्यंत चर्चा सुरु राहिली होती. आता नुकतीच कलर्स या वाहिनीवर "चक्रवर्तीन अशोक सम्राट" ही मालिका सुरु झाली आहे आणि सोम-शुक्र रात्री ९ वाजता. चक्क ५० मिनिटे हि मालिका दाखवली जात आहे. सुरुवातीची ३५ मिनिटे एकही ब्रेक नसतो. सुरुवातीचे तीन एपिसोड झकास जमून आले आहेत. पहिल्याच तीन भागात मराठीतले कसलेले कलाकार आपला सुंदर अभिनय सादर करत आहेत. मनोज जोशी चाणक्य बनलाय. समीर धर्माधिकारी बिंदुसार झालाय, पल्लवी सुभाष धर्मा/शुभ्रदंगी झालीय.

उपवासाला कोणती दारू चालावी ??

लेखक हेमन्त वाघे यांनी शुक्रवार, 06/02/2015 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
( नोंद घ्यावी - मी कोठ्याल्याही प्रकारचा उपवास करीत नाही . तसेच माझा व्यवसाय दारू चा प्रसार करणे आहे. ) अनेक वर्ष्यापूर्वी विलेपार्ले इथे ( मुंबईत ले छोटे पुणे) मी एक वैचारिक चर्चा एका मराठी उपहारगृहात केली होती - कि जर उपवासाला जर बटाटे आणे जव चालते तर काही प्रकारची वोडका जी बात्तात्यापासून केली जाते ती आणि काही बिअर ज्या जावा पासून केल्या जातात त्या का चालू नहेत ? म्हणजे घन ( solid ) असताना बटाटा चालतो आणि तेच द्रव रुपी वोडका झाले के चालत नाही आसे का? असे केल्यास उपवास अधिकाधिक लोकप्रिय होणार नाहीत काई ? त्यामुळे आपला धर्म हि अधिक समावेशक होऊन वाढायला मदत होईल .

भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित

लेखक पिंपातला उंदीर यांनी शुक्रवार, 06/02/2015 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
आताच नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याची बातमी जाहीर झाली आहे . नेमाडे यांचा तिरस्कार करणार पब्लिक बख्खळ आहे . एके काळी आम्ही नेमाडे वाचतो हे सांगणे अभिमानाचे लक्षण होते . आता हिंदू एक समृद्ध अडगळ नंतर नेमाडे कसे outdated झाले आहेत हे अह्महिकेनॆ सांगण्याची स्पर्धा चालू आहे . कोसलाशिवाय नेमाडे मला अजून एका गोष्टीमुळे आवडतात . त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होत , " भारतीय समाज हा समजा एक चादर आहे असे आपण गृहीत धरूया . समजा हि चादर आपण झटकली तर यातून काय पडेल ?

Wrong Number

लेखक NiluMP यांनी शुक्रवार, 06/02/2015 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
लँडलाईनच्या काळात राॅंग नंबर म्हणजे एक प्रकारची डोकेदुखी होती. टेलेकम्युनिकेशन आणि मोबाईल क्रांतीमुळे त्यातुन सुटका झाली. पण मार्केटिक काॅलमुळे नवीन डोकेदुखी सुरु झाली पण राॅंग नंबर व मार्केटिक काॅलमुळे करमणूकही होते कशी याचेच काही किस्से मी सांगाणार आहे किस्सा 1. सर्वसाधारणपणे आपण ज्याला फोन करतो त्याची खात्री करुन आपल्याला ज्याच्याशी बोलयचे आहे त्याचे नाव सांगतो.

‘अनासक्त’... मुक्त भावयात्रा - २

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 06/02/2015 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
‘अनासक्त’... मुक्त भावयात्रा -१ मुकुंदराज कुलकर्णी यांच्या प्रत्येक कवितेतून एका एका प्रसंगामागच्या, स्थळामागच्या, व्यक्तीमागच्या हळुवार भावना अलगद प्रकटतात. शब्दांच्या रचनेतून ती ती भावना एखाद्या आरसपानी वास्तूसारखी सर्व कंगोरे लेऊन मनाच्या प्रतलावर रेखाटली जाते. मूर्त रुपात साकारते. कवितेतील शब्दही फारसे अलंकारिक नाहीत. साधेच शब्द, रोजच्या बोलण्यात नेहमी भेटणारे. पण त्यातूनही काव्यात्मकता अचूक प्रकट झाली आहे. अगदी तुमच्या आमच्याही दैनंदिन जीवनात घडणाऱ्या साध्या साध्या घटनांमध्ये लपलेले ‘काव्य’ नेमकेपणे शोधून या कविता आपल्यासमोर मांडतात.

राँग नंबर - ३

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 06/02/2015 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
रॉंग नंबर : भाग १ आणि २ **************************************************************************************** “कर्रर्रर्र..क्क्क..क्कच्च्च्च्च्च…… भयाण वेगात आलेली ती झोंडा ’तरन्नुम’च्या दारात येवून कच्चकन थांबली तसा ’तरन्नुम’च्या सिक्युरिटी गार्डने खिशातला रुमाल काढून आधी घाम पुसला आणि मग घाबराघुबरा होत हॉटेलच्या काचेच्या दरवाजातून अंतर्भागात डोकावून बघीतले. तसे आतल्या बाजुला उभा असलेला जाफर पटकन अजुन आतल्या भागात पळाला.

डोळा लवतो लकी नसतो;

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 06/02/2015 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
डोळा लवतो लकी नसतो; विचारा मला मी सांगतो! एक सुंदरी शेजारी आली, हसली आणि 'नाव काय?' म्हणाली; खुश होऊन बोलायला जातो.... इतक्यात मेला डोळा लावतो! शब्द घशात अन् स्वप्न ढगात... कोण म्हणत... नशीब उघडत डोळा लवण्यात? गाडी पुढे सरकते.. लग्न ठरते... लग्नात बायकोची चिकणी मैत्रीण समोर येते... ओळखिच हसून 'नमस्ते' म्हणते; मी ही हसतो ... खुशीत येतो... इतक्यात डोळा परत घात करतो! हळूच लवतो अन् 'सुहाग रात'ची वाट लावतो. संसार होतो... एक मुलगी अन् एक मुलगा देखिल होतो; कालमानाने सर्वच मोठे होतो; लेकीचा मित्र भेटायला येतो... लग्नासाठी मागणी घालताना बायकोकड़े बघतो... अन्..
काव्यरस

मेक्सिको: भाग ३ : 'माया'वी जगात प्रवेश

लेखक समर्पक यांनी शुक्रवार, 06/02/2015 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १: प्रस्तावना, भाग २: मेरिदा अमेरिका खंडात उचापती युरोपिअन लोक पोहोचले आणि एका विनाशसत्राला प्रारंभ झाला. कॅनडा व संघराज्यातील भागात लक्षावधी हत्या घडवून पद्धतशीर वंशविच्छेद करण्यात आला. थोड्या दक्षिणेत मध्य मेक्सिको मध्ये प्रचंड लूट व वर्णसंकर घडवण्यात आला. या भागात आज बव्हंशी 'मेस्टिझो' म्हणजे अॅझ्टेक व स्पॅनिश संकरवंशी लोकसंख्या आहे.

तु

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 06/02/2015 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
आज... थरथरत्या नाजुक पानावरच दव तुझ्या ओठांची आठवण करून देतय आणि त्याच पानाची जमिनीकडे झुकलेली कडा तुझ्या लाज-या पापण्यांची. पानामगुन हळूच डोकावणार फुल म्हणजे तर मूर्तिमंत तूच. खिड़की पल्याड उभी राहून हळूच माझ्याकडे पहाणारी.... आज ही पहाट संपूच नये अस वाटतय. कारण खळाळणा-या झा-यामधून तुझ हासु एकु येतय. वडाच्या पानांना चुकवत जमिनीवर उतरलेली सूर्याची तिरीप तुझ्या अवखळपणाची आठवण करून देते आहे. जस निघायच्या घाईतही माझे डोळे तुला शोधतात आणि हे पक्क माहीत असलेली तू उगाच कामात असल्याच भासवातेस. हाय ... हा वाहणारा वारा... तुझ्या चेह-यावर झुकणा-या बटांशी खेळतोय जणु. ही पहाट...

एम. एस. ई. बी. आणि संस्कार !

लेखक म्हया बिलंदर यांनी गुरुवार, 05/02/2015 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
म्हया बिलंदर - हेल्लो एम. एस. ई. बी.? पलीकडून - हं बॉला? म्हया बिलंदर - अहो, *** ईथे वीज गेलीये. पलीकडून- बरं . म्हया बिलंदर - अहो, बरं काय? कोणाला तरी पाठवून बिघाड दुरुस्त करून घ्या. पलीकडून - हं, येईल १५ मिनटात . म्हया बिलंदर - कोण? पलीकडून - कोण म्हणजे? म्हया बिलंदर - कोण म्हणजे, वीज की तुमचा माणूस? पलीकडून - माणूस. म्हया बिलंदर - मग वीज? पलीकडून - तिथून पुढं १५ मिनटात. म्हया बिलंदर - अहो, संध्याकाळ झालीये पूर्ण काळोख पडलाय. मुलांचा आभ्यास जेवण सगळं राहिलंय आणि… (पलीकडून खड्याक.