डोळा लवतो लकी नसतो;
लेखनविषय:
काव्यरस
डोळा लवतो लकी नसतो;
विचारा मला मी सांगतो!
एक सुंदरी शेजारी आली,
हसली आणि 'नाव काय?' म्हणाली;
खुश होऊन बोलायला जातो....
इतक्यात मेला डोळा लावतो!
शब्द घशात अन् स्वप्न ढगात...
कोण म्हणत...
नशीब उघडत डोळा लवण्यात?
गाडी पुढे सरकते.. लग्न ठरते...
लग्नात बायकोची चिकणी मैत्रीण समोर येते...
ओळखिच हसून 'नमस्ते' म्हणते;
मी ही हसतो ... खुशीत येतो...
इतक्यात डोळा परत घात करतो!
हळूच लवतो अन् 'सुहाग रात'ची वाट लावतो.
संसार होतो... एक मुलगी अन् एक मुलगा देखिल होतो;
कालमानाने सर्वच मोठे होतो;
लेकीचा मित्र भेटायला येतो...
लग्नासाठी मागणी घालताना बायकोकड़े बघतो...
अन्.. यावेळी मात्र....
त्याचा डोळा लवतो...
हाय रे किस्मत.. छोकरा त्याला घरातून पळवतो;
कोण म्हणतो...
डोळा लवतो लकी असतो;
विचारा मला मी सांगतो!
वाचने
6190
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
तुफ्फान
कसं काय सुचतं ओ तुम्हाला हे
मी तर तुमची फॅन झाली आहे.
In reply to मी तर तुमची फॅन झाली आहे. by अजया
मी पण
In reply to मी पण by सविता००१
मी पण
"आंबा पिकतो रस गळतो" च्या
In reply to "आंबा पिकतो रस गळतो" च्या by बॅटमॅन
(No subject)
In reply to "आंबा पिकतो रस गळतो" च्या by बॅटमॅन
अगगागागाग्गागागा
In reply to "आंबा पिकतो रस गळतो" च्या by बॅटमॅन
यासाठी आणि यासाठीच्च ळॉळ !
In reply to "आंबा पिकतो रस गळतो" च्या by बॅटमॅन
खरंच म्हणता येतंय!
In reply to "आंबा पिकतो रस गळतो" च्या by बॅटमॅन
तुफ्फान ठ्ठो
In reply to "आंबा पिकतो रस गळतो" च्या by बॅटमॅन
@आर्य आम्रप्रेमी मंडळ.>>
In reply to "आंबा पिकतो रस गळतो" च्या by बॅटमॅन
Lol
बोलताना डोळे लवणारा (मारणारा)
अहो,पण माझ्या माहितीत "लवणारी
छान.आधी वाचल्यासारखी वाटली
भन्नाट!! कसं काय सुचत हो!!