मेक्सिको: भाग ३ : 'माया'वी जगात प्रवेश
भाग १: प्रस्तावना, भाग २: मेरिदा
अमेरिका खंडात उचापती युरोपिअन लोक पोहोचले आणि एका विनाशसत्राला प्रारंभ झाला. कॅनडा व संघराज्यातील भागात लक्षावधी हत्या घडवून पद्धतशीर वंशविच्छेद करण्यात आला. थोड्या दक्षिणेत मध्य मेक्सिको मध्ये प्रचंड लूट व वर्णसंकर घडवण्यात आला. या भागात आज बव्हंशी 'मेस्टिझो' म्हणजे अॅझ्टेक व स्पॅनिश संकरवंशी लोकसंख्या आहे. त्याहून दक्षिणेकडे माया लोकांचे धर्मपरिवर्तनाचे सत्र तर सुरू झालेच, त्याबरोबर त्यांचे ज्ञानभंडार नष्ट करण्यात आले. या लोकांना लेखनकला अवगत होती व त्यांचे अनेक ग्रंथ लिखितस्वरूपात (किंवा चित्रलिपी असल्याने चित्रस्वरूपात म्हणू आपण) जपलेले होते ते हजारोंच्या संख्येत जाळले गेले. ही जागतिक साहित्याच्या इतिहासातील नालंदाविनाशाप्रमाणे भीषण व कधीही न भरून निघण्यासारखी हानी आहे. जे लोक दूर जंगलात पळून गेले ते वाचले व अत्यल्प प्रमाणात आज ही संस्कृती टिकली. पुढे अजून सुदूर दक्षिणेकडे इंका सामाजाचीही बरीच समांतर कथा. या पळापळीत राहती घरे सोडून हे लोक गेले आणि शहरे च्या शहरे ओसाड पडली. कालांतराने निसर्गाने ती आपल्या ताब्यात घेउन जंगलाच्या पांघरुणात हलकेच दडवून ठेवली. तशी माया लोकांनी आक्रमणपूर्व इतिहासातही काही स्थाने अज्ञात कारणाने सोडून दिली होती त्यांचाही आता हळूहळू शोध लागत आहे. अशा दोन 'हरवले-सापडले' विभागातील दोन शहरांची सफर... कबाह् व ऊश्माल. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स.
ऊश्माल मोठ्या माया शहरांपैकी एक, पारंपारिक चौकोनी आकाराच्या पायापेक्षा वेगळा पाया असलेल्या पिरॅमिडसाठी प्रसिद्ध आहे. काही काळासाठी हे राजधानीचे शहर असल्याने मोठ्या इमारती आहेत. येथील इमारती पाच ते अकराव्या शतकाच्या कालावधीतील आहेत. आक्रमणकालापर्यंत हे शहर वपरात होते, नंतर मात्र झपाट्याने -हास होऊ लागाला. बराच भाग आता जंगलाकडून परत मिळवण्यात आला आहे.
भाग ४ : चिचेन ईत्झा
वाचने
6586
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
अहाहा काय सुंदर फोटोज आहेत.
दुसर्यांनी कष्टांनी उभारलेले व पिढ्यानपिढ्या जपलेले ज्ञानभांडार अचानक नष्ट करताना काहीच कसे वाटत नाही आक्रमकांना. हे सर्व नष्ट न करताही तेथे सत्ता करणे अशक्य नसावे.
किती मारामारी करतात ब्वॉ! शिवाय जाळपोळही. विध्वंसंक मेले!
फोटो छान आहेत. आवडेश. एक शंका आहे. मीना प्रभूंचया पुस्तकात चाक देव हा चक असा लिहिला आहे. बरोबर उच्चार काय आहे?
In reply to बास रेवाकका by मनिमौ
खरा उच्चार देवनागरीमध्ये लिहिणे शक्य नाही. पण पहिले अक्षर ह्रस्व नक्किच नाही… त्यामुळे चाह्क असा काहीसा बरोबर उच्चार असावा .
मस्त झालाय हा भाग.
फोटोज आवडले.

मस्त, आवडले. पुजारी मांडी घालून किंवा पद्मासन लाऊन बसला आहे. आश्चर्य आहे.
आवडता विषय, फोटोही सुंदर आहेत. सध्या मेक्सिकोपासून फक्त हजारएक १५० ते २०० किमी अंतरावर आहे. बघुया कधी योग येतोय. तूर्तास फोटोवर समाधान. :-)
माझाहि आवडता विषय.'माया'वी जग आणि फोटो आवडले.
आधीच्या भागांच्या लिंका देत जा ना! आणि लेखमाला पूर्ण झाली की मग सांगा. सगळे भाग एकदमच वाचून काढणार. आपल्याला काय दम धरवत नाय ब्वॉ! :-)
अप्रतिम ..... निशब्द
खूपच वेगळ्या प्रकारची शिल्पे आहेत!
अहाहा