Skip to main content

त्या फुलांच्या गंधकोषी....सांग तू आहेस का?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 08/02/2015 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
काल पासून हे शब्द माझ्या मनाला अनंत यातना देत आहेत. अर्थ मी लावावा,तर अभिप्रेत अर्थ सुटून ..होणार्‍या अनर्थाचे भय. आणि तरिही लावला,तर मूलार्थाचे काय? याची चिंता! मला प्रतीत होणारा असा एक अर्थ आहेच..प्रतिबिंब म्हणून आलेला..! पण मूळ बिंबाचे काय मग??? ते कसे आहे??? तर कविने ते मानले आहे..मानवाच्या अज्ञेयवादाचे बीज असलेल्या परमेश्वरी स्वरूपात..! मानवाच्या अस्तित्वाचा (त्यानीच मानलेला..)काल्पनिक सहभागिदार:- परमेश्वर्,देव ,भगवंत,सखा ,सोबती,निर्मिक..सारे काहि! (मग मी म्हटलं.की आपण आज आधी "हे" पाहू! आणि आपल्या तडफडिचं बीज कशात आहे?

मुंबईत ६ हजार सीसीटीव्ही

लेखक नांदेडीअन यांनी रविवार, 08/02/2015 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
बातमी http://www.business-standard.com/article/companies/l-t-to-complete-installation-of-6-000-cctv-cameras-in-mumbai-by-2016-115020700860_1.html
म्हणजे एका CCTV कॅमेर्‍याला (दुरूस्ती, देखभाल) १५ लाख ८३ हजार समथिंग रूपये ! प्रामाणिकपणे सांगतो, माझे गणित खूप कच्चे आहे. :( काही चुकत असेल तर कृपया दुरूस्त करा. खरंच इतके पैसे लागतात का ?

गलित आहे गात्र अजुनी

लेखक चिमिचांगा यांनी शनिवार, 07/02/2015 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
कविवर्य सुरेश भटांच्या फेमस आव्हानाला समस्त पुरुषजातीचे उत्तर... तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ? एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ? अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला अजुन मी विझले कुठे रे ? हाय !

दिल्ली मतमोजणीपूर्व धागा

लेखक क्लिंटन यांनी शनिवार, 07/02/2015 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आजच दिल्ली विधानसभेसाठीचे मतदान पार पडले.मतमोजणी १० फेब्रुवारीला होईल.बहुतांश एक्झिट पोलच्या अंदाजांप्रमाणे आआपला जबरदस्त यश मिळायची शक्यता आहे.एक एक्झिट पोल भाजपला २७ ते ३५ तर आआपला ३१ ते ३९ अशा जागा देत आहे तर अन्य एक एक्झिट पोल भाजपला काठावरचे बहुमत देत आहे.अजून मतमोजणी झालेली नाही तेव्हा प्रत्यक्ष निकाल काहीही लागला तरी दोन्ही परिस्थितीत माझे निकालांनंतरचे मत कसे असेल हे लिहिणे हा या धाग्याचा उद्देश आहे.यापैकी आआप जिंकल्यास माझे मत काय असेल हे या लेखात आणि भाजप जिंकल्यास माझे मत काय असेल हे नंतर प्रतिसादात लिहेन. दोन्ही मला लेखातच लिहायचे होते पण विस्तारभयास्तव ते टाळतो.

खरी कविता..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 07/02/2015 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
त्या खर्‍या कविता..म्हणुनी शब्द कल्पना सांगत नाही. येतील आज..? पुन्हा? .. का कधिही!(?) अश्या कुठे त्या.. थांबत नाही. बोलावुनी वा हाकारुनी त्या ढुंकुन कधिही पहात नाही. आणि घेतले टाळे लावुनी येणे-असता.. रहात नाही. बासरी ,पुंगी..नाद कसाही निश्चित त्यांचे स्वरूप नाही. किंवा स्वये त्या नाद-घेऊनी येतील..त्याचे अप्रुप नाही. वार्‍या समं ते शब्द वाहती कवेत त्यांना घेता..
काव्यरस

इलेक्शनी- चारोळ्या

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 07/02/2015 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी दिल्लीत निवडणूक होती. आमच्या भाग उत्तम नगर भागात, जिथे नावाखेरीज काहीच उत्तम नाही., सकाळी वोट टाकून आलो. थोडा-फार फेर-फटका ही मारला. अनधिकृत वस्तीतल्या गल्ली बोळ्यांत आज जे काही खुले आम दिसत होते, त्याला काय म्हणावं....... (१) प्रसाद घ्या तीर्थ प्या आटोत बसा वोट आपला असा विका. (२) नेता नोट मोजतात नोट मते मोजते. (३) गांधींच्या डोळ्यांत एकच सवाल? गुलाबी नोटेवर फोटू का?

automatic प्राणायाम :-डोक्यातली हवा काढणारी पीन

लेखक पिनुराव यांनी शनिवार, 07/02/2015 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
अनुलोम-विलोम वगैरे प्राणायाम करतांना नाकातून शेंबूड वगैरे सामग्री बाहेर येण्याच्या तक्रारी असतात . श्वास वर ओढताना नाकपुडीत मच्छर वा चाचनही जाण्याची शक्यता असते. शिवाय आमच्या तरुण पिढीला, स्मार्ट (आजोबा-आजीना,काका ,मामा ,मावश्या, आई बाबा वगैरे) वडिलधार्यांना खाली बसून नाकाला हात लाऊन प्राणायाम करण्याची लाज वाटते .

कावळा *** लकी नसतो;

लेखक चुकलामाकला यांनी शनिवार, 07/02/2015 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा डोळा लवतो लकी नसतो; कावळा *** लकी नसतो; विचारा मला मी सांगतो! एक सुंदरी शेजारी आली, हसली आणि 'नाव काय?' म्हणाली; खुश होऊन बोलायला जातो.... इतक्यात मेला कावळा ***! शब्द घशात अन् स्वप्न ढगात... कोण म्हणत... नशीब उघडत कावळा *** त? गाडी पुढे सरकते.. पार्किंग मिळते ... बाहेर पडता बायकोची चिकणी मैत्रीण समोर येते... ओळखिच हसून 'नमस्ते' म्हणते; मी ही हसतो ... खुशीत येतो... इतक्यात कावळा परत घात करतो! हळूच *** अन् भावी डेट ची वाट लावतो. संसार होतो...

पुन्हा एकदा राजगड तोरणा!!--भाग २

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शनिवार, 07/02/2015 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकदा राजगड तोरणा!!--भाग 1 रात्री थंडीने कहर केला होता. त्यातच मंडळींची मंदिराच्या आतबाहेर ये जा चालू होती त्यामुळे झोपमोड होत होती. मंदिरात एक लाईट चालू ठेवला असल्याने त्याचाही उजेड जरा त्रासदायक होत होता. पण दिवसभर केलेले श्रम या सर्वांवर मत करत होते आणि डोळे गपागप मिटत होते. पहाटे ४ वाजल्यापासून गावकर्‍यांची नाश्ता पाण्याची लगबग सुरु झाली कारण त्या १७ जणांची ऑर्डर होती. तरीही चिवटपणे प्रयत्न करुन ६ वाजेपर्यंत झोपलो .