Skip to main content

चाललोय....

लेखक चक्कर_बंडा यांनी मंगळवार, 09/05/2023 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
काळेसावळे ढग, दरीतल्या सावल्या पावसाचा साज, बुजलेली पाऊलवाट, वाऱ्याचे बहाणे, सोनकीचे डोलणे मुरवत चाललोय.... हिरवीगारं कुरणं, दगडी शेवाळ विहीरीतला खोपा, कुत्र्याच्या छत्र्या चंद्रमौळी विसावा, खापरी कौलं निरखत चाललोय.... देवळाची पायरी, चाफ्याचा दरवळ सोनसळी पावलं, पैंजणांचा गुंजारव नजरेतला नखरा, माळलेला गजरा आठवत चाललोय.... क्षण तुझ्या दरवळत्या अस्तित्वाचे कण तुझ्या विरघळत्या भासांचे दशकं सरली, चालण्याचा मोह सुटेना जगणं कसलं ???
काव्यरस

दोन शशक- घरी बसून कमवा

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी मंगळवार, 09/05/2023 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात मला एका मुलीचा व्हॉट्सअप मेसेज आला होता.मग कुठल्यातरी अमेरिकेतल्या नंबरावरून फोन आला.म्हणाली घरून काम करा आणि पैसे कमवा.म्हणे फेसबुक,इंस्टाग्राम,युट्युबवर वगैरे बघून ते सांगतील त्या अकाउंटला लाईक करायचे पैसे मिळणार. म्हटले घरबसल्या काय वाईट आहे? ती म्हणाली तसे पहिले ५०० रुपये भरून अकाउंट उघडले.पहिल्याच दिवशी १०० रुपये मिळाले कामाचे. मी खुश. रोज साधारण तेव्हढेच मिळत होते.२-३ दिवसांनी मी कॉल करून विचारले की जास्त पैसे मिळवायला काय करावे लागेल? ती म्हणाली ५० हजार रुपये भरून प्रीमियम अकाउंट काढावे लागेल. तेही काढले. आता मला दररोज ५०० रुपये मिळू लागले.

"The Kerala Story" - एक उत्तम कलाकृती!

लेखक टर्मीनेटर यांनी मंगळवार, 09/05/2023 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
मी सहसा बायोपिक्स, सत्यघटना/प्रसंगांवर आधारित असल्याचा दावा करणारे डॉक्युमेंटरी टाईप सिनेमे चित्रपटगृहातच काय OTT किंवा युट्युब वर देखील पहात नाही, ती माझी आवडच नाही. बायकोची इच्छा होती म्हणून OTT वर बघायला घेतलेला 'The Tashkent Files' हा अत्यंत रटाळ सिनेमा तिलाही एक चतुर्थांश देखील बघवला नव्हता, आणि तो अनुभव गाठीशी असल्याने त्याच दिग्दर्शकाचा 'The Kashmir Files' हा सिनेमा देखील आम्ही अद्याप बघितलेला नाही.

आंबोली लेणी आणि कोंडिविते लेणी (जोगेश्वरी लेणी आणि महाकाली लेणी)

लेखक गोरगावलेकर यांनी मंगळवार, 09/05/2023 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडचेच प्रचेतस यांचे बदामी , ऐहोळे लेणी वरील माहितीपूर्ण लेख आणि राजेंद्र मेहंदळे यांचा लोहगड, भाजे लेणी लेणीवरील अगदी ताजा असा सुंदर लेख वाचला आणि मलाही नुकत्याच केलेल्या एका छोट्याश्या उन्हाळी भटकंतीतील लेण्यांबद्दल सांगावेसे वाटायला लागले. मुंबई परिसरात प्रसिद्ध कान्हेरी व एलिफंटा या गुफांव्यतिरिक्त आणखीही काही गुफा आहेत त्या म्हणजे जोगेश्वरीची गुफा, अंधेरी येथील महाकाली गुफा तसेच दहिसरची मंडपेश्वर गुफा.

||इदं न मम||

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 09/05/2023 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
||इदं न मम|| भरली ओंजळ पूर्ण अगदी पूर्ण रिकामी करताना, चार पावलं सोबत चालून पुन्हा मागे येताना, उचलून घेतलं फूल पुन्हा मातीत ठेवताना, शब्दांची साथ सोडून समंजस मुकं होताना, डोळ्यामध्ये उगा कुणी पाणी आणू नये. मनामध्ये उगा तेव्हा त्रागा करू नये. हस-या मुखाने, भीष्माच्या अलिप्तपणाने अनुभवलेली ओल, गंध, स्पर्श वा अर्थ आठवावे. आणि तृप्तपणे म्हणावं, इदं न मम| इदं न मम|

जेल भरती

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 09/05/2023 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.lokmat.com/mumbai/during-the-ongoing-written-examination-in… पोलीस भरती आधी बेड्या? अरे हे काय केलस रे वेड्या?! भरती-पेपर मधे केलीस काॅपी तुला तर घालायची होती खाकी! पेन मधे ठेवले सिम कानात उपकरण, ही कसली रे थीम हे काय प्रकरण? अरे खुळ्या ते आहेत पोलीस तू मात्र अक्कल ठेवली ओलीस आता सुन्न, पहातोय जेल काहीतरी शिकाला पाहीजेल.

नर्मदे हर- उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 08/05/2023 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा बंद असताना धागा उडल्यामुळे पुन्हा प्रकाशित करत आहे. ====================================================== नमस्कार मंडळी नर्मदा परिक्रमा या विषयावर भरपूर लेख,पुस्तके वगैरे उपलब्ध आहेत. मला वाटते "नर्मदेच्या तटाकी, & नर्मदे हर! (नर्मदा परिक्रमेचा अनुभवसिद्ध वृत्तान्त - रघुनाथ रामचंद्र गुण्ये )" हे पुस्तक त्यातल्या त्यात जुने असावे. कारण श्री.जगन्नाथ कुंटेंच्या नर्मदे हर पुस्तकातही त्यांनी गुण्यांचे पुस्तक वाचून परिक्रमा केल्याचे लिहिले आहे.

मिपाकट्टा-पुणे ०७ मे २०२३

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी रविवार, 07/05/2023 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी कर्नलकाकांनी विनंती केल्यावरुन हा आजच्या कट्ट्याचा छोटासा वृत्तांत एक सदस्य अमेरिकेतुन आल्याने कट्टा करावा असे ठरत होते, त्यामुळे ८-१० जणांचा कायप्पा ग्रुप तयार करुन चर्चा सुरु झाली आणि हो-ना करता करता डेक्कन,संभाजी पार्क ला भेटु असे ठरले. मी थोडासा उशिरा १०.४० पर्यंत पोचलो तोवर कर्नल तपस्वी,प्रचेतस, श्री गणेशा आणि त्यांचा भाचा असे आले होते.

लोहगड, भाजे लेणी--फोटोवारी

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी रविवार, 07/05/2023 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी पहीलेच सांगतो की भटकंती विभागात एरर येत असल्याने ईथे धागा काढला आहे त्याबद्दल क्षमस्व. एप्रिल्/मे महीन्याचे ऊन तापत आहे, त्यामुळे हे काही भटकंतीचे दिवस नव्हेत गड्या. पण मुलाची परीक्षा संपुन पुढचे क्लास सुरु व्हायला २-३ दिवस होते, आणि अभ्यास "करुन" तो आणि "बघुन" मी कंटाळलो असल्याने एक तरी वन डे करावा असा विचार केला. त्याचे १-२ मित्रही तयार झाले. मग काय, विकांताला निघालो गाडी घेउन सकाळी ६-६.१५ वाजता. थंड वातावरण होते, ट्रॅफिकही कमी होते, वाटेत घोरावडेश्वर लागले, म्हटले जरा वॉर्म अप होईल, म्हणुन गाडी बाजुला घेतली आणि निघालो वर जायला.

आसवांचे थेंब येता तुझ्या गालावरी

लेखक Deepak Pawar यांनी रविवार, 07/05/2023 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
आसवांचे थेंब येता तुझ्या गालावरी दाटले आभाळ हे बरसुनी गेल्या सरी. वादळे येतील तेव्हा नको तू घाबरू दुःख सारी ती तुझी उधळ तू वाऱ्यावरी. दाटुदे अंधार सारा जरी हा भोवती नांदतो हा चांद आता तुझ्या भाळावरी. पूस डोळे हास, ढाळू नको ही आसवे आसवांचा थेंब ना शोभतो गालावरी. हात घे हातात हा सोड साऱ्या वंचना ठेव तू विश्वास आता सखे माझ्यावरी.
काव्यरस