Skip to main content

आईटी(सर्विस) क्षेत्रामधील सर्वसाधारण अभियंते

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 19/02/2015 02:46 या दिवशी प्रकाशित केले.
अ : काय हिरो , काय काय . जोब कसा चालू आहे ब . काय नाय निवांत . जोब मस्त . सध्या टीम लीड झालो आहे त्यामुळे फक्त दुसर्याचे काम चेक करतो . फारसे टेक्निअल काम करत नाही हल्ली अ : मजा आहे कि मग .आता अजून ३-४ वर्षात मेनेजर झाल्यावर मग तर पूर्ण इमेल आणि एक्सेल आणि फोन एवडेच वापरावे लागेल ब . हो ना यार .

चटपटीत

लेखक खटासि खट यांनी बुधवार, 18/02/2015 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
जालावर लंबुळक्या लेखात / भाषणात हमखास आढळणारी चटपटीत वाक्ये (काही घासून गुळगुळीत झालेली) यांचं संकलन इथे करूयात. उदा. वर्गीकरण एक १. अर्धा ग्लास रिकामा आहे की अर्धा भरलेला आहे हे पाहणा-याच्या दृष्टीवर अवलंबून असतं. २. सिस्टीम बदलू शकत नसेल तर सिस्टीमचा भाग व्हावे. ३. देश तुम्हाला काय देतो यापेक्षा ... ४. आपल्याला जे म्हणायचे आहे ते न म्हणता ते कसे "दिसेल" याची काळजी घेतली जाते. ५. आपल्यासाठी लोकशाही ही चैन आहे... ( अगागागा) वर्गीकरण दोन १. या ठिकाणी २. घोषणा करण्याच्या संबंधाने ३. शेतक-यांच्या, कष्टक-यांच्या, गरीबांच्या माध्यमातून ४. उधळून लावल्याशिवाय राहणार नाही ५. अरे काय चाललंय हे ?

"किंमत"

लेखक पदकि यांनी बुधवार, 18/02/2015 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
कवितांच्या एका छोट्या पुस्तकाला तीन मसाला डोशांची किंमत तुम्ही द्याल काय ? मला नाही वाटत! प्रकाशकाला सांगून एका डोशातच ते बसवायला हवे ! चार रंगीत चित्रे कमी करा, काय ? : मिलिंद पदकी

भिगवण - पोएट्री इन मोशन

लेखक नांदेडीअन यांनी बुधवार, 18/02/2015 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
माझी ‘बकेट लिस्ट’ तशी फार साधारण आणि छोटी आहे. ‘भिगवणला एकदा तरी जायचे !’ हा माझ्या या छोट्या लिस्टमधला एक पॉइंट होता. कित्येक वर्षांपासून फक्त प्लॅनच तयार व्हायचा आणि ऎनवेळी कोणत्या तरी कारणाने तो रद्द व्हायचा. गेल्या २ वर्षांपासून पुण्यात राहतोय, तरी योग जुळून येत नव्हता. शेवटी मागच्या महिन्यात २९ तारखेचा प्लॅन केला आणि यावेळी तो रद्द होऊ दिला नाही. भिगवणबद्दल ‘वेगळे’ काही लिहिण्यासारखे माझ्याकडे नाहीये, कारण भिगवण कशासाठी प्रसिद्ध आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे फक्त माझा अनुभव शेअर करतो. भिगवणबद्दल बरेच ऎकून, वाचून आणि फेसबुकवर बघून होतो. भिगवणला जाऊन आलेले पर्यटक अनेक ब्लॉग आणि व

छायाचित्र स्पर्धा क्र. ७: शांतता: मतदानासाठी धागा

लेखक संपादक मंडळ यांनी बुधवार, 18/02/2015 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! छायाचित्र स्पर्धा क्र.७ मतदानासाठी हा धागा आहे. या स्पर्धेला अभूतापूर्व प्रतिसाद मिळाला आहे. त्यासाठी सर्वांना मनापासून धन्यवाद! सर्व सदस्यांनी आपल्या आवडीच्या छ्याचित्रांना दि. २५/०२/२०१५ पर्यंत भरभरून मतदान करावे ही विनंती! एखादे चित्र चुकून राहिले असेल तर कृपया त्वरित निदर्शनास आणून द्यावे.

अथ: केस कथा

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 18/02/2015 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
कालच बसमध्ये एका टकल्याची डोक्यावर लावलेली विग खाली पडली. त्याच्या डोक्यावरचे टक्कल पाहून काहीना हसू आले अर्थात त्यात मी ही होतो. तो माणूस रागाने पाहत, पुढच्याच बस स्थानकावर खाली उतरला. साहजिकच आहे, कुणालाही टकल्या म्हंटलेले आवडत नाही. एका लग्नात, लग्न लावणारे गुरुजी टकले होते, लहान पोरांनी अक्षता त्यांच्या टकल्या डोक्याला नेम मारून फेकल्या. मुलांवर खेसकण्या शिवाय ते काही ही करू शकले नाही. बहुधा प्रत्येक लग्नात त्यांना हे भोगावेच लागत असेल. मुलांच्या खोड्या थांबविणे कुणालाच शक्य नसते आणि लोकांचे तोंड ही बंद करता येत नाही. काही पुरुष विग घालतात, पण विग डोक्यावरून पडली तर, फजिती होते.

मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे.. .भाग 4

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 18/02/2015 18:31 या दिवशी प्रकाशित केले.

मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे.. .भाग 4 जम्मू श्रीनगर बस प्रवास

1979-80 सुमारास हा प्रदीर्घ प्रवास माझ्याप्रमाणे अनेकांनी अनेकदा केला असेल. पण अरूणच्या शब्दांकनाची हातोटी विलक्षण आहे. त्याचा मासला अनुभवा... ‘सार्वजनिक संडास ही राष्ट्राच्या संकृतीची कसोटी आहे!.’ ... हे पु लंचं चपखल वाक्य नेमकं आठवत उरातील सल पोटाकडे कळ बनून सरकते... लाईन लांब व्हायच्या आत तिथे टॅक्स भरून मोकळा झालो!... तिथला ‘एकांत-वास’ सुद्धा...

भूत... वर्त्तमान.... भवीष्य

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 18/02/2015 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
गेला होउन जो.... भूत; होऊ घातला तो... भविष्य हातात काही न ज्यांच्या तेच भुत अन भविष्य.... वर्तमानाचा तो सागर उचंबळुन येई ग किनारी करंटया मनुष्याला परी नाही किम्मत तयाची नाही हातात जे जे ते ते हवे म्हणे माणूस म्हणुनच का ग त्याला वर्तमान आणि रंजिस?! --------

खुशबू (भाग २)

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 18/02/2015 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ घरात अठरा विश्वे दारिद्र्य, आई कॅन्सरने आजारी, त्या धक्क्याने आकस्मिक गेलेले वडील, अश्या हलाखीच्या परिस्थितीत अमर उपाध्याय काय करतो ? काहीच नाही…… करण्यासारखं फार काही नसतंच त्याच्याकडे… फक्त त्याच्या नेटवर्किंगच्या अभ्यासा… आणी विद्यापीठातल्या नोकरीखेरीज …… -------------------------------- ऑफिसमधून लवकर निघता आल्यामुळे अमर खुश होता. मेंटली न दमता घरी येण्याचा हा अपवादात्मक दिवस. आज संध्याकाळसाठी काही स्वयंपाकही करायचा नव्हता. रात्रीच्या जेवणासाठी त्यानं दाल-खिचडी सकाळीच करून ठेवलं होती.

आम्हाला फक्त विकास हवाय... !

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 18/02/2015 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रामधे काही पत्रकारांचे लिखाण गंभीरपणे वाचले जाते. काही जणांच्या लिखाणात नवी माहिती मिळते तर काहींच्या लिखाणात नवा विचार मिळतो. अशाच एका जाणकार पत्रकाराचा एक लेख वाचनात आला. त्यातल्या दोन वाक्यांनी काळजाला हात घातला.