Skip to main content

काही गंभीर सामाजिक्/राजकीय प्रश्न/शंका

लेखक तुषार काळभोर यांनी रविवार, 22/02/2015 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
संपादक मंडळास विनंती: हा धागा/त्यातील प्रश्न/त्यांची उत्तरे/प्रतिसाद यातील काहीही जर कोणाच्या संवेदना दुखावणारे असेल तर लागलीच उडवून टाकावे. १. जातीयवादी म्हणजे कोण्/काय? २. धर्मनिरपेक्ष म्हणजे कोण्/काय? ३. पुरोगामी विचार म्हणजे कसले विचार? ४. प्रतिगामी विचार म्हणजे कसले विचार? ५. समाजवाद म्हणजे काय? ६. 'बहुजन समाज': यामध्ये कोणते सामाजिक घटक येतात? जर 'बहुजन समाज' ही संज्ञा जातिविषयक असेल तर, त्यात कोणत्या जाती येतात? ७. 'अल्पसंख्यांक' म्हणजे किती अल्प? किती टक्के असल्यावर एखादा घटक अल्पसंख्य ठरतो? की सर्वात मोठे सोडून इतर सर्वच अल्पसंख्यांक? ८. 'प्रार्थनास्थळ' म्हणजे काय?

अंध चित्र

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 22/02/2015 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
चित्र काढताना त्यास पाहिले क्षणात कुतुहल जागे झाले रंगाचे चार पट्टेच दिसले चित्रातुन काहीच न उमजले चित्राचे गुढ त्यास विचारले अंध पोर ते गालात हसले "मनातले चित्र इथे काढले तुमचे रंगच कमी पडले रंगाचे ज्ञान जरी नसले माझे चित्र मीच पाहिले" डोळस नजरेतुन काय निसटले जे पोरास पाहता आले? आजवर सर्वत्र केवळ पाहिले अनुभवणे केव्हाच होते विसरलेले. .

गुंतागुंत - (पार्ट -१)

लेखक Maheshswami यांनी शनिवार, 21/02/2015 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
खरंच , काश्मीरला स्वर्ग म्हणतात ते अजिबात खोटं नाहिये. आरामखुर्चीत बसून अभय विचार करत होता. त्या थंडगार हवेत , बर्फानी आच्छादलेल्या पर्वतांकडे बघत , गरमागरम चहाचे घुटके घेताना किती छान वाटत होतं. निसर्गाचं हे सौंदर्य पाहून, काल दिवसभर केलेल्या प्रवासाचा शीण कुठल्याकुठे पळून गेला होता. अभयला तर पहाटेपासून झोपच येत नव्हती. सगळी मित्रकंपनी अजून झोपूनच असेल म्हणून तो एकटाच हॉटेलच्या बाहेर येवून तिथल्या गार्डन कैफ़े मध्ये येवून बसला होता. काल रात्रीच बाकी मित्रांसोबत तो जम्मूला आला होता.

हे झोल नेमके आहेत तरी काय ?

लेखक कोंबडी प्रेमी यांनी शनिवार, 21/02/2015 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
एक क्षणभर स्वस्थपणे थांबून कुणी खालील मुद्द्यांवर ह्यावर प्रकाश टाकेल काय ? १. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर नक्की आक्षेप काय आहेत ? २. स्वातंत्र्यवीर सावरकर: नक्की आक्षेप काय आहेत ? ३. कम्युनिझम : नक्की आक्षेप काय आहेत ? ४. सुभाषचन्द्र बोसांवर आलेली कोन्ग्रेसमधून हकालपट्टी ची आफत का आली होती (थोडे ऑफ द ट्रॅक पण तरीही) ५. रेडियोवर पूर्वी असलेली हार्मोनियम / ऑर्गन वर बंदी का होती आता ती का बदलली

एक मस्त पोपट!!!

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शुक्रवार, 20/02/2015 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
दोनेक वर्षांपूर्वीची गोष्ट .... (तेव्हा शब्दबद्ध केलेला) कोपनहेगन (डेन्मार्क) च्या अतिशय सुरेख अशा स्कॅंडीक मध्ये मुक्काम .. ह्या हॉटेलच्या रिसेप्शन मध्ये भला थोरला पियानो ..काल सायंकाळी एका मडमेने काही गत वाजवली.... व ती गेली....थोड्या वेळाने...इकडे तिकडे बघून..समस्तांची लज्जा त्यजून आम्हीही मग बसलो... मंदशा सरत्या संधीप्रकाशात थोडा यमन छेडला...

मी चाक पुन्हा शोधले (एक जुना अनुभव)

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शुक्रवार, 20/02/2015 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
किडे करणे हा स्वभाव...घराचे ग्रील रंगवणे हि गरज..कालदिन एक रंगाचा डबा ब्रश पोलिश पेपर घेऊन आलो.सकाळी सकाळी कामाला लागलो ...थोडे रंगवल्यावर हातातील मोज्याचा रंग ग्रील ला पुसल्यावर मेंदू लहर आली व सरळ हातानेच रंग चोपडू लागलो...अरे वाह वेळ वाचू लागला ...पण हातमोजा फाटला ...बरबटलेल्या हाताने (किटलेल्या कानाने..."तुझे नस्ते उद्योग..हे तुझे काम आहे का ?..हे नंतर कोण आवरणार ?वगैरे वगैरे ' ) काय करावे असा विचार करत होतो तेवढ्यात आमचे वाचमन थोरात काही कामासाठी आले माझ्याकडे विचित्र नजरेने बघत बघत बोलू लागले ...आणि तेवढ्यात .."कपड्याच्या तुकड्याने रंग लावावा" हे वाक्य त्यांच्या तोंडून व माझ्या मन

मातृभाषा दिवस साजरा करू-मातृभाषेत बोलू

लेखक पिशी अबोली यांनी शुक्रवार, 20/02/2015 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारी महिना तसा प्रेमाचाच असतो. या महिन्यात आपापली प्रेमं योग्य तिथे व्यक्त करून झालीच असतील सगळ्यांची. उद्याचा दिवस आपलं मातृभाषेवरील प्रेम व्यक्त करण्याचा आहे. मिपाकरांचं भाषाप्रेम माहीत असल्यामुळे हा धागा काढत आहे. २१ फेब्रुवारी हा 'आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची थोडी पार्श्वभूमी अशी: फाळणीनंतर बांगलादेश 'धर्म' या एका मुद्द्यामुळे एक अख्खा देश पलीकडे असणार्‍या पाकिस्तानशी जोडला गेला होता. पण जेव्हा 'उर्दू' ही एकमेव राष्ट्रीय भाषा म्हणून लादण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा तेथील बांग्ला भाषकांची भाषिक अस्मिता जागी झाली.

शेअरबाजार - ईतिहासाची पुनरावृत्ती होणार का ??

लेखक प्रसाद भागवत यांनी शुक्रवार, 20/02/2015 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण २० एक वर्षापुर्वीची गोष्ट असावी, बाजारांतील एक प्रमुख कंपनी असलेल्या ITC च्या देशभरांतील विविध कार्यालयांवर परकीय चलनाची गडबड केल्याच्या आरोपाखाली कस्टम्स व प्रवर्तन निर्देशनालय(ED) यांनी धाडी घातल्या. कंपनीचे प्रमुख संचालकांबरोबरच तीचे 'आयकॉनिक' चेअरमन श्री. देवेश्वर यांना तडकाफडकी अटक केली आणि या सगळ्यांना एका पोलिस चौकीत पुर्ण रात्र डांबुन ठेवले... अतिशय स्वच्छ व उत्तम व्यवस्थापनासाठी नावाजलेल्या कंपनीवरील या कारवाईमुळे तेंव्हा आपल्याकडील आर्थिक जगतात मोठी खळबळ उडाली.

खुशबू (भाग ४)

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 20/02/2015 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ 'मुस्लिम व भारतनिष्ठा याबाबत तुझं काय मत आहे मुली ?'… कॉफीचा घुटका घेता घेता अडखळत ती म्हणाली 'एक्सक्यूज मी … ?' रागाची ऐक सूक्ष्म छटा तिच्या चेहेर्यावरती उमटून गेली … 'सर माझ्या मुस्लिम असण्याबद्दल, हा टॉन्ट होता का ?' 'अजिबात नाही पोरी, तुला माहित नसेल, पण तुझ्या बापाला जवळून ओळखायचो मी, ऐक सच्चा सपूत होता तो मातीचा' 'बर मग, मी ऐकतेय, पुढे बोला', तिच्या कपाळावरची नस अजूनही पूर