मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शेअरबाजार - ईतिहासाची पुनरावृत्ती होणार का ??

प्रसाद भागवत · · काथ्याकूट
साधारण २० एक वर्षापुर्वीची गोष्ट असावी, बाजारांतील एक प्रमुख कंपनी असलेल्या ITC च्या देशभरांतील विविध कार्यालयांवर परकीय चलनाची गडबड केल्याच्या आरोपाखाली कस्टम्स व प्रवर्तन निर्देशनालय(ED) यांनी धाडी घातल्या. कंपनीचे प्रमुख संचालकांबरोबरच तीचे 'आयकॉनिक' चेअरमन श्री. देवेश्वर यांना तडकाफडकी अटक केली आणि या सगळ्यांना एका पोलिस चौकीत पुर्ण रात्र डांबुन ठेवले... अतिशय स्वच्छ व उत्तम व्यवस्थापनासाठी नावाजलेल्या कंपनीवरील या कारवाईमुळे तेंव्हा आपल्याकडील आर्थिक जगतात मोठी खळबळ उडाली. शेअरबाजारात सहाजिकच ITC च्या भावाने गटांगळ्या खाल्या. नेमके याच वेळी मी, एका जाणत्या ब्रोकरच्या सल्ल्यामुळे माझ्या तिर्थरुपांच्या रिटायर्मेंट्च्या पैशांतील काही भाग ITC मध्ये गुंतवण्याच्या बेतांत होतो.(अस्मादिकांना नोकरीला लागुन उणेपुरे वर्षही झाले नव्हते हो... स्वतःचे पैसे कोठुन येणार??) पण झाला प्रकार पाहुन "बरे झाले, ...या भानगडींत पडलो नाही ते" असे म्हणुन मी भगवंताचे आभार(??) मानले. पुढे काही काळाने तेंव्हा प्रसिद्ध होत असलेले एक अतिशय उपयुक्त मासिक 'Intelligent Investor' मध्ये 'Scandal Investing' विषयावर अगदी याच कंपनीचे, हेच उदाहरण घेवुन एक अतिशय उत्तम लेख प्रसिद्ध झाला,(दुर्दैवाने सकाळ पासुन शोधुनही तो सापडलेला नाही.) त्याचा मतितार्थ ब्ल्यु-चीप कंपन्यांबाबत अशा आलेल्या 'संधी' सोडु न देता बेधडक गुंतवणुक करावी असा होता, मी त्यातील युक्तीवादाने प्रभावितही झालो, पण तो पर्यंत वेळ निघुन गेली होती. पश्चातबुद्धी पश्चातबुद्धी म्हणतात ती हीच. सांगावयास 'खेद' होतो की मधल्या काळांत ह्या कंपनीने प्रतिवर्षी 25% हुन अधिक वाढ तीही चक्रवाढीने (CAGR) दाखवली असुन माझ्याकडील आलेखांच्या(charts) आधारे बोलावयाचे झाले तर आजचा भाव तेंव्हाच्या साधारण 35 पट आहे.(शिवाय दरवर्षीचा 400/500% लाभांश वेगळाच!!!)... म्हणतात ना 'आगे बुद्धी वाणीया...पीछे बुद्धी XXणीया,.हे खरे असेल का ?? असो. हे सगळे रामायण सांगावयाचे कारण म्हणजे आता चालु पेट्रोलियम मंत्रालय गोपनीय दस्तावेज चोरी प्रकरणानंतर 'आपण रिलायन्सचे काय करावे??' ह्या प्रश्नाचे न सापडलेले उत्तर. तुम्हाला काय वाटते??- प्रसाद भागवत

वाचन 5971 प्रतिक्रिया 0