किडे करणे हा स्वभाव...घराचे ग्रील रंगवणे हि गरज..कालदिन एक रंगाचा डबा ब्रश पोलिश पेपर घेऊन आलो.सकाळी सकाळी कामाला लागलो ...थोडे रंगवल्यावर हातातील मोज्याचा रंग ग्रील ला पुसल्यावर मेंदू लहर आली व सरळ हातानेच रंग चोपडू लागलो...अरे वाह वेळ वाचू लागला ...पण हातमोजा फाटला ...बरबटलेल्या हाताने (किटलेल्या कानाने..."तुझे नस्ते उद्योग..हे तुझे काम आहे का ?..हे नंतर कोण आवरणार ?वगैरे वगैरे ' ) काय करावे असा विचार करत होतो तेवढ्यात आमचे वाचमन थोरात काही कामासाठी आले माझ्याकडे विचित्र नजरेने बघत बघत बोलू लागले ...आणि तेवढ्यात .."कपड्याच्या तुकड्याने रंग लावावा" हे वाक्य त्यांच्या तोंडून व माझ्या मनात अक्षरशः एकाच वेळी उमटले...
मग काय दणादण रंगकाम पुढे सुरु केले...:) १० मिनिटात ग्रील रंगाने 'पुसून' काढले...काम उत्तम झाले आहे अशी प्रशस्ती वाट्याला (कधी नाही ती) आली आहे...रोकेल नि हात धुवून चहा व चैतन्य कांडी चा आस्वाद घेत थोडी विश्रांती घेतोय ...म्हटलं हा कृतार्थ क्षण सांगावा तुम्हाला...
तात्पर्य : ग्रील रंगवतांना ब्रश पेक्षा फडक्याने रंग चोपडणे सोपे असते (ह्यालाच बहुदा 'पुन्हा चाक शोधणे' reinventing the wheel म्हणत असावेत..)
वाचने
4653
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
हो ..
In reply to छान by कपिलमुनी
खरं आहे.
रंगवलेल्या ग्रीलचा एक फोटो
+१
In reply to रंगवलेल्या ग्रीलचा एक फोटो by खटपट्या
किंवा
In reply to +१ by तुषार काळभोर
आणि
बारीक सारीक कामे स्वत:च करावीत
हाहाहा!
लग्गेच सुरू करा.
In reply to हाहाहा! by पैसा
मलाही
In reply to हाहाहा! by पैसा
हाहा!
In reply to मलाही by प्रियाजी
लगे रहो