Skip to main content

महामानवाची जयंती ।

लेखक सवंगडी यांनी मंगळवार, 14/04/2015 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज महामानवाची जयंती । मस्त साजरी होती आहे… हो ,होते आहे. लेझर लाईट च्या प्रकाशात मदमस्त झालेले भीम सैनिक नाचतायेत… मी पण एक मनापासूनचा भीमसैनिक (यात जातपात शोधायला जाऊ नका) ! त्यामुळेच मला हे सगळ पाहून वाईट वाटत.! बाबासाहेबांमुळे मिळालेल्या व्यक्तीस्वातंत्र्य भाषास्वातंत्र्य, आणि आचारस्वातंत्र्य याचा परिपूर्ण वापर (दुरुपयोग) चालू आहें.पण विचार स्वातंत्र्य मात्र जमेल तसं आम्ही वापरतो. बाबासाहेबांचे विचार त्यांच्या अनुयायांनी लवकरच संपवायचे चालवले आहे. गौतम बुद्ध म्हणाले होते ,"मला देव बनवु नका! "माझे विचार अवलंबा!" पण आपण त्यांना देवाच्या जागी ठेवलं ! तिथेच बौद्ध धर्माला उतरती कळा आली.

ड्रिल

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 14/04/2015 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
ड्रिल म्हणजे कवायत हे शारीरिक शिक्षण( physical Training) नव्हे. यातील मुळ फरक काय ? तर एक शारीरिक प्रशिक्षण आहे आणि दुसरे मानसिक प्रशिक्षण. आमच्या एका मित्राच्या भाषेत डोक्याला भोक पडून काही गोष्टी डोक्यात घुसवल्या जातात आणि मग सिमेंटने सील केल्या जातात. शस्त्र चालवायला शिकवणे सोपे असते पण प्रत्यक्षात त्याचा वापर करणे हे तेवढे सोपे नसते. जेंव्हा तुम्ही शत्रूच्या समोर बंदूक हातात घेऊन उभे राहता आणि चहुबाजूनी गोळीबार सुरु होतो तेंव्हा तो आवाज तुम्हाला गर्भगळीत करून टाकतो तेंव्हा तुमची मती गुंग होते आणि हात पाय काम करेनासे होतात. अशा वेळेस काही गोष्टी यांत्रिकपणे करायला शिकवले जाते.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३९

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 14/04/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. मी दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसहाच्या पहिल्या येश्टीनी गावाकडे निघालो.. पुढे चालू... ========================================== आणि पुन्हा येकवार तो येश्टीचा कंटाळवाणा परंवास करुन, मी दुपारच्या चिडचिडं करणार्‍या तिनाच्या तिरप्या उन्हात मुक्कामी पोहोचलो. बघतो..., तर चक्क काका त्याची ती भल्यामोठ्ठ्या क्यारियरची सायकल घेऊन स्वागताला उभा असल्यासारखा उभा.आणि बरोबर संघटनेतल्या दोनचार पोरांचं कोंडाळंही.

टोल भैरव !!

लेखक नितिन शेंडगे यांनी मंगळवार, 14/04/2015 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार !!, आज काल सगळीकडे टोल चा मुद्दा खूप गाजतोय. नुकताच सरकार ने काही टोल बंध केले आणि काही ठिकाणी तात्पुरती टोल माफी दिली . मी सुरुवातीला स्पष्ट करतोय कि कोणत्याही राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी मी हे लिहित नाहीये. हा तर चला मग, ज्या वेळेस मनसेने टोल चा मुद्दा घेतला त्याच्या आधी आपल्यासारख्या सामान्य माणसाचे तरी लक्ष होते का कि आपण किती आणि का टोल देतो ?? कधीतरी आपण विचारले का रे बाबा किती दिवस टोल घेणार ?

परिक्षणासाठी मदत हवी.

लेखक संदीप डांगे यांनी मंगळवार, 14/04/2015 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, मिसळपाव हे संकेतस्थळ व इथले सदस्य यांचा मी बराच ऋणी आहे. एका विशेष अडचणीच्या काळात काहीही ओळखपाळख नसतांना मिपाकरांनी जमेल ती मदत केली. त्याचा मला खूप फायदा झाला. त्याचे परिणाम पुर्ण व्हायला अजून ३-४ महिने लागणार आहेत. त्यामुळे त्याबद्दलचा सविस्तर धन्यवादाचा लेख मी अजून लिहिला नाही. माझ्या मते कार्यक्रम संपल्यावर आभारप्रदर्शन बरं असतं. आज मला एका वेगळ्या बाबतीत मदत हवी आहे. मिपाकर योग्य त्या प्रकारे मदत करतील अशी खात्री आहे. भरपूर विचारविनिमय, अभ्यासांती आम्ही (मी+बायको) एक नवीन व्यवसाय सुरु करायचे ठरवले आहे. तयार मसाल्यांचा उद्योग.

मिक्स व्हेज ग्रील्ड सँडवीच

लेखक दिपक.कुवेत यांनी मंगळवार, 14/04/2015 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
san 1 मंडळी, कधीतरी असं होतं का कि फ्रिज उघडला की आणलेल्या सगळ्या भाज्या थोडया थोडया उरलेल्या दिसतात. मग त्या तशाच टाकून देणंहि जीवावर येतं आणि त्याची भाजी करायची म्हटली तरी पुरवठयास येत नाहि. असं जेव्हा होत तेव्हा घ्या सगळ्या भाज्या, द्या फोडणीचा तडका, भरा ब्रेड मधे आणि करा ग्रील्ड सँडवीच.....थांबा थांबा डीट्टेलवार सांगतोच कसं! साहित्यः १. उभे चीरलेले कांदे - २ २.

गौ. हत्या बंदी (मांसाहार आणि भूक )

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 14/04/2015 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
एतत्मांसस्य मांसत्वं प्रवदन्ति मनीषिणः॥ ज्या प्राण्याचे या जन्मी भक्षण कराल,पुढच्या जन्मी तोच प्राणी तुमचे भक्षण करेल. (मनुस्मृति- 5:55) वैदिक युगाच्या सुरवातीला लोक गौ. भक्षणकार्याचे, नंतर कामधेनु स्वरूपी गायींचे महत्व लोकांना कळले आणि तिची हत्या पाप मानल्या जाऊ लागली. गौ. हत्येचे फळे आज मानव समाज भोगत आहे. महाराष्ट्रात गौ. हत्या बंदी लागू झाली. तथाकथित अति शहाण्यांनी स्वाभाविकरित्या गौ. बंदीचा विरोध केला. त्या शिवाय त्यांना पुरोगामी कोण म्हणणार. (सध्या १५०-२०० रु किलो ने मिळणारे गौ. मांस गरिबांचे अन्न आहे, असा दुजोरा ही त्यांनी दिला). सध्या देशातल्या अधिकांश राज्यात गौ.

मिस्टिसिझम - एक चिंतन - १

लेखक प्रास यांनी मंगळवार, 14/04/2015 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
मिस्टिसिझम हा शब्द मिस्टिक आणि इझम या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून बनलेला आहे. मिस्टिक या शब्दाला साजेसा दुसरा इंग्लिश शब्द मिस्ट्री आहे आणि दोहोंमध्ये अर्थाच्या दृष्टीने साम्यच आहे. सर्वसामान्यपणे दोन्ही शब्दांचा अर्थ गूढ, रहस्यमय असाच अर्थ केला जातो. दोन्ही शब्दांच्या मूळाशी ग्रीक धातु म्यून (muien) आहे. याचा अर्थ गप्प बसणे असा आहे. आपल्याला त्यावरूनच आलेला म्यूट (mute) शब्द परिचितच आहे. अशा पार्श्वभूमीवर मिस्टिक वा मिस्ट्रीला गूढ, रहस्यमय असा अर्थ कसा प्राप्त झाला असावा?

दूर

लेखक योगेश भालेकर यांनी मंगळवार, 14/04/2015 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा तुझ्या आठवणीना मनामध्ये पूर येतो, न जाणे कसा मी माझ्यापासूनही खूप दूर होतो, फक्त वाहत वाहत जातो मी, स्वतःच्या असण्यापलीकडे, तुझ्या नसण्यापर्यत, वेचत राहतो क्षण तुझे, भिरभिरत राहतो इकडे तिकडे, आठवणीचा पाउस असेपर्यत, जेव्हा तुझ्या मिठीत असता जीव कासावीस भरपूर होतो, तुझ्या निसटत्या हाताला पाहताना भरून उर येतो, फक्त शोधत राहयचे तुला मी, कुठे अनोळ्खी चेहर्यामध्ये, स्वतःला तुझी ओळ्ख पटेपर्यत, बेचेन होणं कधी कधी, एकटं वाटून स्वतःला स्वतःमध्ये, तुझ्या असण्यापासून तुझ्या नसण्यापर्यत, मग पुन्हा, जेव्हा तुझ्या आठवणीना मनामध्ये पूर येतो, न जाणे कसा मी माझ्यापासूनही खूप दूर होतो,